agriculture stories in marathi effects of climate change on silkworms | Agrowon

रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणाम

डॉ. चंद्रकांत लटपटे
सोमवार, 29 जून 2020

दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री उद्योगाप्रमाणे सहकार आणि खासगी उद्योगांच्या सहकार्याने रेशीम उत्पादन आणि उत्पन्नामध्ये शाश्वतता आणण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. उत्पादनावर परिणाम करणारा हवामान हा महत्त्वाचा घटक असून, त्याचा या लेखामध्ये विचार करू.

रेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प असून, साधन व निविष्ठा ही शेतकऱ्यांना ग्रामीण पातळीवर सहज उपलब्ध होतील अशा आहेत. त्यासाठी दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री उद्योगाप्रमाणे सहकार आणि खासगी उद्योगांच्या सहकार्याने रेशीम उत्पादन आणि उत्पन्नामध्ये शाश्वतता आणण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. उत्पादनावर परिणाम करणारा हवामान हा महत्त्वाचा घटक असून, त्याचा या लेखामध्ये विचार करू.

रेशीम शेती उद्योगामध्ये रोजगार उपलब्धतेची प्रचंड क्षमता आहे. जागतिक पातळीवर कच्च्या रेशीम उत्पादनामध्ये १.२ लाख मे. टन उत्पादनासह चीन हा पहिल्या क्रमांकावर आहे. भारत हा दुसऱ्या क्रमांकावर असून, उत्पादन ३५,२६१ मे. टन इतके आहे. भारतामध्ये सुमारे आठ लाख शेतकरी कुटुंबे रेशीम उद्योगामध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विभाग हा रेशीम उद्योगामध्ये अग्रेसर आहे. तुती लागवडीखालील क्षेत्र ११,६४५ एकर (सन २०१८-१९) असून, कोषाचे उत्पादन १२०७  मे. टन झाले आहे. मराठवाड्यातील भौगोलिक स्थिती रेशीम उत्पादनासाठी पूरक असून, सध्याच्या लहरी वातावरणामुळे या शेतीमध्ये नुकसान वाढत आहे. बदलत्या हवामानाचा आधीच अंदाज घेऊन योग्य ती सल्ला सेवा विकसित झाल्यास रेशीम उत्पादनातील नुकसान कमी करणे शक्य आहे. 

 • मराठवाड्यातील भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगासाठी पूरक आहे. या विभागातील उन्हाळ्याचे काही महिने वगळता तुतीची वाढ जोमाने होते.
 • रेशीम शेतीसाठी वार्षिक पर्जन्यमान ६०० ते २५०० मि.मी. आवश्यक असून, पावसाळ्यात दहा दिवसांतून एकदा ५० मि.मी. पाऊस झाल्यास तुतीची वाढ चांगली होते. 
 • तुतीसाठी तापमान १२ ते ४० अंश सेल्सिअस, पाच ते दहा तास सूर्यप्रकाश आवश्यक असते.  
 • मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी गट स्थापन करून या उद्योगाकडे वळल्यास त्यांचा फायदा होऊ शकतो. 
 • बदलत्या हवामानामध्ये उत्पादनाची अनिश्चितता असणाऱ्या कापूस, सोयाबीन आणि ऊस पिकाखालील क्षेत्र कमी करत दीड ते दोन एकर क्षेत्रावर तुती रेशीम उद्योग करता येईल. यातून शेतकऱ्यांकडे खेळते भांडवल उपलब्ध होऊ शकतो.   
 • हा व्यवसाय कमी मजुरांमध्ये करण्यासाठी नवीन पट्टा पद्धतीने लागवड व नवीन पीक संगोपनाची फांद्या पद्धत या उपयुक्त ठरू शकतील. 

  रेशीम कीटकांवरील विविध हवामानाचा परिणाम

कीटक संगोपनगृहातील सापेक्ष आर्द्रता, तापमान, हवा, प्रकाश इ. घटकांचा वाढीच्या रेशीम कीटकांच्या विविध अवस्थांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होतो. दर्जेदार कोषनिर्मितीसाठी हवामान घटकांवर व त्यात होत असलेल्या बदलांवर सातत्याने लक्ष ठेवले पाहिजे.

 • वाढीच्या अवस्थेत जास्त तापमान आणि जास्त आर्द्रता असल्यास प्रौढ रेशीम कीटकांच्या तुलनेमध्ये बाल्य कीटक झपाट्याने वाढतात.
 • संगोपनगृहातील सापेक्ष आर्द्रतेचा परिणाम ट्रेमधील तुती पानांवर होतो. म्हणजेच कीटकांच्या वाढीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. रेशीम कीटकांना खाद्य म्हणून देताना तुती पानांमध्ये ८० टक्के पाण्याचे प्रमाण आवश्यक असते. जर आर्द्रता कमी राहत असेल, तर ती वाढवण्यासाठी मेणयुक्त कागद किंवा निळ्या पॉलिथिनने तुतीची पाने झाकावीत.  
 • संगोपनगृहात बाल्य रेशीम कीटकांच्या योग्य वाढीसाठी २६ ते २८ अंश सेल्सिअस तापमान आणि ९० टक्के सापेक्ष आर्द्रता आवश्यक असते. आर्द्रता नियंत्रित ठेवण्यासाठी ह्युमिडीफायर, ह्युमिडीस्टॅंड अशा उपकरणे ठेवावीत. रेशीम कीटकांच्या कात टाकण्याच्या चार अवस्थांच्या काळात सापेक्ष आर्द्रता ६५ टक्के आणि तापमान २५ अंश सेल्सिअस आवश्यक असते. 
 • रेशीम कीटकाची योग्य वाढ आणि अधिक व दर्जेदार कोष उत्पादनासाठी २३ ते २८ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. 
 • प्रौढ कीटक संगोपनामध्ये २६ अंश सेल्सिअस तापमान असल्यास रेशीम धाग्यामध्ये रूपांतर करण्याची क्रिया चांगली होते.  दुबार संकर वाणासाठी हे आणखी उपयुक्त ठरते. 
 • जास्त तापमानात (२८ अंश सेल्सिअस) बाल्य रेशीम कीटकांच्या जगण्याच्या प्रमाणात वाढ होते. प्रौढ रेशीम कीटकाच्या चौथ्या व पाचव्या अवस्थेत तापमान वाढीमुळे कीटकांची वाढ जलद होते. 
 • तापमान ३० अंशापेक्षा अधिक गेल्यास रेशीम कीटक लवकर कोषात जातात. पुढील क्रिया मंदावल्यामुळे कमी वजनाचे कोष मिळतात.
 • तापमानात अधिक वाढ झाल्यास जैवरासायनिक क्रियांमध्ये वाढ होते. रेशीम धाग्यांमध्ये रूपांतराची क्रिया कीटकांकडून मंदावते. कोषाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. दुबार रेशीम कीटक संकरित जातींची चौथी व पाचवी अवस्था जास्त तापमानात तग धरत नाही. कोष उत्पादन व धागा सोडण्याचे प्रमाण यावर आकस्मिक हवामान बदलाचा परिणाम होतो.
 • तापमान २० अंशापेक्षा कमी झाल्यास बाल्य रेशीम कीटक कमकुवत राहतात. रोगांचा प्रादुर्भाव वाढून मर वाढते. कात टाकण्याच्या अवस्थेत तापमान २० अंशापेक्षा कमी झाल्यास हा कालावधी लांबतो.

   रेशीम कीटकांवरील हवेचा परिणाम
रेशीम कीटकांच्या वाढीसाठी शुद्ध हवा लागते. संगोपनगृहात दोन्ही बाजूने जमिनीलगत व छताजवळ झरोके ठेवावेत. थंड हवा आत येणे आणि उष्ण हवा बाहेर जाणे, यासाठी ते उपयुक्त राहतात. संगोपनगृहामध्ये तयार होणारे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया यासारखे वायू बाहेर टाकण्यासाठी हवा खेळती राहणे अत्यंत गरजेचे असते. हवा खेळती राहत असल्यास रेशीम कीटकांची मरतूक कमी होते. खाद्य खाण्याची क्रिया वाढते. त्यांचे पचन चांगले होते. परिणामी कीटकांच्या वजनात, कोषावर जाण्याच्या प्रमाणात आणि कोष उत्पादनामध्ये वाढ होते. 

   रेशीम कीटकांवरील प्रकाशाचा परिणाम
कीटक संगोपनगृहामध्ये लख्ख प्रकाश किंवा गडद अंधार टाळावा. प्रकाशाची तीव्रता मंद म्हणजेच (२० लक्स ) इतकी ठेवावी. प्रौढ कीटक संगोपनगृहात १६ तास प्रकाश व ८ तास अंधार राहील, याची काळजी घ्यावी. बाल्य रेशीम कीटक संगोपनात त्याच्या उलटे म्हणजेच १६ तास अंधार आणि ८ तास प्रकाश ठेवावा. सतत प्रकाश किंवा अंधार ठेवल्यास कीटकांच्या अळी अवस्थांची वाढ आणि कोषांचे वजन यावर परिणाम होतो.

 ः डॉ. चंद्रकांत लटपटे, ७५८८६१२६२२
(प्रभारी अधिकारी, रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर कृषी सल्ला
सापळा पिकांची लागवड महत्त्वाचीएकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी सापळा पिकांची लागवड...
सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापनयवतमाळ जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये सोयबीन...
टप्प्याटप्प्याने करतो डाळिंब बहराचे...शेतकरी नियोजन पीक ः डाळिंब शेतकरी ः ज्ञानेश्वर...
कृषी हवामान सल्‍ला (मराठवाडा विभाग)भारतीय हवामान विभागाच्‍या अंदाजानुसार,...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
कृषी सल्ला : सूर्यफूल, बाजरी, कापूस,...सूर्यफूल पेरणी वाणांची निवड :  अ)...
कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणकमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे...
कृषी सल्ला (कापूस, तूर, सोयाबीन, भुईमूग...पेरणीयोग्य पाऊस झालेल्या ठिकाणी वाफसा आल्यानंतर,...
तंत्र मका लागवडीचे...पावसाचे प्रमाण तसेच जमिनीच्या मगदुराप्रमाणे...
रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणामरेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प...
नियोजन केळी लागवडीचेकेळी लागवडीसाठी कंद मुनवे, निरोगी आणि जातिवंत...
पावसाळी वातावरणातील द्राक्षबागेतील...गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी पाऊस झाला, तर काही...
जमीन सुधारणेसाठी भूसुधारकांचा वापरजमीन वारंवार लागवडीखाली असल्याने किंवा चुकीच्या...
शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचे...जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता टिकवून ठेवायची असेल...
'फर्टिगेशन' तंत्राद्वारे खत वापरात बचतठिबक सिंचनातून पाणी आणि खतांचे व्यवस्थापन...
जिवाणू खतांचा वापर फायदेशीरजिवाणू खते वातावरणातील नत्र स्थिर करून जमिनीत...
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची...माती परीक्षण अहवालानुसार म्हणजेच मृद...
कपाशी लागवडीमध्ये नवा दृष्टिकोन हवा दरवर्षी कपाशीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे...
निंबोळी अर्काची निर्मिती, वापरसध्या पावसाळ्याच्या सुरुवातीला कडुनिंबाच्या...
पिकातील सूक्ष्मवातावरण बदलासाठी काटेकोर...या वर्षी पावसाचा अंदाज समाधानकारक सांगितला आहे....