agriculture stories in Marathi crop Advice (Konkan region) | Agrowon

कृषी सल्ला (कोकण विभाग)

कृषी विद्या विभाग, दापोली
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

कोकण विभागातील पिकांसाठी हवामानाच्या अंदाजानुसार सल्ला

हवामान अंदाज ः
मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात १२ ते १८ ऑगस्ट या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

भात

 • मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, भात खाचरातील पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत नियंत्रित करावी.
 • सध्या भात पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत असल्याने नत्र खताची दुसरी मात्रा एकरी ३५ किलो युरिया पावसाची तीव्रता कमी असताना द्यावी.
 • पावसाची उघडझाप व ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. भात पिकावर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगामुळे पानांवर ठिपके तयार होतात. पाने करपून रोपांची वाढ खुंटते.
 • करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच, नियंत्रणासाठी फवारणी प्रती लीटर पाणी
 • ट्रायसायक्लॅझोल (७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) १ ग्रॅम.
 • पावसाची उघडझाप व ढगाळ वातावरणामुळे पाणथळ भागातील भात पिकावर खाचरात पाणी साठून राहिल. या ठिकाणी निळे भुंगेरे व सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पानथळ क्षेत्रातील पिकातील किडीच्या प्रादुर्भावाकडे सातत्याने लक्ष करावे. निळे भुंगेरे किडीची अळी आणि प्रौढ अवस्था या दोन्ही हानिकारक आहेत. प्रौढ भुंगेरे पानाच्या वरच्या पृष्ठभागावरील हरितद्रव्य खातात. निळे भुंगेरेचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रती लीटर पाणी
  क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.ली. किंवा ट्रायझोफॉस (४० टक्के प्रवाही) १.२५ मि.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.५ मि.ली.
 • सुरळीतील अळी कोवळे पान कापून त्याचे लहान तुकडे करते. त्याची सुरळी करून त्यात राहते. रात्रीच्या वेळी अळी पानातील हरितद्रव्य खरवडून खाते त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात. शेत निस्तेज दिसते. सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास किडीच्या नियंत्रणासाठी भात खाचरात असलेले पाणी बांधून ठेवावे. नंतर कीडग्रस्त पिकावरून एक दोर आडवा धरून ओढत न्यावा, त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतील. नंतर शेतातील पाणी एका बाजूला फोडून लावावे. यामुळे सर्व सुरळ्या एका ठिकाणी जमा होतात. या सुरळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. त्यानंतर शेतात नवीन पाण्याची साठवण करण्याची व्यवस्था करावी.
 • गरज भासल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रती लीटर पाणी
 • कारटॅप हायड्रोक्लोराईड (५० टक्के) १.२ ग्रॅम.

नागली (नाचणी)

 • फुटवे अवस्था
 • नागली पिकाची पुनर्लागवड झाल्यानंतर एक महिन्याने गरजेनुसार बेणणी करावी.
 • बेणणी केल्यानंतर नत्र खताची दुसरी मात्रा ३५ किलो युरिया प्रति एकरी या प्रमाणात पावसाची तीव्रता कमी असताना द्यावी.

भाजीपाला पिके

 • फुलोरा ते फळधारणा अवस्था
 • ढगाळ वातावरण व आर्द्रतेमुळे वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये केवडा रोगाचा प्रादुर्भाव वाढ शकतो. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड २ ग्रॅम प्रती लीटर पाणी फवारणी करावी. पुढील फवारणी आवश्यकतेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने करावी.
 • वांगी, मिरची, कारली, पडवळ, दुधीभोपळा, दोडका भाजीपाला पिकावर काही ठिकाणी पाने खाणारी अळी, पांढरी माशी, तुडतुडे, मावा इ. किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी, डायमिथोएट १.५ मिली प्रती लीटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी.
 • वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये फळमाशीच्या नियंत्रणासाठी ‘मिथाईल युजेनॉल’ किंवा ‘क्यू-ल्युर’ रक्षक सापळे भाजीपाला क्षेत्रामध्ये जमिनीपासून १ ते २ फूट उंचीवर प्रती हेक्टरी ४ या प्रमाणात लावावेत.

टीप : पावसाची तीव्रता कमी असताना खते द्यावीत, तसेच कीटकनाशकाच्या व बुरशीनाशकाच्या फवारणी घ्याव्यात. पावसाळी वातावरणातील द्रावण पानांवर चिकटून राहण्यासाठी फवारणीच्या द्रावणात स्टिकर मिसळून फवारणी करावी.

०२३५८- २८२३८७
(कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...