agriculture stories in marathi crop advice for vegetable, fruit crops | Agrowon

कृषी सल्ला

कृषी विद्या विभाग, दापोली
गुरुवार, 16 जानेवारी 2020

वाल 
फुलोरा अवस्था

वाल 
फुलोरा अवस्था

 • वाल पिकावरील शेंगा पोखरणारी अळी, घाटे अळीच्या नियंत्रणासाठी पीक फुलोऱ्यात असताना शेतामध्ये पक्षी थांबे उभे करावेत. आवश्यकता भासल्यास क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि. ली. प्रतिलिटर पाणी फवारणी करावी. किंवा निंबोळी अर्क ५ टक्के पीक फुलोऱ्यात असताना किंवा किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर फवारणी करावी.  
 • वाल पीक फुलोऱ्यात येण्याची व दाणे भरण्याची अवस्था ओलाव्यासाठी अति संवेदनशील असते. सध्या त्यातील महत्त्वाची फुलोरा येण्याची अवस्था असून, पाणी देण्याची व्यवस्था करावी. 

आंबा
पालवी व बोंगे फुटणे अवस्था 

 • तापमानात वाढ संभवत असल्याने आंबा पिकावर तुडतुडे व फुलकिडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यासाठी मोहोराचे तुडतुडे व फुलकीड आणि भुरी रोगापासून संरक्षण करण्याकरिता आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार दुसरी फवारणी करावी. 
 • बोंगे फुटताना, कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी - लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मि.ली. अधिक हेक्झाकोनॅझोल (५% प्रवाही) ५ मि.ली. प्रति १० लिटर पाणी.  
 • पालवी अवस्थेत असलेल्या आंबा पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यापासून संरक्षणासाठी आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रकानुसार पहिली फवारणी डेल्टामेथ्रीन (२.८% प्रवाही) १ मि.ली. प्रतिलिटर पाणी या प्रमाणे करावी.

काजू
मोहोर अवस्था

हवामान अंदाजानुसार, मोहोर अवस्थेतील काजू पिकावर ढेकण्या व फुलकिडींच्या वाढीसाठी हवामान अनुकूल दिसत आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी मोहोर फुटण्याच्या वेळी प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

नारळ

 • नारळावर रूगोज स्पायर्लींग व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या माशीच्या प्रादुर्भावामुळे पानावर काळ्या बुरशीची वाढ दिसून येत आहे. यासाठी बागेचे नियमित सर्वेक्षण करावे. नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि.ली. 
 • पानावरील काळ्या बुरशीच्या नियंत्रणासाठी, स्टार्च १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणाची फवारणी करावी. 

कलिंगड
वाढीची अवस्था

 • कलिंगड पिकास नत्र खताचा दुसरा हप्ता ११ ग्रॅम युरिया प्रती आळे व २० ग्रॅम युरिया प्रती संकरित कलिंगडाच्या आळ्यास लागवडीनंतर एका महिन्यांनी देण्यात यावा. 
 • कलिंगड पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव आढळत असल्यास, नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात द्रावण तयार करावे. बुंध्याजवळ भिजवण करावी.

मिरची
फुलोरा अवस्था 

 • मिरची पिकास नत्र खताचा दुसरा हप्ता ६५ किलो युरिया प्रती एकरी या प्रमाणात पीक फूल व फलधारण्याचा वेळी द्यावा. 
 • मिरची पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी, डायमेथोएट (३०% प्रवाही) १ मि. ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पिकामध्ये पिवळे चिकट कागदाचे सापळे लावावेत.

काकडी 
फुलोरा अवस्था 

काकडी पिकामध्ये फुले येण्यास सुरुवात झाल्यावर फळमाशीच्या नियंत्रणासाठी क्यु ल्युर ‘रक्षक’ सापळे प्रती हेक्टरी ४ वापरावे. 

पडवळ 
फुलोरा अवस्था 

 • तापमानातील संभाव्य वाढीमध्ये पडवळ पिकावर मावा व तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी डायमेथोएट (३०% प्रवाही) १ मि. ली. प्रतिलिटर पाणी मिसळून फवारणी करावी. 
 • पिकामध्ये पिवळे चिकट सापळे लावावेत.
 • पडवळ पिकामध्ये फुले येण्यास सुरुवात झाल्यावर फळमाशीच्या नियंत्रणासाठी क्यु ल्युर ‘रक्षक’ सापळे प्रती हेक्टरी ४ वापरावे.

कोबी
वाढीची अवस्था

कोबीवर्गीय पिकामध्ये लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी खुरपणी करावी. रोपांना मातीची भर द्यावी.

वांगी 
फळधारणा 

वांगी पिकास प्रतिएकरी क्षेत्रास ४३ किलो युरिया खताची तिसरी मात्रा पुनर्लागवडीनंतर दोन महिन्यांनी द्यावी. 

भुईमूग 
वाढीची अवस्था

विनाआच्छादानावर लागवड केलेल्या भुईमूग पिकामध्ये पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी गरजेनुसार एक खुरपणी करून नंतर पिकाला स्वस्तिक अवजाराच्या साह्याने मातीची भर द्यावी.   

चवळी
फुलोरा अवस्था

चवळी पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १.२ मि. ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

 ः ०२३५८ -२८२३८७
(कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...