agriculture stories in Marathi crop Advice (Konkan region) | Agrowon

कृषी सल्ला ( कोकण विभाग)

कृषी विद्या विभाग, दापोली
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

कोकण विभागातील विविध पिकांसंदर्भातील सल्ला

नारळ  

 • फळधारणा
 • वाढत्या तापमानासोबतच बाष्पीभवनात वाढ संभवते. अशा वेळी नारळ बागेस ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
 • नारळावर शेंड्यामध्ये येणाऱ्या नवीन कोंबावर गेंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. अशा कीडग्रस्त माडांच्या शेंड्याजवळ छिद्रे पडलेली दिसतात. नवीन येणारी पाने त्रिकोणी कापल्यासारखी दिसतात. या भुंग्याची पैदास ही शेणखताच्या खड्ड्यात होते. त्यामुळे बागेजवळ शेणखताचे खड्डे असल्यास अशा खड्ड्यात दर दोन महिन्यांनी क्लोरपायरीफॉस (१.५ टक्के) भुकटी मिसळावी. 
 • उपद्रव झालेल्या माडांच्या नवीन सुईतून तारेच्या हुकाने भुंगे बाहेर काढून नष्ट करावेत. या छिद्रात सुमारे   क्लोरपायरीफॉस (१.५ टक्के भुकटी) २५ ग्रॅम आणि बारीक वाळू यांचे १ : १ या प्रमाणात केलेले मिश्रण भरावे. (या किटकनाशकास लेबल क्लेम नाहीत, मात्र ॲग्रेस्को शिफारस आहे.)
 • नारळ बागेतील सुकलेल्या झावळ्या, पालापाचोळा, गवत काढून बागेत स्वच्छता ठेवल्यास नारळावरील गेंडाभुंगा या किडीच्या नियंत्रणास मदत होईल.  
 • बागेत गेंडा भुंग्याचा गंध सापळा लावावा. 

आंबा 

 • पालवी अवस्था
 • ढगाळ वातावरणामुळे पालवी अवस्थेत असलेल्या आंबा पिकावर तुडतुड्यांचा, मिज माशीचा तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
 • डेल्टामेथ्रीन (२.८% प्रवाही) १ मि.लि. अधिक कार्बेन्डॅझिम (१२%) अधिक मॅन्कोझेब (६३%) (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम.

काजू 

 • पालवी ते मोहोर अवस्था
 • काजू मोहोराचे ढेकण्या व फुलकिडींच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्याकरिता मोहोर फुटण्याच्या वेळी, फवारणी प्रति लिटर पाणी
 • प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.लि. 
 • पालवी अवस्थेत असलेल्या काजूचे ढेकण्या किडीपासून संरक्षण करण्यासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. (या किटकनाशकास लेबल क्लेम नाहीत, मात्र ॲग्रेस्को शिफारस आहे.)

सुपारी 

 • फळधारणा
 • बाष्पीभवनात वाढ संभवते. सुपारी बागेस ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.

उन्हाळी भात 

 • पेरणी  
 • उन्हाळी भात पिकासाठी रोपवाटिका तयार करण्याचा कालावधी आहे. त्यासाठी तयार केलेल्या गादीवाफ्यावर प्रती गुंठा क्षेत्रास १ किलो युरिया व ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ०.८ किलो  म्युरेट ऑफ पोटॅश खते मिसळावीत. 
 • वाफ्यावर ७ ते ८ सें.मी. अंतरावर ओळीमध्ये १ ते २ सें. मी. खोलीवर बी पेरून मातीने झाकावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम २.५ ग्रॅम प्रति किलो हे बुरशीनाशक चोळावे. 
 • रोपवाटिकेतील तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर वाफे ओले होताच ऑक्सिडायरजील (६ ई.सी.) ३ मि. लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात गादीवाफ्यावर एकसारखे फवारावे.

वाल / चवळी   

 • वाढीची अवस्था 
 • वाल, चवळी कडधान्य पिकामध्ये तण नियंत्रण करावे. 

टोमॅटो 

 • वाढीची अवस्था
 • टोमॅटो पिकास रोपांच्या पुर्नलागवडीनंतर एका महिन्यांनी नत्र खताची दुसरी मात्रा एकरी ४३ किलो युरियाच्या माध्यमातून द्यावी. 
 • नत्राची मात्रा देतेवेळी गवत काढून बुंध्याजवळची माती भुसभुशीत करून पिकांना मातीची भर द्यावी. टोमॅटो पिकास काठीचा आधार द्यावा.

वेलवर्गीय भाजीपाला 

 • वाढीची अवस्था
 • वेलवर्गीय भाजीपाला पीक क्षेत्रातील तणांचे नियंत्रण करावे.  
 • रोपे वेल टाकू लागल्यावर त्यांना आधार द्यावा. त्यासाठी मंडपाची व्यवस्था करावी. 
 • पांढरा कांदा 
 • रोप अवस्था 
 • कांदा पिकाच्या रोपवाटिकेत फुलकिडीच्या प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
 • क्विनॉलफॉस २.५ मि.लि. 
 • कांदा पिकाच्या रोपवाटिकेमध्ये ८ ते १० दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करावी

कलिंगड 

 • वाढीची अवस्था 
 • बऱ्याच ठिकाणी कलिंगड पिकावर तुडतुडे व मावा किडींचा प्रादुर्भाव दिसून आहे. प्रादुर्भाव असल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
 • डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १.५ मि.लि.
 • रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी भाजीपाला पिकामध्ये पिवळे रंगाचे चिकट सापळे लावावेत.
 • कलिंगड पिकास नत्र खताची दुसरी मात्रा प्रति आळे युरिया ११ ग्रॅम द्यावे. संकरित कलिंगडासाठी  युरिया २० ग्रॅम प्रती आळे लागवडीनंतर एका महिन्यांने द्यावे. 
 • कलिंगड पिकास ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. 

भेंडी 

 • वाढीची अवस्था
 • भेंडी पिकामध्ये मावा, तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
 • डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मि. लि. 
 • कीडग्रस्त पाने किंवा शेंडे काढून नष्ट करावेत. 
 •  पिकामध्ये पिवळे चिकट सापळे लावावेत.

 : डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१
 : ०२३५८ -२८२३८७

(ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली.) 


इतर फळबाग
मणी तडकण्याच्या समस्येसाठी राहा सतर्कनुकत्याच झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागेमध्ये...
केळी सल्लामृग बागेतील केळी गर्भावस्थेत आहेत. कांदेबाग लागवड...
मणी तडकण्यासह भुरी रोगाचा प्रादुर्भाव...सध्याच्या वातावरण परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी ढगाळ...
द्राक्ष बागेत घडांना पेपर लावताना...अलीकडे वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष बागेमध्ये सन...
डाळिंब पिकातील रोगांचे व्यवस्थापनतेलकट डाग रोग तेलकट डागासाठी फळ पिकाच्या...
डाळिंब पिकातील बहारनिहाय अन्नद्रव्ये,...मृग बहार (मे-जून पीक नियमन) बागेची अवस्था ः फळ...
वाढत्या थंडीमध्ये फळबागांचे व्यवस्थापनसध्या वाढलेल्या थंडीचा परिणाम  कृषी...
भुरी, डाऊनी मिल्‍ड्यू रोगाच्या...बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बागायतदारांसमोर नवे...
फळबागकेंद्रित शेतीतून अर्थकारण केले...केळवद (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील गणेश...
द्राक्ष बागांमध्ये भुरी,डाऊनी वाढण्याची...सध्याच्या काळात हवामानामध्ये बदल होत आहेत. या...
पेरू फळबागेतील अन्नद्रव्य व्यवस्थापनपेरू हे बहुवार्षिक फळपीक असून, त्याला वर्षभर फुले...
केळी पिकातील करपा, कंद कुजव्या रोगाचे...उशिरापर्यंत लांबलेला पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे...
मणीगळ, मणी विरळणी यांकडे लक्ष द्यावेसध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेतील वातावरणाचा...
कृषी सल्ला ( कोकण विभाग)नारळ   फळधारणा वाढत्या तापमानासोबतच...
आंब्यावरील कीड, रोग नियंत्रण व्यवस्थापनकोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही...
तापमानात घट होण्याच्या स्थितीत...सध्याच्या परिस्थितीत निवार चक्रीवादळ तमिळनाडू व...
ढगाळ, पावसाळी वातावरणात करावयाच्या...सध्याच्या परिस्थितीत ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असून...
हिवरेबाजार शिवारात सीताफळांचा गोडवाआदर्श गाव हिवरेबाजार (ता.जि. नगर) गावासह...
थंडीमध्ये केळी बागेची घ्यावयाची काळजीसद्यःस्थितीत खानदेश व महाराष्ट्रातील अन्य भागात...
कीड रोगांच्या नियंत्रणासाठी आतापासूनच...कोकण विभागातील उष्ण व दमट हवामान आंबा पिकावर...