कृषी सल्ला (कोकण विभाग)

फळबाग रोपवाटिकेस, नवीन फळबाग लागवडीस आणि भाजीपाला पिकास संध्याकाळच्या वेळेस पाणी देण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे जमीन उबदार राहण्यास मदत होईल.
कृषी सल्ला
कृषी सल्ला

किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. फळबाग रोपवाटिकेस, नवीन फळबाग लागवडीस आणि भाजीपाला पिकास संध्याकाळच्या वेळेस पाणी देण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे जमीन उबदार राहण्यास मदत होईल. उन्हाळी भात रोपवाटिका पेरणीनंतर १५ दिवसांनी उन्हाळी भात रोपवाटिकेत प्रति गुंठा युरिया खताची दुसरी मात्रा १ किलो प्रमाणे द्यावी. रोपवाटिकेला नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी. भात पिकाची पुनर्लागवड करावयाच्या क्षेत्रामध्ये पहिली नांगरणी करावी. नांगरणीच्या वेळेस चांगले कुजलेले शेणखत एकरी ३ टन या प्रमाणे जमिनीत मिसळावे. बांधाची बांधबंदिस्ती करावी. हरभरा वाढीची अवस्था हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. या किडीच्या अळ्यांमुळे पानांवर पांढरे डाग दिसून येतात आणि शेंडे खाल्ल्यासारखे दिसतात. या किडीच्या नियंत्रणासाठी शेतात एकरी दोन कामगंध सापळे लावावेत. एकरी दोन पक्षी थांबे लावावेत. किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी ॲझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. आंबा पालवी ते मोहोर अवस्था मोहोर फुटलेल्या आंबा बागेमध्ये मोहोरावर तुडतुडे, मिजमाशी इ.किडींचा तसेच भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. मोहोर फुलण्यापूर्वी तुडतुडे आणि मिजमाशीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि.लि. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ०.५ मि. लि. किंवा गंधक (पाण्यात विरघळणारे ८० टक्के ) २ ग्रॅम.  मोहोर नुकताच फुलत असताना ते फळधारणा होईपर्यंत कीटकनाशकाची फवारणी टाळावी. फवारणी करणे गरजेची असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी वगळून सकाळी ९.०० ते १२.०० किंवा सायंकाळी ३.०० वाजल्यानंतर फवारणी करावी. मोहोर फुलण्यापूर्वीच्या अवस्थेत वर नमूद केलेली फवारणी घेतली असल्यास पुन्हा फवारणी घेवू नये. कमी होणाऱ्या रात्रीच्या तापमानाचा आंब्यामध्ये मोहोर फुटण्यावर परिणाम होऊ शकतो. यासाठी आंबा बागेत तापमान वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. यामध्ये जागोजागी पडलेला व वाळलेला पालापाचोळा गोळा करून पहाटेच्या वेळेस झाडाच्या विस्ताराखाली पेटवून धूर करावा. यामुळे बागेतील तापमान वाढण्यास मदत होईल. किंवा पोटॅशिअम नायट्रेट १ टक्के द्रावण (म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणे झाडाच्या पानांवर बसेल अशारीतीने फवारणी करावी. काजू मोहोर ते फळधारणा फळधारणा झालेल्या काजूच्या फळांवर ढेकण्या व फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.ली. किंवा ॲसिटामिप्रीड (२० टक्के एसपी) ०.५ ग्रॅम (या कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत, ॲग्रेस्को शिफारस आहे.). ढेकण्या ही कीड सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस सक्रिय असते. किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी फवारणी शक्यतो सकाळी १० पूर्वी किंवा सायंकाळी ४ वाजल्यानंतर करावी. - फळधारणा अवस्थेत वर नमूद केलेली फवारणी घेतली असल्यास पुन्हा फवारणी घेवू नये. कलिंगड वाढीची अवस्था कलिंगड पिकावर तांबडे भुंगेरेचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. कीड पानांचा हिरवा भाग, खोड व जमिनीलगतची पाने खाते. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १.५ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. वेलवर्गीय भाजीपाला वाढीची अवस्था ते फुलधारणा काकडी, कारली, दुधीभोपळा वेलवर्गीय भाजीपाला फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. या फळमाशीच्या नियंत्रणासाठी फुले येण्यास सुरुवात होण्याच्या वेळी पिकामध्ये ‘क्यु ल्युर’ रक्षक सापळे एकरी २ या प्रमाणे मंडपात जमिनीपासून १ ते २ फूट उंचीवर राहतील, अशा प्रकारे टांगावेत. सापळ्यात ठेवलेले आमिष ६ ते ७ आठवडे चांगल्या प्रकारे चालते. पांढरा कांदा पुनर्लागवड कांदा पिकाची रोपे लागवडीयोग्य झाली असल्यास पुनर्लागवड करावी. लागवड २ मीटर रुंदीच्या सपाट वाफ्यावर किंवा गादीवाफ्यावर १० x १२ सेंमी किंवा १० x १५ सेंमी किंवा १० x २० सेंमी अंतरावर करावी. नांगरणीच्या वेळेस जमिनीत एकरी १०-१२ टन शेणखत मिसळावे. लागवडीच्या वेळेस प्रति एकरी ४४ किलो युरिया, १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा द्यावी. पुनर्लागवड करण्याच्या पूर्व संध्येला रोपांना भरपूर पाणी द्यावे. तसेच लागवड सकाळी अथवा संध्याकाळी करावी. लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. संपर्क ः ०२३५८ - २८२३८७ डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१ (ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com