कृषी सल्ला (राहुरी विभाग)

कृषी सल्ला
कृषी सल्ला

रब्बी ज्वारी

  • अवस्था ः पेरणीपूर्व तयारी
  • रब्बी ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करावी. 
  • पेरणीसाठी जाती 
  • हलकी जमीन- सिलेक्शन-३, फुले माऊली 
  • मध्यम जमीन- फुले चित्रा, फुले माऊली, मालदांडी-३५-१ 
  • भारी जमीन- वसुधा, फुले यशोदा, सी.एस.वही.-२२ 
  • बागायतीसाठी- फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.वही.-२२ या वाणांचा वापर करावा. 
  • ज्वारीची पेरणी ४५ x १५ सें मी. अंतरावर करावी. 
  • पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक (३०० मेष) चोळावे. तसेच २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर व पी.एस.बी. या जिवाणू संवर्धकांची प्रक्रिया करून हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. 
  • गहू अवस्था ः पेरणीपूर्व तयारी एक नांगरट करून ३-४ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर ८-१० टन प्रतिहेक्टर कंपोस्टखत टाकावे. हरभरा अवस्था ः पेरणीपूर्व तयारी हरभरा हे रब्बी हंगामातील पीक असल्याने कोरडे व थंड हवामान त्याला मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे २५ सप्टेंबरनंतर जमिनीची ओल उडून जाण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय हा वाण वापरावा. बागायती हरभरा २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान पेरावा. त्याकरिता दिग्विजय, विराट, विशाल या वाणाचे बीज उपलब्ध करून ठेवावे. करडई

  • करडई पिकाच्या पेरणीसाठी एस.एस.एफ. ७०८, फुले चंद्रभागा या सुधारित वाणांची निवड करावी. 
  • पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास अॅझोटोबॅक्टर २५ ग्रॅम अधिक पी.एस.बी. २५ ग्रॅम आणि बुरशीजन्य रोगापासून रोप अवस्थेतील संरक्षणासाठी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिकिलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
  • कांदा

  • अवस्था ः पुनर्लागवड
  • पुनर्लागवडीच्या वेळी रोपे कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात २ तास बुडवून ठेवावीत, यामुळे रोपे रूजू होण्याच्या दरम्यान बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो. 
  • तुषार सिंचनाचा वापर केल्यास फुलकिडीचे काही प्रमाणात नियंत्रण होते.
  •  मातीत ओलावा असताना हेक्टरी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १२५० ग्रॅम अधिक ॲझोस्पिरीलम ५ किलो अधिक पीएसबी ५ किलो प्रती १०० किलो गांडूळखत किंवा चांगले कुजलेल्या कंपोस्टखतात मिसळून टाकावे. यामुळे रोप कोलमडत नाहीत. रोपांची वाढ निकोप होते. 
  • रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी एकरी २५-३० पिवळे चिकट सापळे लावावेत.
  • बाजरी     चिकटा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच, फवारणी प्रतिलिटर पाणी     कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्ल्यूपी) ३ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) ३ ग्रॅम.  कापूस अवस्था ः पाते लागणे ते फुले उमलणे     बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे विषाणूजन्य कीटकनाशक (हेक्टरी ५०० एल.ई.)  १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

    सोयाबीन

  • अवस्था ः शेंगा लागणे
  • स्पोडोप्टेरा अळीच्या जैविक नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
  • एस.एल.एन.पी.व्ही. १ मिली किंवा नोमुराईया रिलेई ५ ग्रॅम. 
  • सोयाबीनवरील स्पोडोप्टेरा, हिरवी उंट अळी, गर्डल बीटलच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
  • क्लोरॲण्ट्रानीलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.३ मिली किंवा फ्ल्युबेन्डायअमाईड (३९.३५ टक्के प्रवाही) ०.२ मिली अथवा लुफेनुरॉन (५.४ टक्के प्रवाही) १.२ मिली. 
  • तूर अवस्था ः फुलोऱ्याची अवस्था लवकर येणाऱ्या वाणावरील फुलकळी व शेंगांच्या संरक्षणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी क्लोरॲण्ट्रानीलीप्रोल (१८.५% प्रवाही) ०.३ मि.ली. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५% पाण्यात विरघळणारे) ०.४ ग्रॅम.

     ः ०२४२६ २४३२३९ (कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com