agriculture stories in marathi Drinking १% rather than २% milk accounts for ४.५ years of less aging in adults | Agrowon

कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं..! संशोधनातील निष्कर्ष !!

वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास प्रौढांमध्ये वार्धक्य ४.५ वर्षाने पुढे जात असल्याचे दिसून आले आहे. संपूर्णपणे मेदरहित किंवा १ टक्के मेद असलेल्या दुधाच्या आहारातील समावेशाचा अभ्यास ब्रिघम यंग विद्यापीठामध्ये करण्यात आला होता.

कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास प्रौढांमध्ये वार्धक्य ४.५ वर्षाने पुढे जात असल्याचे दिसून आले आहे. संपूर्णपणे मेदरहित किंवा १ टक्के मेद असलेल्या दुधाच्या आहारातील समावेशाचा अभ्यास ब्रिघम यंग विद्यापीठामध्ये करण्यात आला होता.

ब्रिघम विद्यापीठातील प्रो. लॅरी टकर यांनी अमेरिकेतील ५८३४ प्रौढ व्यक्तींच्या आहार व त्यातील दुधाच्या प्रमाणाचा अभ्यास केला. ज्या लोकांच्या आहारामध्ये एक टक्क्यापेक्षा कमी मेद (फॅट) असलेल्या दुधाचा समावेश आहे, अशा व्यक्तींमध्ये वार्धक्यांची लक्षणे २ टक्के व त्यापेक्षा मेदयुक्त दूध घेणाऱ्या लोकांपेक्षा काही वर्षे उशिरा दिसत असल्याचे दिसून आले. त्याविषयी माहिती देताना टकर म्हणाले, की मेदयुक्त दूध घेणाऱ्या लोकांच्या तुलनेमध्ये मेदरहित किंवा कमी मेदयुक्त दूध घेणाऱ्या लोकांमध्ये वार्धक्याशी संबंधित बाबींचा अत्यंत कमी प्रमाणात आढळल्या.

टकर यांनी दैनंदिन दूध पिणाऱ्या लोकांप्रमाणे आठवड्यातून एकदा किंवा कमी वारंवारितेने दूध घेणाऱ्या लोकांतील गुणसूत्रातील शेपटीकडील टेलोमेरे या संरचनेच्या लांबीशी असलेला संबंध तपासला. त्याचप्रमाणे संपूर्ण दूध, दोन टक्के किंवा १ टक्के किंवा मलई काढलेल्या दुधाचा वापर करणाऱ्या लोकांमधील संबंधही तपासण्यात आला. त्याचे निष्कर्ष ऑक्सिडेटिव्ह मेडिसीन अॅण्ड सेल्युलर लॉन्जेव्हिटी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

संशोधनातील निष्कर्ष ः

  • जे लोक अधिक मेदयुक्त दूध आहारात घेतात, त्यांच्या टेलोमेर आखूड आढळल्या.
  • दुधातील प्रत्येक एक टक्के वाढलेल्या मेदामागे गुणसूत्रातील शेवटच्या टेलोमेर या ६९ व्या जोड्या आखूड झाल्याचे दिसून आले. त्याचा जैविक वयावर होणारा परिणाम हा चार वर्षांपेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे.
  • जे लोक अधिक प्रमाणात दूध घेतात, जे संपूर्ण दूध घेतात अशा लोकांमध्ये टेलोमेरमधील १४५वी मूलभूत जोडी हा कमी मेदयुक्त दूध घेणाऱ्या लोकांपेक्षा आखूड आढळली.
  • आहारविषयक मार्गदर्शक सूचनांमध्ये (२०१५ ते २०२०) प्रौढांनी मेदरहित किंवा कमी मेदयुक्त दुधाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. दूध पिणे हे काही वाईट नाही, मात्र दुधाचा कोणता प्रकार आपल्या आहारामध्ये आहे, याविषयी जागरूकता असणे महत्त्वाचे असल्याचे टकर यांनी सांगितले.

आहारातील दुधाचे प्रमाण ः
अभ्यासामध्ये जवळपास अर्धे लोक हे दैनंदिन दूध घेणारे असून, उर्वरित एक चतुर्थांश लोक आठवड्यातून किमान एकदा दूध घेणारे होते. यातील तीनपैकी एक प्रौढ हा संपूर्ण मेदयुक्त दूध घेतो, तर अन्य ३० टक्के लोक २ टक्के मेदयुक्त दूध घेतात.
त्यातही १० टक्के लोक हे १ टक्के दूध घेतात, तर अन्य १७ टक्के लोक मेदरहित दुधाचा वापर करतात. १३ टक्के लोक गायीचे दूध अजिबात पीत नाहीत.

 


इतर अॅग्रो विशेष
पंजाबमध्ये भूमिहीन शेतमजुरांना कर्जमाफीचंदीगड, पंजाब: राज्याचा २०२०-२१ चा १.५४ लाख...
देशात ११० लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाजनवी दिल्ली: देशात यंदा हरभरा उत्पादनात वाढ...
‘पोकरा’तील सामुदायिक शेततळे, शेळीपालन...अकोला ः राज्यात राबविल्या जात असलेल्या नानाजी...
वन्यप्राण्यांचा वाढता तापअकोला जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील एका...
पीकविम्यातील बदलांचा लाभ कुणाला?‘ऐच्छिक’ घात  देशभरात एकूण शेतकऱ्यांपैकी ५८...
एक लाख टन मका म्यानमारमधून आयातनवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने...
राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम...कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
दूध संकलनासह पदार्थनिर्मितीतून प्रगतीपुणे जिल्ह्यातील वढू (ता. शिरूर) येथील सुनील आणि...
एकलव्य शेतकरी बचत गटाचे उपक्रमगोळप (ता. जि. रत्नागिरी) गावातील एकलव्य शेतकरी...
विदर्भात आज गारपिटीचा इशारापुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा...
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या...पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी...
साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’मुंबई ः सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘...
कृषी परिषदेने विद्यापीठांसाठी नेमले...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ,...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...