agriculture stories in Marathi Dr.Sabale advice on meteorology | Agrowon

राज्यात वाढणार थंडीचे प्रमाण

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

पश्‍चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे जम्मू व काश्‍मीर, तसेच लडाख भागात पावसाची शक्‍यता असून, महाराष्ट्रात या आठवड्यात पावसाची शक्‍यता नाही.

सध्याची परिस्थिती पहातामहाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामध्ये सोमवारी वाढ होऊन तो १०१२ हेप्टापास्कल इतका वाढेल हा दाब आठवडाभर कायम राहील. जेव्हा कमाल व किमान तापमानात घट होते तेव्हाच हवेच्या दाबात वाढ होते या नियमानुसार थंडीचे प्रमाण वाढेल. त्यामुळे राज्यातील हवामान थंड व कोरडे राहील. मात्र याच आठवड्याच्या सुरवातीपासून कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भ व दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रात हवामान अंशतः ढगाळ राहिल्यामुळे थंडीच्या प्रमाणावर परिणाम होणे शक्‍य असून, थंडीच्या प्रमाणात चढ-उतार होणे शक्‍य आहे. त्यामुळे काही काळ किमान तापमानावर त्याचा परिणाम होऊन किमान तापमानात वाढ होऊन थंडी प्रमाणावर परिणाम होणे शक्‍य आहे.

कोकण पश्‍चिम व मध्य विदर्भातही थंड वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहणार आहे. ईशान्येकडून थंड वारे वाहण्यामुळे थंडीचे प्रमाण कायम राहील. ईशान्य भारतात थंडीचे प्रमाण अधिक राहील. वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहतील तेव्हा थंडी वाढेल. मात्र महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत समान स्थिती राहणार नाही. दक्षिणेकडील तमिळनाडू, पॉंडिचेरी, कराईकल, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, केरळ, दक्षिण कर्नाटक या भागात तसेच पश्‍चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे जम्मू व काश्‍मीर, तसेच लडाख भागात पावसाची शक्‍यता असून, महाराष्ट्रात या आठवड्यात पावसाची शक्‍यता नाही.

कोकण ः
दक्षिण कोकणात पावसाची शक्‍यता नाही. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान २४ अंश सेल्सिअस राहील. उत्तर कोकणातही पावसाची शक्‍यता नाही. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ७४ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ४८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. सध्याचे हवामान भात कापणी व मळणीसाठी, तसेच रब्बी हंगामाची पूर्वतयारी करण्यासाठी अनुकूल आहे.

उत्तर महाराष्ट्र ः
धुळे व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ते ३४ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल, तर नाशिक जिल्ह्यात ते २२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. धुळे व नंदूरबार जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. नंदूरबार व धुळे जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४९ ते ५३ टक्के राहील, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यात ६१ ते ६९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ३९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. कापूस वेचणीसाठी हवामान अनुकूल राहील, तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता नाही.

मराठवाडा ः
मराठवाड्यात या आठवड्यात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून सर्वच मराठवाड्यातील जिल्ह्यात राहील. त्याचा प्रभाव किमान तापमानावर काही प्रमाणात शक्‍य असला तरी त्यात बदल होऊन वारे ईशान्येकडून वाहताच थंडीचे प्रमाण वाढेल. वाऱ्याचा ताशी वेग नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यात ६ कि.मी., लातूर, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ताशी ८ कि.मी., बीड जिल्ह्यात ताशी ९ कि.मी. तर उस्मानाबाद जिल्ह्यात ताशी १० कि.मी. राहील. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील, तर नांदेड व हिंगोली जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. लातूर व जालना जिल्ह्यात ते १९ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, बीड, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील, तर लातूर व जालना जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष
आर्द्रता ५७ ते ६२ टक्के, तर दुपारची ३२ ते ४८ टक्के राहील. हवामान कापूस वेचणीस अनुकूल राहील.

पश्‍चिम विदर्भ ः
पश्‍चिम विदर्भात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किलोमीटर राहील. अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील, तर बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ते १९ अंश सेल्सिअस राहील. हवामान थंड राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६४ टक्के, तर दुपारची ३८ ते ४० टक्के राहील व त्यामुळे हवामान कोरडे राहील.

मध्य विदर्भ ः
मध्य विदर्भात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किलोमीटर राहील. वर्धा व नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील, तर यवतमाळ जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६५ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३७ ते ४२ टक्के राहील. हवामान थंड व कोरडे राहील.

पूर्व विदर्भ ः
पूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ते ३५ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात ते २० अंश सेल्सिअस आणि गडचिरोली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ७४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ३८ टक्के राहील. खरिपातील पिकांच्या काढणीस हवामान अनुकूल राहील, तसेच रब्बी पिकांच्या पेरणीसही ते उपयुक्त राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः
कोल्हापूर, सांगली व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर सातारा, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ते ३३ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत ते २१ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर नगर व सांगली जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. त्याचा प्रभाव थंड हवामानावर व किमान तापमानावर होईल. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८२ टक्के राहील, तर दुपारची ४४ ते ५४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. त्याचा परिणाम थंडीवर होईल.

कृषी सल्ला ः
१) लाळ्या खुरकूत नियंत्रणासाठी जनावरांना लसीकरण करावे.
२) पेरू बागेत कामगंध सापळे लावावेत.
३) थंडी वाढणार असल्याने जनावरे बंदिस्त ठिकाणी बांधून ठेवावीत.
४) पोल्ट्री शेडमध्ये विद्युत दिवे रात्री व दिवसा लावल्यास तापमान योग्य राखण्यात मदत होईल.
५) जनावरांना हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून लसूण घास, बरसीम, मका पेरणी करावी.
६) गहू, हरभरा, जवस, मोहरीची पेरणी वेळेवर करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ
तथा सदस्य ऍग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साऊथ एशिया)


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...