agriculture stories in marathi E cycle runs on solar energy | Agrowon

सौर ऊर्जेवर चालणारी ई-सायकल !

- दिनकर गुल्हाने
शुक्रवार, 6 मार्च 2020

सध्या दुचाकीचे प्रमाण वाढले असले तरी त्यासाठी लागणारे पेट्रोल सातत्याने महाग होत चालले आहे. शरीराला व्यायाम म्हणून सायकल चालवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. मात्र, अनेक वेळा दमलेले असताना सायकल चालवावी वाटत नाही. अशा वेळी उपयुक्त ठरू शकेल, अशी ‘ई-सायकल’ पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवली आहे. ती सौर ऊर्जेवर चालते.

सध्या दुचाकीचे प्रमाण वाढले असले तरी त्यासाठी लागणारे पेट्रोल सातत्याने महाग होत चालले आहे. शरीराला व्यायाम म्हणून सायकल चालवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. मात्र, अनेक वेळा दमलेले असताना सायकल चालवावी वाटत नाही. अशा वेळी उपयुक्त ठरू शकेल, अशी ‘ई-सायकल’ पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवली आहे. ती सौर ऊर्जेवर चालते.

शहरातील अंतर दूरदूर होत चालली आहेत. त्यात दुचाकी वाहनांची संख्या वाढल्याने प्रदूषणाबरोबरच वाहतूक कोंडीचीही समस्या वाढली आहे. यावर बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागातील विद्यार्थी चैतन्य काण्णव, संदीप जोशी, अंकुश भोपळे, अनुज चव्हाण, शुभम राठोड, अर्जुन कुबडे, इंतेसार खान यांनी ई-सायकल निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला. यासाठी सायकल, इलेक्ट्रिक मोटर, लीड ॲसिड बॅटरी, चार्जर, सायक्लोमीटर या साधनांचा उपयोग केला. या बॅटरीच्या चार्जिंगसाठी सोलर पॅनेल वापरण्यात आले आहे. यासाठी १२ हजार रुपये खर्च आला आहे.

या सायकलच्या चाचण्या घेण्यात आल्या असून, शहरी रस्त्यांवर चालविण्यास उपयुक्त असल्याचे लक्षात आले. या सायकलला ॲक्सलेटर बसवला असून, त्याद्वारे वेग कमी अधिक करता येतो. बॅटरी पूर्ण चार्ज असताना ताशी २२ ते २५ किलोमीटर वेगात धावते. एका चार्जिंगमध्ये २५ किलोमीटर पर्यंतचा प्रवास पूर्ण करते.

सौर ऊर्जेवरील ही ई-सायकल वाढत्या इंधन दराच्या काळात मोठा दिलासा देणारी ठरली आहे. या सायकलमुळे प्रदूषणाला आळा बसतो. शिवाय चढावर आवश्यक असल्यास पायडलचा उपयोग करता येतो. पेट्रोल दुचाकीला हा योग्य पर्याय असल्याचे मत प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. यासाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ. संजय भागवत यांचे मार्गदर्शन मिळाले.

बाबासाहेब नाईक अभियांत्रिकीच्या वार्षिक स्नेहसंमेलन 'गेटी-२०२०' मध्ये उद्घाटक पुसद वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे व प्राचार्य डॉ. अविनाश वानखडे यांनी या ई-सायकलवर कॅम्पसमध्ये फेरी मारून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. संस्थेचे अध्यक्ष जय नाईक, प्राचार्य प्रा. जयदीप इंगळे यांनी विद्यार्थी संशोधकांचे कौतुक केले.

 


इतर टेक्नोवन
सीताफळातील गर, बिया वेगळे करण्यासाठी...सीताफळ हे फळ पिकल्यानंतर फार काळ साठवणे शक्य होत...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...
वितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...
अत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...
दूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...
प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...
हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...
चाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...
अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...
स्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...
सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...
पिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...
यांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...
विरळणी, तण काढणी करा झोपून!अत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
योग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...
आले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...