agriculture stories in Marathi Crop micro climate measuring instruments | Agrowon

पिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणे

डॉ. प्रल्हाद जायभाये
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

या वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, त्यामुळे साठलेला जलसाठा व भूजल पातळीत होणारी वाढ यांचे काटेकोरपणे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी पिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणे फायद्याची ठरतील.

या वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, त्यामुळे साठलेला जलसाठा व भूजल पातळीत होणारी वाढ यांचे काटेकोरपणे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी पिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणे फायद्याची ठरतील.

कृषी क्षेत्रातून मिळणारे उत्पादन हे पाण्याच्या उपलब्धतेशिवाय शाश्वत होणे अवघड आहे. महाराष्ट्रातील बहुतांश क्षेत्र हे कोरडवाहू असून, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता ही केवळ पावसाद्वारे होते. अशा स्थितीमध्ये जमिनीच्या कणांमध्ये, भूजलामध्ये साठलेले उपलब्ध पाणी अत्यंत कार्यक्षमतेने वापरणे गरजेचे होते. पिकांची वाढ होण्यासाठी पावसासोबतच हवामानातील स्वच्छ पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश असे अनेक घटक कारणीभूत असतात. त्यांच्यामुळे पिकाच्या वाढीसाठी आवश्यक ते सूक्ष्म वातावरण तयार होते. त्याच्या जोडीला भरपूर पोषणमूल्य आणि उपयुक्त जिवाणूंची संख्या अधिक असलेली सकस जमीन असणे आवश्यक आहे. सूक्ष्म वातावरणाचे मापन करण्यासाठी विविध यंत्रे, उपकरणे आता उपलब्ध होत आहेत. सध्या काही प्रमाणात प्रगतिशील फळ उत्पादक (उदा. द्राक्ष, डाळिंब इ.) हवामान मापके व त्यातून मिळणाऱ्या अंदाजांचा वापर करत आहेत. मात्र, अन्य शेतकरी या महत्त्वाच्या बाबीकडे आवश्यक तितके लक्ष देताना दिसत नाहीत.

पिकांमध्ये वापरायची सूक्ष्मवातावरण मोजण्याची उपकरणे ही आकाराने लहान असून, थोड्याशा कौशल्याने शेतकरीही वापरू शकतात. या यंत्रे, उपकरणाच्या वापरामुळे जमिनीमध्ये पडलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब योग्य प्रकारे पीक वाढीसाठी वापरणे शक्य होते. कृषी हवामानशास्त्राचा अभ्यास व संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही यंत्रे उपयुक्त ठरतात. त्याच प्रमाणे हवामानाचा पिकावरील परिणाम जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दैनंदिन कामांच्या नियोजनासाठी फायदेशीर ठरू शकतात.

सूक्ष्महवामान मोजण्यासाठी शास्त्रीय उपकरणे 

१. अवरक्त तापमापी ( इन्फ्रारेड थर्मामीटर ) : पिकाचे, झाडाचे किंवा पानाचे तापमान मोजण्यासाठी अवरक्त किरणांच्या तत्त्वांचा वापर करता येतो. या तंत्राने दूरवरून (रिमोट सेन्सिंग ) तापमान मोजता येते. सद्यस्थितीत कोरोना रोखण्यासाठी माणसाचे तापमान मोजण्यासाठी अशाच तंत्रावर आधारीत तापमापीचा वापर होत आहे.

२. भूतापमापी (सॉईल थर्मामीटर ) : या उपकरणाने जमिनीचे विविध खोलीवरील तापमान मोजता येते. साधारणपणे ५ सेंमी ते ६० सेंमी या क्षेत्रामध्ये पिकांची मुळे पसरलेली असतात. मुळाच्या परिसरातील जमिनीचे तापमान मोजता येते. तापमान मोजून त्यात आवश्यकतेनुसार योग्य ते बदल घडवून आणता येतात. 

३. बाष्प मापी ( हायग्रोमीटर ) : या उपकरणाच्या साह्याने पिकांमधील सापेक्ष आर्द्रता व बाष्प दाब तूट, (व्हेपर प्रेशर डीफिसिएट) काढले जाते. 

४. प्रेशर चेंबर किंवा प्रेशर बॉब (पर्णजल विभव मापन यंत्र ) : या उपकरणाचा वापर करून झाडाच्या पानामध्ये किती प्रमाणात पाणी आहे, हे काढता येते. याला पानातील पाण्याचे प्रमाणाला शास्त्रीय भाषेमध्ये पर्णजल विभव असे म्हणतात.

५. एकूण सूर्यकिरण मोजमापी (नेट रेडिओ मीटर) : या उपकरणाच्या साह्याने पिकांवर पडलेले, पिकांच्या मध्ये शिरलेले, जमिनीपर्यंत पोहोचलेले आणि जमीन व पीक यापासून परावर्तित केलेली सूर्यकिरणे मोजली जातात. त्यांतील पिकाच्या बाष्पोत्सर्जन व प्रकाश संश्लेषण याकरिता उपलब्ध असणारी ऊर्जा अथवा किरणे यांचे प्रमाण मिळवता येते.

६. पायरेनो मीटर ः या यंत्राद्वारे सूर्यापासून पिकास मिळालेले एकूण प्रकाश संश्लेषण उपयुक्त किरणे, ऊर्जा आणि पिकापासून परावर्तित किरणे, ऊर्जा मोजता येते. 

शास्त्रीय उपकरणाच्या साह्याने सूक्ष्मवातावरणाच्या विविध नोंदी घेता येतात. त्यांचा वापर करून पिकांची पाण्याची गरज काटेकोरपणे अचूक
काढता येते. कसे ते पाहू.

झाडांस किंवा पिकास पाणी देण्याची गरज आहे...
अ) अवरक्त तापमापीने पिकाचे तापमान हे वातावरणाच्या तापमानापेक्षा अधिक दाखवले तर.
ब) भुतापमापीने जमिनीचे तापमान अधिक दाखविले तर.
क) हायग्रोमीटरने शुष्क तापमान हवेच्या तापमानापेक्षा अधिक दाखविले
ड) बाष्प दाब तूट ( व्हेपर प्रेशर डीफिसिट) अधिक आढळली,
इ) पर्ण जल विभव व मापन यंत्राने पानाचे पर्ण जलविभव अधिक दाखविल्यास.
ई) नेट रेडिओ मीटर व पायरेनोमीटरद्वारे सूर्यकिरणांचे परावर्तन हे अधिक असल्याचे आढळल्यास.

या सर्व निरीक्षणाचा अर्थ असा की, मृदबाष्प, पिकातील, झाडातील पाण्याचे प्रमाण कमी आहे. पिकाला पाणी देण्याची गरज आहे.

पिकाला आवश्यक पाण्याची गरज काढण्यासाठी वरीलपैकी कुठल्याही एका उपकरणाचा वापर करता येतो. मात्र, एकापेक्षा अधिक उपकरणाचा वापर केल्यास सिंचनाची मात्रा अचूकपणे काढता येते.
या हवामान व तापमानाशी संबंधित उपकरणांच्या नोंदी वेगवेगळी उपकरण स्वतंत्र वापरून नोंदी घेता येतात. शेतकऱ्याला हे एक किंवा दोन शेतासाठी करणे शक्य असले तरी मोठ्या क्षेत्रासाठी अडचणी येऊ शकतात. मात्र, त्यासाठी मनुष्यबळ लागू शकते. अलीकडे डिजिटल डिस्प्ले असलेले उपकरणे उपलब्ध झाली आहेत.

स्वयंचलित हवामान केंद्र ः

संगणकीय प्रणाली वापरून स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून नोंदी घेता येतात. पिकाभोवतीच्या सूक्ष्मवातावरणानुसार कीड रोगाचा प्रादुर्भावाच्या शक्यता लक्षात येऊ शकतात. त्यानुसार अंदाज वर्तवणाऱ्या संगणकीय प्रणालीही उपलब्ध आहेत. त्यातील काही ऑनलाईन आणि मोबाईलद्वारे चालवता येत असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माहिती उपलब्ध होत राहते. द्राक्षासारख्या हवामानासाठी संवेदनशील असलेल्या पिकांमध्ये अलीकडे यांचा वापर वाढत आहे. त्याची सुलभता वाढत जाईल, त्याचा प्रारंभीचा खर्च आवाक्यात येईल, तसतसा अन्य पिकामध्येही स्वयंचलित हवामान केंद्रांचा वापर हळूहळू वाढत जाणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांना संपूर्ण स्वयंचलित केंद्र बसवणे शक्य नाही, त्यांनी वरील पैकी एक किंवा अधिक उपकरणांचा वापर जरूर करावा. त्यातून पिकाचे व त्यासाठी लागणाऱ्या सिंचनाचे काटेकोर व्यवस्थापन करता येईल. आपल्याकडे उपलब्ध प्रति थेंब पाण्यातून पिकाची उत्पादकता वाढविता येईल. खरिपात वाचलेले पाणी पुढील रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते.

डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९
(कृषी हवामान शास्त्रज्ञ आणि प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, जालना अंतर्गंत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...
वितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...
अत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...
दूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...
प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...
हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...
चाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...
अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...
स्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...
सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...
पिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...
यांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...
विरळणी, तण काढणी करा झोपून!अत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
योग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...
आले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
आरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रदेशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे...