कृषी सल्ला : ऊस, बटाटा, ज्वारी, करडई, सुर्यफूलसह फळपिके

कृषी सल्ला 
कृषी सल्ला 

हवामान पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून, किमान तापमानात घट होईल. तापमान १०-१२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ऊस कांडी किडीच्या व्यवस्थापनासाठी एकरी दोन फुले ट्रायकोकार्ड्स दर १५ दिवसांनी ऊस तोडणी पूर्वी एक महिन्यापर्यंत लावावीत. बटाटा तुडतुडे, मावा आणि पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ४ टक्के किंवा कडूनिंब आधारित कीटकनाशक (ॲझाडिरेक्टिन १००० पीपीएम) ३ ते ४ मि.लि. प्रतिलिटर पाणी फवारणी करावी. रब्बी ज्वारी लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी मेलॅथिऑन (५ टक्के भुकटी) २० किलो प्रतिएकरी या प्रमाणात सकाळी वारा शांत असताना धुरळावी. करडई मावा किडीच्या नियंत्रणासाठी ॲसिटामिप्रिड (२० टक्के पाण्यात मिसळणारी पावडर) २ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. सुर्यफूल मावा तुडतुडे या रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी १० मिली डायमेथोएट ३०% प्रवाही प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पशुधन व्यवस्थापन फळ पिके किमान तापमानात घट होऊन तापमान १० ते १२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या वेळी फळ बागांना रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे. डाळिंब सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा प्लस २५ ग्रॅम अधिक शेणखत २.५ किलो अधिक निंबोळी पेंड २.५ किलो चांगले मिसळून बांगडी पद्धतीने प्रति झाड द्यावे. त्यानंतर हलके मातीआड करून पाणी देणे. चिकू बी पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस (५० टक्के) १ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ई.सी.)१ मि.लि. किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ ई.सी. प्रवाही) १ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. संपर्क ः ०२४२६- २४३२३९ (कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com