agriculture stories in marathi CROP ADVICE ( Rahuri region) | Agrowon

कृषी सल्ला (राहुरी विभाग)
कृषी विद्या विभाग, राहुरी
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

हवामान अंदाज ः
पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहील. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेल्या शेती मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
पाऊस झालेल्या ठिकाणी शेतातील अतिरिक्त पाणी शेताच्या बाहेर काढावे.
पावसाळ्यात फवारणी करताना स्टीकरचा वापर करावा. पिकांमध्ये कोणतेही कार्य करण्यापूर्वी पावसाचा अंदाज घ्यावा.

गहू

हवामान अंदाज ः
पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहील. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेल्या शेती मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
पाऊस झालेल्या ठिकाणी शेतातील अतिरिक्त पाणी शेताच्या बाहेर काढावे.
पावसाळ्यात फवारणी करताना स्टीकरचा वापर करावा. पिकांमध्ये कोणतेही कार्य करण्यापूर्वी पावसाचा अंदाज घ्यावा.

गहू

 • अवस्था -पेरणी
 • वेळेवर बगायती गव्हाची पेरणी करण्याकरिता विद्यापीठाने विकसित केलेल्या जातींची निवड करावी. १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत बीजप्रक्रिया करून पेरणी करावी.
 • बीजप्रक्रिया : थायरम ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे. त्याचप्रमाणे प्रतिकिलो बियाण्यास २५ ग्रॅम ॲझेटोबॅक्टर व २५ ग्रॅम पीएसबी या जिवाणूखताची बीजप्रक्रिया करावी.

ऊस

 • अवस्था - वाढीची
 • पूर्व हंगामी ऊस लागवड करण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या जातींची निवड करावी.
 • बेणे प्रक्रिया : बुरशीजन्य रोग व खवले कीड यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी ऊस बेणे लागवडीपूर्वी डायमेथोएट (३०% प्रवाही) २.६५ मिली प्रतिलिटर पाणी या द्रावणामध्ये १० मिनिटांसाठी बुडवून ठेवावे.

बटाटा
अवस्था ः पेरणी
रब्बी हंगामासाठी बटाटा या पिकांची लागवड करावी. लागवडीसाठी कुफरी ज्योती, कुफरी लवकर, कुफरी सिंधुरी, कुफरी सूर्या इ. जातींचा वापर करावा.

वाटाणा
अवस्था ःपेरणी
रब्बी हंगामासाठी वाटाणा या पिकाची लागवड करावी. लागवडीसाठी बोनव्हिला, अरकेल, फुले प्रिया इ. वाणांचा वापर करावा.

तूर

 • अवस्था- शेंगा भरण्याची अवस्था
 • तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल तर १९:१९:१९ किंवा ००:५२:३४ या खताची फवारणी ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात करावी.
 • ढगाळ हवामान आणि पाऊस अशा वातावरणात ठिपक्यांची शेंगा पोखरणाऱ्या (मरुका) अळीचा प्रादुर्भाव वाढतो. फूल व कळीचे मोठे नुकसान होते. तसेच शेंगा पोखरणाऱ्या (घाटे अळी) अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव आढळल्यास या किडींच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरॅक्टिन (३०० पीपीएम) ५ मिली किंवा एचएएनपीव्ही (५०० एलई) १ मिली किंवा क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) १.६ मिली किंवा
 • फ्लुबेंडायअमाईड (२०% दाणेदार) ०.५ ग्रॅम किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५% प्रवाही) ०.३ मिली. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी पंधरा दिवसांच्या अंतराने करावी.
 • मर आणि वांझ रोगाची झाडे आढळल्यास ती उपटून योग्य रीतीने विल्हेवाट लावावी. अशी झाडे खोड खड्ड्यात गाडून नष्ट करावीत.
 • शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड (४५% प्रवाही) ०.२५ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

हरभरा

 • अवस्था - लागवड
 • बागायती हरभऱ्याची लागवड १० नोव्हेंबर या कालावधीत करून घ्यावी.
 • पेरणीसाठी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या वाणांना प्राधान्य द्यावे.
 • मुळकुज आणि मानकुजव्या रोगापासून होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी किंवा २.५ किलो प्रतिहेक्टरी शेणखत किंवा गांडूळखतासोबत जमिनीत टाकावे.
 • जिरायत हरभरा पिकात गरज असल्यास खुरपणी किंवा कोळपणी करावी.

ज्वारी

 • खोडकिडीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस (२५ ई.सी.) १.५ मिली प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 • या पिकावर मुख्यत: मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (३०% प्रवाही) १.५ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

करडई
या पिकावर मुख्यत: मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (३०% प्रवाही) १.५ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

भाजीपाला पिके
१) रसशोषक किडी : व्हर्टिसीलियम लेकॅनी ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी, निंबोळी अर्क ४ टक्के फवारणी करावी.
२) पाने आणि फळे खाणाऱ्या अळ्या : निंबोळी अर्क (४ टक्के), बिव्हेरिया बॅसियाना ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी, एच.एन.पी.व्ही. (हेलिओकील) १ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

टोमॅटो

 • अवस्था - फळे लागणे
 • टोमॅटोवरील रसशोषक किडी (फुलकिडे, पांढरी माशी व मावा) यांच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड (१८ एस.सी.) ०.५ मिली किंवा फिप्रोनील (५ इसी) १.५ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
 • करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

संपर्क ः ०२४२६-२४३२३९
(कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

इतर ताज्या घडामोडी
वाशीम जिल्ह्यात रब्बीत होणार एक लाख...वाशीम : जिल्ह्यात या रब्बी हंगामासाठी एक लाख...
खानदेशातील बाजारांमध्ये ज्वारीची आवक...जळगाव : अतिपावसामुळे खानदेशात ज्वारीचे आतोनात...
कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधारअकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात...
अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसानअमरावती : मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात तीन...
नाशिक जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवर...नाशिक : ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे जिल्ह्यातील...
 बारामती उपविभागात ४३ हजार हेक्टरवरील...पुणे ः मॉन्सूनोत्तर पावसाने बारामती...
मराठवाड्यात ४१ लाख ४९ हजार हेक्टरवरील...औरंगाबाद  : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४१...
पुणे बाजार समितीत ‘आंबेमोहर’च्या दरात...पुणे  ः आंबेमोहर तांदळासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी...सोलापूर  ः कोरड्या आणि ओल्या दुष्काळामुळे...
नगर : रब्बी ज्वारीचा १ लाख ९१ हजार...नगर  ः मॉन्सूनोत्तर पाऊस जोरात झाला असला तरी...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १३ टक्के...सातारा  : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत...अर्धापूर, जि. नांदेड  : शेतकऱ्यांच्या...
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषदकोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर...
आंदोलनाचा दणका; केळी पीकविमा...अकोला  ः २०१८-१९ या वर्षात केळी उत्पादक...
ऊस दराबाबत आज कोल्हापुरात बैठककोल्हापूर : यंदाच्या ऊस दरावर सकारात्मक तोडगा...
शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिनमुंबई  : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा...
पीकविम्यासाठी पुण्यात चौथ्या दिवशीही ...पुणे  ः गेल्या वर्षीचा खरीप पीकविमा न...
औरंगाबादमध्ये कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...