कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सु
कृषी सल्ला
पावसाच्या खंड काळात घ्यावयाची काळजी
पिकांची उगवण झाल्यावर सर्वसाधारण १५ ते २० दिवसांनंतर पिकांमध्ये ४ ते ६ ओळीनंतर बळीराम नांगर अथवा कोळप्याच्या मदतीने सऱ्या काढाव्यात. यामुळे सुरवातीस पडलेला पाऊस सऱ्यांमध्ये साठविला जाऊन पाण्याची उपलब्धता वाढते. उत्पादनात १५-२० टक्के वाढ होते.
पिकांची उगवण झाल्यावर सर्वसाधारण १५ ते २० दिवसांनंतर पिकांमध्ये ४ ते ६ ओळीनंतर बळीराम नांगर अथवा कोळप्याच्या मदतीने सऱ्या काढाव्यात. यामुळे सुरवातीस पडलेला पाऊस सऱ्यांमध्ये साठविला जाऊन पाण्याची उपलब्धता वाढते. उत्पादनात १५-२० टक्के वाढ होते.
बऱ्याचवेळा सरासरी एवढा पाऊस झाला तरी नेमका पीकवाढीच्या संवेदनशील अवस्थेत पावसाचे १ ते २ खंड आढळून येतात. हे पावसाचे खंड बऱ्याचवेळा जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात आढळून येतात. हा पावसाचा अनियमितपणा किंवा खंड पिकांच्या सुरवातीच्या अवस्थेत, पिकांच्या मध्यावस्थेत आणि पक्वतेच्या काळातसुद्धा येऊ शकतो आणि त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. सर्वसाधारणपणे पाऊस नेहमीपेक्षा उशिरा सुरू होणे, पाऊस नेहमीपेक्षा लवकर बंद होणे, पाऊस वेळेवर सुरू होणे व मध्येच मोठा खंड पडणे आणि अतिवृष्टी होणे अशाप्रकारे कोणतीही एक आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या मराठवाडा विभागात अनेक ठिकाणी पावसाचा खंड आढळून येत आहे. काही ठिकाणी वेळेवर पेरणी झाली त्याठिकाणी पिकांची वाढ समाधानकारक आहे. परंतु, पावसाच्या खंडामुळे पिकांचे व्यवस्थापन योग्य रितीने करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी उशिरा पेरणी झाली आहे, तेथे पिकांसाठी पावसाचा खंड काळात योग्य उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे.
पाणी व्यवस्थापन
- या काळात विहीर किंवा शेततळ्यात पाणी असल्यास पिकांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित पाणी सिंचन (तुषार किंवा ठिबक सिंचन) द्वारे द्यावे.
- खरिपातील पिकांची उगवण झाल्यावर सर्वसाधारण १५ ते २० दिवसांनंतर पिकांमध्ये ४ ते ६ ओळीनंतर बळीराम नांगर अथवा कोळप्याच्या मदतीने सऱ्या काढाव्यात. यामुळे सुरवातीस पडलेला पाऊस सऱ्यांमध्ये साठविला जाऊन पाण्याची उपलब्धता वाढते. उत्पादनात १५-२० टक्के वाढ होते. उशिरा झालेला पाऊस सऱ्यांमध्ये मुरविला जातो, जो पुढे रब्बी पिकांना लाभदायक ठरतो.
- कोळपणी करून मातीची भर देणे
- पावसाचा खंड काळात पिकांच्या अवस्थेनुसार हलक्या कोळपण्या कराव्यात, पिकांना मातीची भर द्यावी, भेगा बुजविल्या जातात. याद्वारे ओलावा साठवून ठेवण्यात मदत होते.
तण व्यवस्थापन
- तणे ही अन्नद्रव्ये व जमिनीतील ओलावा यासाठी पिकांसोबत स्पर्धा करतात. तणांना पिकापेक्षा दोन ते तीन पट अधिक प्रमाणात पाणी लागते. पावसाच्या ताणाच्या काळात पिकांतील तणांचे योग्य वेळी नियंत्रण करावा.
- कोळप्याने वरचेवर उथळ मशागत (हलकी कोळपणी) करावी. यामुळे पिकाबरोबर तणांची स्पर्धा कमी होऊन जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकेल. झाडा भोवती हलकीशी चाळणी करावी. तण काढून घ्यावे व झाडाभोवती मातीचे अव्छादन करावे, त्यामुळे जमीन भुसभुसीत होण्यास मदत होते. भेगा बुजविल्या जाऊन बाष्पीभवनाद्वारे पाणी जे वाया जाते ते वाचविले जाते. यामुळे १० ते १५ मि. मी. ओलाव्याची बचत होते. गरजेनुसार निंदणी व कोळपणी करून तणांचे नियंत्रण करावे. तसेच परिस्थितीनुसार तणनाशकांचा वापर करावा.
ः डॉ. आनंद गोरे, ९५८८६४८२४२ ,
ः अभिजित कदम, ८२७५०५१५०७
(वसंतराव नाईक मराडवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
- 1 of 39
- ››