कृषी सल्ला (मराठवाडा विभाग)

मराठवाडा विभागातील पिकांसाठी कृषी सल्ला
कृषी सल्ला (मराठवाडा विभाग)
कृषी सल्ला (मराठवाडा विभाग)

मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्‍त झालेल्‍या अंदाजानुसार, परभणी जिल्‍ह्यात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहील. तुरळक ठिकाणी हलका ते मध्‍यम स्‍वरूपाच्‍या पावसाची शक्‍यता आहे. विस्‍तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस), मराठवाड्यात ३० ऑगस्‍ट ते ५ सप्‍टेंबर या दरम्‍यान सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्‍यता आहे. कापूस

  • पाते लागणे, फुलधारणा ते बोंड धरणे
  • मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण, आर्द्रता व पावसामुळे कापूस पिकात मावा, तुडतुडे, फुलकिडे अशा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी, फवारणी प्रति एकर
  • निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा कडूनिंबयुक्त किटकनाशक (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) २ ते ३ मिली किंवा फिप्रोनील (५ टक्के) ६०० मिली किंवा स्पिनेटोरम (११.७ टक्के) १६० मिली किंवा बुप्रोफेंझीन (२५ टक्के) ४०० मिली.
  • पावसाने उघडीप दिल्‍यानंतर फवारणी करावी.
  • अन्‍नद्रव्‍यांच्‍या कमतरतेमुळे कापूस पीक पिवळे पडत असल्‍यास १९:१९:१९ या खताची १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • सध्‍या अनेक ठिकाणी पावसाची उघडीप दिसत आहे. कापूस पिकातील तणांचे व्‍यवस्‍थापन करावे.
  • तूर

  • फांद्या फुटणे
  • सध्‍या पावसाने उघडीप दिलेली असल्‍यामुळे तूर पिकातील आंतरमशागतीची कामे करून तणांचे व्‍यवस्‍थापन करावे.
  • मूग, उडीद

  • काढणी अवस्‍था
  • काढणीस तयार असलेल्‍या मूग पिकाची काढणी करून घ्‍यावी.
  • काढणी केलेला मूग पावसाचा अंदाज बघून उन्‍हात वाळवून घ्यावा. त्याची मळणी करून साठवणूक करावी.
  • मका

  • वाढीची अवस्‍था
  • चाऱ्यासाठी लागवड केलेल्‍या मका पिकाची कापणी ६५ ते ७० दिवसांनी करावी. पीक ५० टक्‍के फुलोऱ्यात असताना मक्‍याची कापणी करावी.
  • उशिरा पेरणी केलेल्‍या मका पिकावर लष्‍करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्‍यास, त्यांच्या नियंत्रणासाठी
  • फवारणी प्रति लिटर पाणी
  • इमामेक्‍टीन बेन्‍झोएट (५ टक्के) ०.४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.४ मिली.
  • केळी

  • मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण, आर्द्रता व पावसामुळे केळी पिकात करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
  • कार्बेन्‍डाझिम (५० डब्‍ल्‍यूपी) १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (१० टक्के ईसी) १ मिली.
  • पावसाने उघडीप दिल्यानंतर स्टिकर मिसळून फवारणी करावी.
  • जूनमध्ये लागवड केलेल्‍या बागेत ५० ग्रॅम नत्र प्रति झाड खतमात्रा दिलेली नसल्‍यास द्यावी.
  • सध्‍या पावसाने उघडीप दिली असल्‍यामुळे केळी बागेतील तणांचे व्‍यवस्‍थापन करावे. तणांचा प्रादुर्भाव जास्‍त असल्‍यास बागेत वापसा येत नाही, परिणामी रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
  • आंबा

  • नवीन लागवड केलेल्‍या आंबा फळ पिकात पावसाळी वातावरणामुळे पानांवरील करपा (अॅन्‍थ्रॅक्‍नोज)चा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी, पावसाने उघडीप दिल्यानंतर फवारणी प्रति लिटर पाणी
  • कार्बेन्‍डाझिम (१२ टक्के) अधिक मॅन्‍कोझेब (६३ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम.
  • सध्‍या पावसाने उघडीप दिलेली असल्‍यामुळे आंबा बागेतील तणांचे व्‍यवस्‍थापन करावे.
  • सीताफळ

  • फळवाढीची अवस्‍था
  • सीताफळ बागेत अनेक ठिकाणी पिठ्या ढेकूण किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी निंबोळी तेल ५ मिली किंवा कडूनिंबयुक्त किटकनाशक (ॲझाडिरेक्टीन १० हजार पीपीएम) २ ते ३ मिली किंवा व्‍हर्टिसीलीयम लेकॅनी ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • पावसाने उघडीप दिली असल्यास सीताफळ बागेतील तणांचे व्‍यवस्‍थापन करावे.
  • भाजीपाला

  • मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण, आर्द्रता व पावसामुळे टोमॅटो पिकावर जिवाणूजन्‍य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति १० लिटर पाणी
  • कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड २५ ग्रॅम अधिक स्‍ट्रेप्‍टोमायसीन* १ ग्रॅम.
  • पावसाने उघडीप दिलेली असल्‍यास भाजीपाला पिकातील तणांचे व्‍यवस्‍थापन करावे.
  • फुलशेती

  • काढणीस तयार असलेल्‍या फुलांची काढणी टप्‍याटप्‍याने करावी. प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.
  • फुलपिकातील तणांचे व्‍यवस्‍थापन करावे.
  • डॉ. कैलास डाखोरे, ९४०९५४८२०२ (मुख्‍य प्रकल्‍प समन्‍वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com