हरितगृहामध्ये आर्द्रता कमी करण्यासोबत पाण्याची उपलब्धता

हरितगृहामध्ये आर्द्रता कमी करण्यासोबत पाण्याची उपलब्धता
हरितगृहामध्ये आर्द्रता कमी करण्यासोबत पाण्याची उपलब्धता

हरितगृहामध्ये वातावरण नियंत्रणासाठी सातत्याने ऊर्जा खर्च करावी लागते. सापेक्ष आर्द्रता आणि तापमान या दोन्ही परस्परभिन्न गोष्टींतील संतुलन अत्यंत महत्त्वाचे असते. वाढलेल्या आर्द्रतेमध्ये रोगाचे प्रमाण वाढते. यासाठी विकसित देशांमध्ये आर्द्रता कमी करणाऱ्या यंत्रांचा (डिह्युमिडिफायर) वापर केला जातो. या यंत्रांमध्ये मोठ्या सुधारणा होत असून, त्यासाठी वापरले जाणारे वायू अधिक पर्यावरणपूरक केले जात आहेत. हरितगृहामध्ये बंदिस्त वातावरण असल्यामुळे कमाल तापमान आणि आर्द्रता या दोन्ही समस्यांचा सामना उत्पादकांना करावा लागतो. त्यातील कमाल तापमान कमी करण्यासाठी पाण्याचे तुषार किंवा लहान कण हवेमध्ये उडवण्याच्या पद्धतींचा (त्याला इंग्रजीमध्ये फॉगर्स किंवा मिस्टर्स म्हणतात.) वापर केला जातो. मात्र, तापमान कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये हरितगृहातील आर्द्रतेचे प्रमाण वाढते. त्याचा फटका पिकांवर रोगाच्या प्रादुर्भावाने बसतो. पर्यायाने रसायनांचा वापर करावा लागतो. हे टाळण्यासाठी आर्द्रता कमी करण्याच्या यंत्रांचा वापर आवश्यक ठरतो. अशा प्रकारच्या यंत्रांचे उत्पादन एका खासगी कंपनीने केले आहे. त्याविषयी माहिती देताना कंपनीचे झिव शाकेद यांनी सांगितले, की सध्या आर्द्रता कमी करण्यासाठी अर्धबंदिस्त हरितगृहाचे झडपा खुल्या करून हवा खेळती ठेवली जाते. मात्र, युरोपातील वातावरणामध्ये बाह्य वातावरण थंड असल्याने पुन्हा आतील वातावरण थंड होते. त्याचा फटका पिकांना बसू शकतो. किंवा आतील वातावरण उष्ण करण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. या समस्येसाठी आर्द्रता कमी करणारी यंत्रे अधिक उपयुक्त ठरू शकतात. या यंत्रांमुळे ऊर्जेमध्ये ५० टक्क्यांपर्यंत बचत होते. या यंत्रांना इंग्रजीमध्ये डिह्युमिडिफायर म्हणतात. पर्यावरणपूरकतेसोबत अधिक कार्यक्षमता अशा यंत्राचे निर्माते झिव शाकेद यांनी सांगितले, की युरोपीय निकषानुसार योग्य तो रेफ्रिजरंट वायू यामध्ये वापरला असून, पूर्वीच्या R५०७ ऐवजी R५१३A याचा वापर केला जात आहे. जागतिक तापमान वाढीवर किमान परिणाम करणाऱ्या या वायूमुळे यंत्रे अधिक पर्यावरणपूरक होण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे ही यंत्रे अधिक कार्यक्षमपणे हवेतील आर्द्रतेचे रूपांतर पाण्यामध्ये करू शकतात. उदा. डीजी १२ हे यंत्र ताशी ४५ लिटर पाणी हवेतून मिळवू शकते. तर डीजी१२ ईयू ४८ लिटर पाणी मिळवते. हे या उद्योगातील सर्वाधिक आहे. या यंत्रांची निर्मिती ही हरितगृहामध्ये असलेल्या ८० टक्के सापेक्ष आर्द्रता आणि १८ अंश तापमानासाठी केली आहे. हे वातावरण पिकांसाठी अधिक चांगले मानले जात असले, तरी यंत्रे या वातावरणामध्ये लवकर खराब होतात. सोबतच विद्युतऊर्जाही कमी म्हणजेच १०/१२ किलोवॉट प्रतितास इतकी लागते. हे प्रमाण प्रति चार लिटर पाण्यासाठी १ किलोवॉट तासापेक्षा कमी आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com