agriculture stories in Marathi Dragan fruit cordial & squash making | Agrowon

ड्रॅगन फळापासून कॉर्डीयल, स्क्वॅश निर्मिती

सुहेल भेंडवडे, आयेशा शेख
रविवार, 9 ऑगस्ट 2020

सध्या आपल्याकडे ड्रॅगन फळांची लागवड वाढत आहे. या फळांवरील प्रक्रिया आणि मुल्यवर्धित कॉर्डियल, स्क्वॅश अशा पदार्थांची निर्मिती करण्याविषयी माहिती घेऊ.

ड्रॅगन फळ हे हायलोसेरियस आणि सेलेनेसियस या जातीतील निवडूंग वनस्पतींचे गोड फळ आहे. ड्रॅगन फळाचा पोत किवी किंवा टरबूज फळांसारखाच आहे. ड्रॅगन फळे ही क जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत असून, प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचा ठरतो. त्यांच्या आहारातील समावेशामुळे लोह शोषण्यास मदत होते, दाताच्या निरोगीपणासाठी आवश्यक कोलेजेन तयार होते, त्वचा निरोगी आणि चमकदार त्वचेला प्रोत्साहन देते. त्यातील तंतूमय पदार्थामुळे (फायबर) आणि आरोग्यदायी घटकांमुळे हृदय निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

कमी कोलेस्टेरॉल : या फळामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी राहण्यासाठी मदत करते. फळांच्या नियमित सेवनामुळे स्फूर्तीबरोबरच दीर्घकाळ निरोगी हृदय राहण्यास मदत होते.
आरोग्यदायी घटक (अँटीऑक्सिडंट) - यातील अँटीऑक्सिडंट्स घटक पेशींना हानिकारक ठरणाऱ्या मुक्त कणांशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतात.

१०० ग्रॅम ड्रॅगन फळातील पोषणमूल्ये ः
ऊर्जा : २६४ कॅलरी
सोडिअम: ३९ मिलीग्रॅम
प्रथिने : ३.५७ ग्रॅम
जीवनसत्त्व क : ६.४ मिलीग्रॅम
चरबी (Fat): ० ग्रॅम
कर्बोदके : ८२.१४ ग्रॅम
तंतूमय पदर्थ (फायबर) : १.८ ग्रॅम
साखर (एकूण): ८२.१४ ग्रॅम
कॅल्शिअम : १०७ मिलीग्रॅम

प्रक्रिया युक्त पदार्थ :

गरापासून रस वेगळा करणे :

ड्रॅगन फळांमध्ये गराचे प्रमाण अधिक असते. चाकूने कापून त्यातील गर काढून घ्यावा. हा गर फ्रूट ज्यूसर किंवा मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. केलेली पेस्ट एका स्वच्छ कापडामध्ये ओतावी. आणी ते कापड पिळावे. कापड पिळल्यानंतर पेस्टमध्ये जो रस असेल तो त्या कापडामधून बाहेर निघेल मग तो रस आपण एका स्वच्छ स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घ्यावे.
पातेले मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवावे. रस ७० ते ८० अंश सेल्सिअस तापमानाला १५ ते २० मिनिटे गरम करावा.
रस पॅकिंगसाठी वापरायच्या बाटल्या व त्याची झाकणे उकळत्या पाण्यात ३० मिनिटे ठेवून निर्जंतुक करून घ्याव्यात. या बाटल्या चांगल्या कोरड्या कराव्यात. त्यात रस भरून यंत्राने घट्ट झाकण बंद करावे. या बाटल्या थोड्या वेळ थंड होऊ द्याव्यात.
या रसापासून विविध पेय पदार्थ करता येतात. उदा. सरबत, कॉर्डीयल, स्क्वॅश इ.

कॉर्डीयल :

कॉर्डीयल तयार करण्यासाठी २५ टक्के रस, ३० टक्के साखर (TSS), १.५ टक्के आम्ल आणि सल्फर डायऑक्साईड ३५० पीपीएम इतके लागते.

कृती ः एका पातेल्यात १ लीटर ड्रॅगन फळाचा रस घेऊन, त्यात २ ग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फाइट मिसळून १ तास स्थिर ठेवावे. रसातील घन पदार्थ, गर खाली साठतो. वरील रस अलगद वेगळा करून एका स्वच्छ कापडामधून गाळून घ्यावा. वेगळ्या पातेल्यात १.२५ किलो साखर आणि १ लीटर पाणी मिसळून गरम करावे. साखर विरघळल्यानंतर पाक थंड करून घ्यावा.
गाळून घेतलेला रस या साखरेच्या पाकामध्ये मिसळून चांगले ढवळून घ्यावे. हे मिश्रण निर्जंतुक बाटल्यामध्ये भरून घ्यावे. यात साखरेचे प्रमाण जास्त असते. याचा वापर करताना यामध्ये १:३ प्रमाणात पाणी मिसळावे लागते. उदा. १०० मिली कॉर्डीयलसाठी ३०० मिली पाणी मिसळावे.

स्क्वॅश (Squash) :

स्क्वॅश तयार करण्यासाठी २५ टक्के रस, ४० टक्के साखर (TSS), १- १.५ टक्के आम्ल (acid) लागते. ड्रॅगन फळाचा रस १ लीटर, साखर २ किलो, पाणी १ लीटर, पोटॅशिअम मेटाबायसल्फाइट २ ग्रॅम हे सर्व घटक आवश्यक असतात.

कृती ः स्टीलच्या भांड्यात १ लीटर पाणी घ्यावे. ते गरम करावे. त्यामध्ये साखर २ किलो मिसळून विरघळून घ्यावी.
एका पातेल्यात ड्रॅगन फळ रस १ लीटर घेऊन, त्यात पोटॅशियम मेटाबायसल्फाइट २ ग्रॅम मिसळून घ्यावे. हे द्रावण १ तास स्थिर ठेवावे. त्यामुळे रसामधील गर किंवा घन पदार्थ पातेल्यात खाली साठतो. आपल्याला त्यातील रस आवश्यक आहे.
हा रस एका स्वच्छ कापडातून गाळून घ्यावा. गाळलेला रस आपण आधीच तयार करून ठेवलेल्या साखर आणि पाण्याच्या मिश्रणात (पाकात) मिसळून चांगला ढवळून घ्यावा. हे मिश्रण निर्जंतुक बाटल्यामध्ये भरून घ्यावे. यात साखरेचे प्रमाण जास्त असते. याचा वापर करताना पाणी मिसळावे लागते. सामान्यतः त्याचा वापर करताना १:३ प्रमाणात म्हणजेच १०० मिली स्क्वॅशमध्ये ३०० मिली पाणी मिसळून वापरावे.

सुहेल भेंडवडे, ९८६०७३२८६६
आयेशा शेख, ९०४९१०१३७५

(साहाय्यक प्राध्यापक, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, आचळोली, महाड, महाराष्ट्र )


इतर कृषी प्रक्रिया
छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न...मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या...
लघुउद्योग चालू करण्यापूर्वीची तयारीमागील दोन लेखांमध्ये आपण छोट्या उद्योगात नफ्याचे...
तंत्रज्ञान वापरातून टाळा अन्नाची नासाडीकार्लो पेट्रिनी यांच्या मते, प्रत्येकासाठी अन्न...
डाळिंब फळांची प्रतवारी, साठवणूकमहाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक...
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?नवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...
हळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...
दुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडीबऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही....
सुरणपासून रुचकर पदार्थसुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ...
टोमॅटोपासून केचअप, चटणी, वेफर्सबाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात...
उद्योजकतेतून ग्रामीण विकासाकडे...ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी...
टोमॅटो निर्यात, प्रक्रिया उद्योगात संधीयेत्या काळात टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये सहकारी...
पनीर निर्मितीसह वाढवा टिकवणक्षमतापनीर हा भारतीय उपखंडामध्ये आहारामध्ये मोठ्या...
आल्यापासून कॅण्डी, लोणचे, मुरांबाअनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आल्याचा वापर केला जातो...
डाळिंबापासून जॅम, जेली, स्क्वॅश ​डाळिंबापासून इतर फळाप्रमाणेच उत्तम प्रकारचे सिरप...
कृषी व्यवसायात भरपूर संधी, गरज योग्य...कृषी क्षेत्रात व्यवसायाला मोठा वाव आहे. कृषी...
पेरूपासून बनवा लोणचे, चीज, जेलीपेरूमधील जीवनसत्त्व क रोगप्रतिकारक शक्ती...
चिंच प्रक्रियेतून उद्योगाच्या संधीचिंचेच्या आंबट-मधुर व आम्लकारक चवीमुळे याचा वापर...
डाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल...