agriculture stories in Marathi, Crop advice Rahuri region | Agrowon

कृषी सल्ला (राहुरी विभाग)
कृषी विद्या विभाग, राहुरी
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

रब्बी ज्वारी

रब्बी ज्वारी

 • अवस्था ः पेरणीपूर्व तयारी
 • रब्बी ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करावी. 
 • पेरणीसाठी जाती 
 • हलकी जमीन- सिलेक्शन-३, फुले माऊली 
 • मध्यम जमीन- फुले चित्रा, फुले माऊली, मालदांडी-३५-१ 
 • भारी जमीन- वसुधा, फुले यशोदा, सी.एस.वही.-२२ 
 • बागायतीसाठी- फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.वही.-२२ या वाणांचा वापर करावा. 
 • ज्वारीची पेरणी ४५ x १५ सें मी. अंतरावर करावी. 
 • पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक (३०० मेष) चोळावे. तसेच २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर व पी.एस.बी. या जिवाणू संवर्धकांची प्रक्रिया करून हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. 

गहू
अवस्था ः पेरणीपूर्व तयारी
एक नांगरट करून ३-४ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर ८-१० टन प्रतिहेक्टर कंपोस्टखत टाकावे.

हरभरा
अवस्था ः पेरणीपूर्व तयारी
हरभरा हे रब्बी हंगामातील पीक असल्याने कोरडे व थंड हवामान त्याला मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे २५ सप्टेंबरनंतर जमिनीची ओल उडून जाण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय हा वाण वापरावा. बागायती हरभरा २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान पेरावा. त्याकरिता दिग्विजय, विराट, विशाल या वाणाचे बीज उपलब्ध करून ठेवावे.

करडई

 • अवस्था ः पेरणीपूर्व तयारी
 • करडई पिकाच्या पेरणीसाठी एस.एस.एफ. ७०८, फुले चंद्रभागा या सुधारित वाणांची निवड करावी. 
 • पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास अॅझोटोबॅक्टर २५ ग्रॅम अधिक पी.एस.बी. २५ ग्रॅम आणि बुरशीजन्य रोगापासून रोप अवस्थेतील संरक्षणासाठी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिकिलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

कांदा

 • अवस्था ः पुनर्लागवड
 • पुनर्लागवडीच्या वेळी रोपे कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात २ तास बुडवून ठेवावीत, यामुळे रोपे रूजू होण्याच्या दरम्यान बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो. 
 • तुषार सिंचनाचा वापर केल्यास फुलकिडीचे काही प्रमाणात नियंत्रण होते.
 •  मातीत ओलावा असताना हेक्टरी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १२५० ग्रॅम अधिक ॲझोस्पिरीलम ५ किलो अधिक पीएसबी ५ किलो प्रती १०० किलो गांडूळखत किंवा चांगले कुजलेल्या कंपोस्टखतात मिसळून टाकावे. यामुळे रोप कोलमडत नाहीत. रोपांची वाढ निकोप होते. 
 • रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी एकरी २५-३० पिवळे चिकट सापळे लावावेत.

बाजरी
    चिकटा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच, फवारणी प्रतिलिटर पाणी
    कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्ल्यूपी) ३ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) ३ ग्रॅम. 

कापूस
अवस्था ः पाते लागणे ते फुले उमलणे
    बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे विषाणूजन्य कीटकनाशक (हेक्टरी ५०० एल.ई.) 
१ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

सोयाबीन

 • अवस्था ः शेंगा लागणे
 • स्पोडोप्टेरा अळीच्या जैविक नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
 • एस.एल.एन.पी.व्ही. १ मिली किंवा नोमुराईया रिलेई ५ ग्रॅम. 
 • सोयाबीनवरील स्पोडोप्टेरा, हिरवी उंट अळी, गर्डल बीटलच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
 • क्लोरॲण्ट्रानीलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.३ मिली किंवा फ्ल्युबेन्डायअमाईड (३९.३५ टक्के प्रवाही) ०.२ मिली अथवा लुफेनुरॉन (५.४ टक्के प्रवाही) १.२ मिली. 

तूर
अवस्था ः फुलोऱ्याची अवस्था
लवकर येणाऱ्या वाणावरील फुलकळी व शेंगांच्या संरक्षणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी
क्लोरॲण्ट्रानीलीप्रोल (१८.५% प्रवाही) ०.३ मि.ली. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५% पाण्यात विरघळणारे) ०.४ ग्रॅम.

 ः ०२४२६ २४३२३९
(कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

इतर कृषी सल्ला
हवामान बदल रोखण्यासाठी पावले उचलण्याची...हवामान बदलावरील आंतरसरकारी पॅनेल (...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात अवस्था ः फुलोरा ते दाणे भरणे अवस्था...
सीताफळावरील पिठ्या ढेकूण व्यवस्थापनपिठ्या ढेकूण (इंग्रजी नाव - मिलीबग) ही कीड...
नियोजन रब्बी ज्वारी लागवडीचे....कोरडवाहू रब्बी ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५...
निर्मितीनंतर तणनाशकाचा...संशोधनाअंती मूलद्रव्यांचा शोध घेतल्यानंतर...
कृषी सल्ला (राहुरी विभाग)रब्बी ज्वारी अवस्था ः पेरणीपूर्व तयारी...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात अवस्था - फुलोरा ते दाणे भरणे काही...
भातावरील निळ्या भुंगेऱ्याचे नियंत्रणभुंगेरे गर्द निळ्या रंगाचे तर अळी भुरकट पांढऱ्या...
नियोजन रब्बी पिकांच्या लागवडीचे...कोरडवाहू शेतीत प्रति हेक्टरी रोपांची योग्य‍...
तणनाशकांची परिणामकारकता वाढविण्याचा...मजुरांच्या कमतरतेमुळे तणनाशकांचा वापर वाढला असला...
कपाशीवरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणसुसरे (जि. नगर) तसेच परभणी जिल्ह्यातही कापूस...
केळीच्या पिल बागेतील सिगाटोका रोगाचे...केळी पिकावर दरवर्षी पिवळा करपा म्हणजेच ‘सिगाटोका...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
कृषी सल्ला : बीटी कापूस, सोयाबीन, मूग,...या वर्षी पावसाचे आगमन उशिरा झाले असले तरी काही...
गाजरगवत निर्मूलनासाठी नियमित सामुदायिक...पडीक जमिनी, मोकळ्या जागा, रस्त्याच्या कडा या...
पावसाचे प्रमाण कमी होत जाणारपालघर, नंदूरबार, धुळे, जळगाव नाशिक व विदर्भातील...
पावसाच्या खंड काळात घ्यावयाची काळजीपिकांची उगवण झाल्यावर सर्वसाधारण १५ ते २०...
पूरग्रस्त द्राक्षवेलीची मुळे कार्यरत...सांगली जिल्ह्यातील द्राक्ष विभागामध्ये जास्त...
कार्यक्षमता वाढवण्यासाठी तणनाशकांसोबत...बहुतेक शेतकरी बंधू पावसाळ्यात पावसाची शक्‍यता...
पीक फेरपालटाद्वारे जपा जमिनीची सुपीकता महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही कोरडवाहू असून,...