मराठवाडा, सोलापूर व विदर्भात पावसाची शक्‍यता
मराठवाडा, सोलापूर व विदर्भात पावसाची शक्‍यता

मराठवाडा, सोलापूर व विदर्भात पावसाची शक्‍यता

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर समान हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका राहील. मात्र, त्याचवेळी ईशान्य भारतावर व पूर्व किनारपट्टी भागावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. हवा जास्त दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वाहते या नियमाने पश्‍चिम चक्रावाताच्या प्रभावाने तयार होणारे बाष्पयुक्त ढग पूर्व महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा व मध्यमहाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यांवर दाटून येतील. त्यातूनच रविवार ते बुधवार (ता. १ ते ४ मार्च) या कालावधीत विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांत जोरदार, तर उर्वरित भागात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. बुधवारनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावरील हवेचा दाब पुन्हा कमी होऊन तो १००८ हेप्टापास्कल इतका कमी होईल. त्यामुळे वाऱ्याचा वेग धुळे, नंदुरबार, जळगाव, वाशीम, उस्मानाबाद, सांगली व सोलापूर जिल्ह्यात अधिक राहील. लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, परभणी, अकोला या जिल्ह्यांत काही दिवशी ११ ते १५ मि.मी. तर अमरावती जिल्ह्यात २२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित विदर्भ व मराठवाड्यांतील जिल्ह्यात ४ ते ९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. धान्य, उन्हात वाळत टाकलेली हळद झाकून घ्यावी. भाजीपाला बाजारात विक्रीसाठी पाठवावा. उत्तर भारत - काश्‍मिर भागात विस्तृत स्वरूपात बर्फवृष्टी व पाऊस चालू राहील. हिमाचल प्रदेश भागात काही प्रमाणात बर्फवृष्टी व पावसाची शक्‍यता आहे. पंजाब, हरियाना, उत्तराखंड भागावर तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, पश्‍चिमी उत्तरप्रदेश भागांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. पश्‍चिमी चक्रावाताचे प्रभावामुळे हा पाऊस होईल. दक्षिण भारत - समुद्र किनारी पश्‍चिम किनारपट्टीच्या कर्नाटकचा प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या प्रदेशात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे. समुद्र किनारी भागाकडून बाष्पयुक्त ढग येऊन हा पाऊस होईल. महाराष्ट्रातील स्थिती ः १. कोकण - कोकणातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान रायगड व ठाणे जिल्ह्यांत २० अंश, रत्नागिरी जिल्ह्यात २१ अंश आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रायगड व ठाणे जिल्ह्यांत ५४ ते ५८ टक्के, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ६१ ते ६३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात केवळ २८ टक्के तर उर्वरित जिल्ह्यात ३० ते ३१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. सध्याचे हवामान आंबा, काजू, उन्हाळी भुईमूग, भात पिकांना अनुकूल राहील. २. उत्तर महाराष्ट्र - उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व जळगाव जिल्ह्यांत २० अंश, तर नाशिक व नंदुरबार जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. या दोन्ही जिल्ह्यांत सकाळी थंड हवामान राहील. नंदुरबार जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नंदुरबार जिल्ह्यात ४२ टक्के, तर धुळे व नाशिक जिल्ह्यात ३६ ते ३८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १७ ते २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ११ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्य व वायव्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. ३. मराठवाडा - या आठवड्यात पावसाची शक्‍यता आहे. लातूर व नांदेड जिल्ह्यांत काही दिवशी १५ मि.मी., परभणी जिल्ह्यात १२ मि.मी., बीड जिल्ह्यात ९ मि.मी., हिंगोली व जालना जिल्ह्यात ७ मि.मी., औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यात ४ ते ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. हवामान अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ३० अंश, उस्मानाबाद जिल्ह्यात ३५ अंश, तर हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. तसेच उर्वरित लातूर, नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यांत १८ ते १९ अंश, हिंगोली जिल्ह्यात २० अंश, बीड व परभणी जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस व लातूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जालना व बीड जिल्ह्यांत ३१ ते ३२ टक्के, उस्मानाबाद जिल्ह्यात ४५ टक्के व उर्वरित जिल्ह्यात ५२ ते ६२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते ३१ टक्के राहील. त्यामुळे दुपारी हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ११ किलोमीटर व वाऱ्याची दिशा नैऋत्य व वायव्येकडून राहील. ४. पश्‍चिम विदर्भ - पश्‍चिम विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती व वाशीम जिल्ह्यातं पावसाची शक्‍यता आहे. अमरावती जिल्ह्यात काही दिवशी २२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे, तर अकोला जिल्ह्यात ११ मि.मी. तसेच बुलढाणा व वाशीम जिल्ह्यात ४ ते ७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १२ किलोमीटर राहील. बुलढाणा जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला व बुलडाणा जिल्ह्यात २० अंश, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २९ ते ३९ टक्के व दुपारची १७ ते २१ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. ५. मध्य विदर्भ - वर्धा व नागपूर जिल्ह्यांत काही दिवशी ११ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात ९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्य व आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. कमाल तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस तर यवतमाळ जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५४ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २९ ते ३२ टक्के राहील. ६. पूर्व विदर्भ - चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवशी ५ मि.मी. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ७ मि.मी. तर चंद्रपूर जिल्ह्यात ९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात ३१ अंश, तर भंडारा जिल्ह्यात ३२ अंश, गडचिरोली जिल्ह्यात ३४ अंश आणि चंद्रपूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १८ अंश, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३१ टक्के राहील. ७. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र - सोलापूर जिल्ह्यात काही दिवशी ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून, नगर जिल्ह्यात वायव्येकडून, तर उर्वरित सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. कमाल तापमान सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत ३४ अंश, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर जिल्ह्यात २३ अंश, तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २२ अंश, सातारा व नगर जिल्ह्यांत २० अंश व पुणे जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ५६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २६ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. कृषी सल्ला

  1. विदर्भ व मराठवाड्यात पावसाची शक्यता असून, उघड्यावरील धान्य झाकावे.
  2. मेथी, पालक, चुका, चाकवत, कोथिंबीर या कमी कालावधीच्या भाजीपाल्याची लागवड शेतात वेगवेगळे भाग करून टप्प्याटप्प्याने करावी. कमी दिवसात उत्पन्न मिळेल.
  3. हिवाळी नांगरटीची कामे पूर्ण करावी. त्यामुळे पूर्वीच्या पिकाची धसकटे, पालापाचोळा गाडला जाईल.
  4. शेततळ्याची आखणी करून कोरडवाहू भागात पाणी साठवण्याची सोय करावी. पिकांना संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनामध्ये वाढ होते.
  5. बांध बंदिस्तीची कामे करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com