agriculture stories in marathi Drip irrigation system for sugarcane | Page 2 ||| Agrowon

ऊस पिकासाठी योग्य ठिबक सिंचन पद्धत

अरुण देशमुख
रविवार, 22 मार्च 2020

ऊस पिकासाठी सर्वाधिक पाणी वापरले जात असल्याबाबत नेहमी चर्चा होते. ठिबक सिंचनाद्वारे पाणी व विद्राव्य रासायनिक खतांचा वापर हा तांत्रिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरतो. यामुळे पाणी व खतांचा कार्यक्षम वापर होऊन ऊस उत्पादन आणि साखर उतारा या दोहोमध्ये भरघोस वाढ होते.

उसासाठी योग्य ठिबक सिंचन

 • ठिबक सिंचन पद्धती : शक्यतो १६ मी.मी. व्यासाची इनलाइन ड्रिप वापरणे फायदेशीर असते.
 • मध्यम खोल जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर कमीत कमी १.५० मीटर (५ फूट) असावे तर जास्त खोलीच्या काळ्या जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर १.८० मीटर (६ फूट) असावे.
 • ड्रिपरमधील अंतर व प्रवाह : दोन ड्रिपरमधील अंतर ४० से. मी. तर ड्रिपरचा प्रवाह दर ताशी १.६ किंवा २ लिटर असावा.
 • पृष्ठभागाखालील ठिबक सिंचनासाठी दाब नियंत्रित इनलाइन ड्रिप वापरणे फायदेशीर ठरते. दोन ड्रिपरमधील अंतर ४० से. मी. तर ड्रिपरचा प्रवाह दर ताशी १.६ किंवा २ लिटर असावा. एका शिफ्टमध्ये जास्त क्षेत्र ओलिताखालील आणण्यासाठी ताशी १ लिटर प्रवाह देणारे ड्रिपर असणारी इनलाइन वापरणे फायदेशीर आहे.

ठिबक सिंचन पद्धतीची निवड
कमी कालावधीमध्ये सिंचन पूर्ण करण्यासाठी जास्त प्रवाह असणारे ड्रिपर वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र, हे शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचे आहे. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये कमी अंतराने (म्हणजेच दरदिवशी अथवा एक दिवसाआड) कमी प्रवाहाने मात्र जास्त कालावधीसाठी पाणी देणे फायद्याचे असते. त्यामुळे जमिनीमध्ये पिकांच्या मुळांशी पाण्याचे अपेक्षित व योग्य प्रकारे उभे-आडवे प्रसरण होते. मुळांची वाढ चांगली खोलवर होते. परिणामी जोमदार वाढ होऊन भरीव उत्पादन मिळते. यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन यंत्रणेची निवड करावी.

उसासाठी योग्य ठिबक सिंचन पद्धतीच्या निवडीसाठी मार्गदर्शक सूचना ः

जमिनीचा प्रकार शिफारशीत ठिबक सिंचन प्रणाली दोन ठिबक नळ्यातील अंतर (मी.) दोन ड्रिपरमधील अंतर (मी.) ड्रिपरचा प्रवाह (लिटर/तास)
उथळ कमी खोलीची जमीन पृष्ठभागावरील ठिबक १६ मि.मी. इनलाइन १.३५ ०.३०
मध्यम खोलीची जमीन पृष्ठभागावरील / पृष्ठभागाखालील ठिबक १६ मि.मी. इनलाइन/१२ मि.मी. इनलाइन १.५० ०.४० १ / १.६ /२
जास्त खोलीची काळी जमीन पृष्ठभागावरील / पृष्ठभागाखालील ठिबक १६ मि.मी. इनलाइन/१२ मि.मी. इनलाइन १.८० ०.५० १.६ / २
चढ उताराची जमीन पृष्ठभागावरील दाब नियंत्रित ड्रिपर असणारी १६ मि.मी. /१२ मि.मी. इनलाइन ठिबक १.५० ०.४० १ / १.६

विविध ठिबक सिंचन पद्धतीमध्ये सर्व ठिकाणी योग्य प्रमाणात प्रवाह मिळण्यासाठी व सलग एकसारखी अपेक्षित ओल निर्माण करण्यासाठी नळ्यांची (लॅटरल) लांबी दर्शवणारा तक्ता ः

ठिबक पद्धती दोन ड्रिपरमधील अंतर (सें. मी.) ड्रिपरचा प्रवाह (लिटर / तास) ठिबक नळीची लांबी (मी.) ड्रिपरचा प्रवाह (लिटर / तास) ठिबक नळीची लांबी (मी.) ड्रिपरचा प्रवाह (लिटर/तास) ठिबक नळीची लांबी
(मी.)
पृष्ठभागावरील ठिबक १६ मि.मी. इनलाइन ५० १३७ ८८ ६८
  ४० ११६ ७४ ५७
  ३० ९३ ५९ ४६
पृष्ठभागावरील दाब नियंत्रित ड्रिपर असणारी १६ मि.मी. इनलाइन ठिबक  ५० १८७ १.६ १३७ ११९
  ४० १५७ १.६ ११५ ९९
  ३० १२४ १.६ ९१ ७८
पृष्ठभागावरील ठिबक १२ मि.मी. इनलाइन ५० ८४ १.९ ५४ २.८५ ४२
  ४० ७१ १.९ ४५ २.८५ ३५
  ३० ५६ १.९ ३६ २.८५ २८
पृष्ठभागावरील दाब नियंत्रित ड्रिपर असणारी १२ मि.मी. इनलाइन ठिबक ५० ९६ १.६ ८८ ७६
  ४० ८२ १.६ ७२ ६२
  ३० ६५ १.६ ५६ ४८

जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन पद्धती (सबसरफेस ड्रिप)

उसासारख्या दीर्घायुषी पिकासाठी जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन (अर्थात सबसरफेस ड्रिप सिस्टिम) अतिशय योग्य आहे. या पद्धतीमध्ये पाणी व खते थेट ऊस पिकाच्या मुळाजवळ दिली जातात. पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. ऊस वाढीच्या संपूर्ण कालावधीमध्ये पाणी व खताच्या कार्यक्षम वापरामुळे ऊस उत्पादनात व साखर उताऱ्यात भरीव वाढ होते. या पद्धतीखाली उत्तम व्यवस्थापन केल्यास उसाचे एक लागवड पीक व कमीत कमी चार खोडवा पिके अतिशय उत्तमरीत्या घेता येतात. परिणामी एकूणच ऊस उत्पादन खर्च कमी होतो. निव्वळ नफ्यामध्ये वाढ होते.

पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन पद्धती कशी काम करते?
पाण्याचा जमिनीतील प्रवाह हा मुख्यत्वे केशाकर्षण (कॅपिलरी) दाबामुळे नियंत्रित केला जातो. हा दाब सर्व दिशांना सारखा असतो आणि गुरुत्वाकर्षणाचा दाब हा स्थिर व खालच्या दिशेला असतो. जशी जमीन ओली होते, तसा कॅपिलरी दाब कमी होत जातो. कोरड्या जमिनीत कॅपिलरीचा दाब हा गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावापेक्षा जास्त असल्यामुळे पाण्याचा प्रवाह सर्व दिशांना सारखा असतो. जेव्हा जमीन ओली होत जाते, तेव्हा जमिनीतील सर्व पोकळ्यांमध्ये पाणी भरल्याने कॅपिलरी दाब कमी होतो व गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव वाढतो आणि पाण्याचा प्रवाह उताराच्या बाजूला सुरू होतो. या साध्या मूलतत्त्वामुळे हलके पाणी दिले तर कॅपिलरी दाबाने त्यावर नियंत्रण ठेवता येते. पाण्याची कार्यक्षमता वाढवता येते.

पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे ः

 • अन्य कुठल्याही पाणी देण्याच्या पद्धतीपेक्षा जास्त पाणी वापर कार्यक्षमता मिळते. बाष्पीभवनामुळे वाहून जाण्यामुळे तसेच जमिनीत खोलवर पाण्याचा निचरा होणे थांबल्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उत्पादनवाढीसाठी अतिशय चांगला उपयोग होतो.
 • पाणी व अन्नद्रव्ये थेट उसाच्या मुळाजवळ दिली जातात, त्यामुळे उसाची वाढ चांगली होते. उसावरील इतर ताण कमी होतो.
 • सरी- वरंबा पद्धतीशी तुलना करता पाण्यामध्ये ५० ते ५५ % बचत होते, तर पृष्ठभागावरील ठिबक सिंचनाच्या तुलनेत १० ते १५ % बचत होते.
 • ऊस उत्पादनात कमीत कमी ३५ टक्क्यांपर्यंत वाढ होते.
 • अतिरिक्त पाणी उसात साचत नसल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
 • रासायनिक खते थेट मुळांभोवती मिळून कार्यक्षमता वाढते. खतमात्रेत ३० % बचत होते.
 • जमिनीच्या पृष्ठभागावरील भाग कोरडा राहत असल्याने तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच आंतरमशागतीची व तोडणीची कामे वेळेवर करणे सोपे जाते.
 • पद्धतीत इनलाइन ठिबक नळ्या आणि ड्रीपर मजबूत अशा पॉलिमरपासून बनविलेल्या असतात. त्या जमिनीखाली असल्याने सूर्याची अतिनील किरणे, वातावरणातील चढ-उतार आणि जमिनीतील इतर उपद्रवी घटकांपासून सुरक्षित राहतात. पर्यायाने देखभालीचा खर्च कमी होतो.
 • -या पद्धतीत पीसीएनडी या ड्रीपलाइनचा वापर केल्याने ड्रिपर बंद होत नाहीत. शेत चढ-उताराचे असले तरी सर्व ठिकाणी सम प्रमाणात पाणी देणे शक्य होते. उसाची वाढही एकसारखी होते.
 • - ही यंत्रणा जमिनीखाली असल्याने हाताळणी कमी होते. त्यामुळे या पद्धतीचे आयुर्मानही जास्त असते.
 • - उसाचे योग्य व्यवस्थापन केल्यास जास्तीत जास्त खोडवे फायदेशीररीत्या घेणे शक्य होते.
 • - ही यंत्रणा जमिनीखाली असल्याने उस लागवड, आंतरमशागत व ऊस तोडणी यांत्रिक पद्धतीने करणे शक्य होते.

सबसरफेस ठिबक नळी जमिनीत गाडताना घ्यावयाची काळजी ः

 • ठिबक सिंचन नळी जमिनीत घालताना ट्रॅक्टरचा वेग ६ कि. मी. प्रति तास यापेक्षा जास्त नसावा.
 • एक पूर्ण लाइन जमिनीत घातल्यानंतर शेवटी ठिबक नळी ट्रॅक्टरपासून तोडावी. ट्रॅक्टरला ठिबक नळी कापल्याशिवाय पुढच्या रांगेत जाऊ देऊ नये, अन्यथा ड्रिपरची दिशा बदलते.
 • मोठ्या शेतामध्ये नळ्या जमिनीत अगोदर घाल्याव्यात. नंतर उपमुख्य वाहिन्या (सबमेन) जोडाव्यात.
 • उपमुख्य लाइन बंद करण्यापूर्वी सर्व यंत्रणेतील पाण्याची गळती शोधण्यासाठी त्यातून पाणी सोडावे. सर्व यंत्रणा कार्यान्वित करून पाण्याचा दाब, दूरवरच्या नळीवरचा पाण्याचा दाब यांची तपासणी करावी. त्या योग्य प्रकारे काम करीत असल्याची खात्री करावी. तसेच खत खेचणारा पंप, नियंत्रक यांचे निरीक्षण करून त्यांच्या योग्य जोडणीबद्दल खात्री करून घ्यावी.
 • ठिबक नळीच्या ५ सें. मी. वरच्या बाजूस ऊस टिपऱ्याची लागवड करावी. उदा. ठिबक नळी १५ सें. मी. खोलीवर असेल तर ऊस टिपऱ्याची लागवड जमिनीपासून १० सें. मी. खोलीवर करावी.
 • गाळण यंत्राच्या (फिल्टर युनिट) सुरुवातीला व गाळण यंत्रणेनंतर पाण्याचा दाब तपासून पाहावा.
 • शेवटच्या रांगेतील नळीवरचा पाण्याचा दाब कमीत कमी सहा मीटर असावा.

पृष्ठभागाखालील ठिबक सिंचनासाठी योग्य ड्रिपलाइनची निवड

 • पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन वापरताना ऊस लागवड जोड ओळ पद्धतीने केली जाते. दोन नळ्यातील अंतर १.८० मी. तर दोन उसाच्या ओळीतील अंतर ४० ते ५० सें. मी. ठेवले जाते.
 • चढ उताराच्या जमिनीत दाबनियंत्रित तोट्या असलेली ड्रिपलाइन वापरावी.
 • एकदम सपाट जमिनीमध्ये १६ मी. मी. व्यासाची ०.८ मिमी. अथवा ०.५ मिमी. जाडी असलेली ड्रिपलाइन वापरावी.
 • जमिनीच्या प्रकारानुसार ड्रिपरमधील अंतर व त्याचा प्रवाह बदलतो. त्याबद्दल खालीलप्रमाणे शिफारस करण्यात येते.

देखभाल
-महिन्यातून एकदा न चुकता ड्रिपलाइन फ्लश कराव्यात, ज्यामुळे त्यात साठलेली घाण निघून जाईल. ड्रिपलाइन फ्लश करण्याअगोदर सबमेन फ्लश करून घ्याव्यात.
-पाणी परीक्षण अहवालानुसार आम्ल प्रक्रिया करावी.

अरुण देशमुख, ९५४५४५६९०२
(सह सरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि., पुणे.)


फोटो गॅलरी

इतर नगदी पिके
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनगुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे...
कपाशीवरील तुडतुड्याचे नियंत्रणतुडतुडे ही बी टी कपाशीवरील सर्वात महत्त्वाची रस...
आडसाली उसासाठी खतमात्रेचे नियोजनउसाच्या योग्य वाढीसाठी माती परिक्षणाच्या...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचेलागवड १५ जुलै ते १५ ऑगष्टपर्यंत करावी.जोडओळ पट्टा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...
शेतकरी नियोजन (पीक कापूस)पीक - कापूस गणेश शामराव नानोटे, निंभारा, ता....
कपाशी लागवडीमध्ये नवा दृष्टिकोन हवा दरवर्षी कपाशीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
एकात्मिक व्यवस्थापनातून वाढवा बीटी...अलीकडील वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घटत...
गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी पूर्वहंगामी...कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या...
ऊस पिकासाठी योग्य ठिबक सिंचन पद्धतउसासाठी योग्य ठिबक सिंचन ठिबक सिंचन पद्धती...
सुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...
सुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये...
उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म...जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके...
उसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रारासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
ऊस पीक सल्ला१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत...