मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
पिकाच्या सघन वाढीमुळे तण नियंत्रण शक्य
तणांच्या नियंत्रणासाठी अधिक घनतेमध्ये गहू पिकाची लागवड करण्याचे तंत्र उपयुक्त ठरू शकते, असे निष्कर्ष ऑस्ट्रेलियातील सिडन विद्यापीठातील संशोधनामध्ये दिसून आले आहे. ऑस्ट्रेलियातील गहू पिकामध्ये आढळणाऱ्या चार प्रमुख तणांविषयी खास अभ्यास करण्यात आला. या नव्या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल वीड सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मजुरांच्या कमरतेमुळे तणांचे नियंत्रण ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या ठरत आहे. त्यातच अनेक तणांनी सध्या उपलब्ध तणनाशकांसाठी प्रतिकारकता विकसित केली आहे. नव्या तणनाशकांचा शोध सध्या घेत जात असला तरी तणांच्या नियंत्रणासाठी रसायन विरहित पद्धतींचाही शोधही आवश्यक ठरत आहे. सिडनी विद्यापीठातील संशोधक मायकेल वॉल्श यांनी पिकांची घनता वाढवून, त्याचे चार तण प्रजातींच्या बायोमास आणि बियांच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे. ही तणे ऑस्ट्रेलियातील गहू पिकामध्ये प्राधान्याने आढळतात.
- व्यावसायिक पद्धतीने गहू पिकाची लागवड १२० रोपे प्रतिवर्गमीटर इतक्या घनतेने केल्यास त्यात वाढणाऱ्या रिजिड रेग्रास, जंगली मुळा, रिपगट ब्राईम आणि जंगली ओट या तणांच्या बायोमासमध्ये अनुक्रमे ६९, ७३, ७२ आणि ४९ टक्के इतकी घट गहू पीक शेतामध्ये नसल्याच्या तुलनेमध्ये होते.
- जर गहू पिकाची लागवड ४०० रोपे प्रतिवर्गमीटर इतक्या अधिक घनतेमध्ये केल्यास, वरील तणांच्या बायोमासमध्ये अनुक्रमे १९, १३, २० आणि ३९ टक्के आणि बियांच्या उत्पादनामध्ये अनुक्रमे १२, १३, १७ आणि ४५ टक्के इतकी घट होत असल्याचे दिसून आले. गहू धान्यांचे उत्पादन तितकेच राहते.
- वॉल्श यांना पिकांच्या स्पर्धेमुळे तणे अधिक उंच वाढून आपल्या बिया पिकाच्या कॅनोपीपेक्षा अधिक वर ठेवणे शक्य होत असल्याचे दिसून आले. त्याविषयी माहिती देताना वॉल्श म्हणाले, की पिकाच्यी घनता वाढवल्यामुळे तणांना आपल्या वाढीच्या स्थितीमध्ये बदल करावा लागला आहे. परिणामी सुधारित वाढीच्या पॅटर्ननुसार तणांच्या बिया गोळा करून नष्ट करणे शक्य होणार आहे.
- 1 of 1022
- ››