कृषी सल्ला (राहुरी विभाग)

राहुरी विद्यापीठाच्या कक्षेतील सहा जिल्ह्यासाठी पीकनिहाय सल्ला.
कृषी सल्ला (राहुरी विभाग)
कृषी सल्ला (राहुरी विभाग)

      गहू  उगवण ते रोप अवस्था  पेरणीनंतर तीन दिवसांच्या आत तणनियंत्रणासाठी पेन्डिमिथॅलीन (३० टक्के ईसी) ७ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.  पिकावर बारीक अळ्या व पानावर पांढरे डाग आणि शेंडे खाल्लेले दिसून येताच किंवा पीक तीन आठवड्यांचे झाले असता निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.   पेरणीनंतर २१ दिवसांनी खुरपणी करून नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. त्यानंतर पाणी द्यावे.      हरभरा  उगवण ते रोप अवस्था  हरभरा पिकासाठी १५ ते २० दिवसांनी विरळणी करणे.  हरभरा पेरणीनंतर २० दिवसांनी पहिली व ३० दिवसांनी दुसरी कोळपणी करणे.  कोळपणीनंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी खुरपणी करणे.     करडई  रोप अवस्था  करडईच्या बेचक्यातील अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात.  जमिनीत पडणाऱ्या भेगातून पाण्याचे बाष्पीभवन होते. जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी व हवा खेळती राहण्यासाठी व तणांच्या नियंत्रणासाठी शेतात २५ ते ३० दिवसांनी कोळपणी करून घ्यावी.     रब्बी ज्वारी  पीक वाढीची अवस्था  गरजेप्रमाणे दुसरी खुरपणी करावी. पेरणीनंतर ८ आठवड्यांनी दातेरी कोळप्याने कोळपणी करून गरज पडल्यास दुसरे संरक्षित पाणी द्यावे.    कांदा कांदा या पिकावर फुलकिडे व करपा आढळून येत आहेत. त्यांच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि.लि. अधिक टेब्यूकोनॅझोल १ मि.लि. अधिक स्टिकर १ मि.लि.     तूर  काढणी  पीक कालावधी व वाणांची पक्वतेनुसार तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावे. खळ्यावर मळणी करावी.   तूर पिकाचा खोडवा घेऊ नये. खोडवा घेतल्यास वांझ या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.  साठवण : साठवणुकीपूर्वी तूर धान्य ५-६ दिवस चांगले उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. शक्य असल्यास कडुनिंबाचा पाला ५ टक्के प्रमाणात धान्यात मिसळून धान्य साठवावे. धान्याची साठवण कोंदट व ओलसर जागेत करू नये.

जनावरांची हिवाळ्यात घ्यावयाची काळजी गेल्या आठवड्यापासून तापमानात अचानक घट झालेली आहे. रात्रीच्या वेळी थंडी तर दिवसा कडक ऊन अशी विषम परिस्थिती तयार झाली आहे. हा ऋतू आरोग्यदायक असला तरी लहान करडे, कोकरे, वासरे यांचे थंडीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्यायला आलेल्या जनावरांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी   जनावरांच्या गोठ्यांना बारदान किंवा शेडनेटचे पडदे लावावेत. गोठ्यामधील उष्णता टिकून राहण्यासाठी ५०० ते १००० वॉटचे बल्ब गोठ्यामध्ये कमी उंचीवर लावावेत. शक्य झाल्यास गोठ्यामध्ये शेकोटी पेटवावी.   गाभण जनावरांना व छोट्या जनावरांना रात्रीच्या वेळी वाळलेले गवत, कडबा, गोणपाट यांची बिछायत टाकावी.   गोठा कोरडा राहील याची कटाक्षाने काळजी घ्यावी. त्यासाठी दर ८ ते १० दिवसांनी गोठ्यामध्ये चुना भुरभुरावा.   थंडीचे प्रमाण जास्त वाढल्यास जनावरांच्या अंगावर गोणपाट बांधावे. विशेषत: गाभण गायी-म्हशींची जास्त काळजी घ्यावी.   जनावरांना जास्तीत जास्त ऊर्जा मिळण्यासाठी जनावरांच्या आहारात शेंगदाणा पेंड, सरकी पेंड यांचा वापर वाढवावा.   शक्य असल्यास बायपास फॅट व प्रथिनयुक्त आहार द्यावा.   क्षार व जीवनसत्त्वाचे मिश्रण वाढवावे.   सकाळच्या वेळी हिरवा चारा व रात्रीच्या वेळी वाळलेला चारा द्यावा.   चराऊ जनावरांना चरण्यासाठी नेताना सकाळी उशिरा न्यावे, जेणेकरून गवतावर दहिवर नसेल.  गोगलगाईचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी जनावरे चरावयास नेऊ नयेत.   सर्दीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास जनावरांच्या नाकाभोवती टरपेंटाइनचा बोळा फिरवावा. सर्दीचा रंग हिरवट-पिवळसर असल्यास तातडीने पशुवैद्यकाच्या सल्ला घ्यावा.   जनावरांचे पिण्याचे पाणी अतिथंड नसावे.   जनावरे धुवायची झाल्यास शक्यतो दुपारच्या वेळी धुवावीत.   लाळ्या-खुरकूत आजारापासून संरक्षणासाठी जनावरांना लसीकरण करावे.  

‘ॲग्रोवन’ टिप्स-   कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत.  फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे.  

०२४२६- २४३२३९, (ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com