ॲण्डेस प्रदेशात शोधल्या बेडकाच्या नव्या ११ जाती 

ॲण्डेस प्रदेशात शोधल्या बेडकाच्या नव्या ११ जाती 
ॲण्डेस प्रदेशात शोधल्या बेडकाच्या नव्या ११ जाती 

ॲण्डेस पर्वतीय प्रदेशामध्ये पावसाळ्यातील बेडकांच्या अकरा नव्या जाती शोधण्यात आल्या आहेत. पश्चिम गोलार्धामध्ये गेल्या दशकामध्ये एकाच वेळी इतक्या जाती एकाच संशोधनातून मांडण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. नव्या जाती ठरवण्यासाठी त्यांचे जनुकीय गुणधर्म, आकार, त्यांचे आवाज आणि अन्य पर्यावरणीय मुद्दे तपासण्यात आले. उभयचर प्राण्यांचा शोध हा अनेक अर्थाने अवघड असतो. कारण ते एकाच वेळी पाणी, जमीन आणि दलदल अशा ठिकाणी राहू शकतात. त्यांचा शोध घेऊन, नवी जात असल्याची शाश्वती करणे आणखी अवघड ठरते.   या आधी २००७ मध्ये स्पॅनिश शास्त्रज्ञ इग्नासियो डी ला रिवा यांनी बोलिव्हिया येथे बेडकांच्या बारा प्रजाती शोधल्या होत्या. हे नवे संशोधन पॉन्टिफिकल कॅथोलिक युनिव्हर्सिटीमधील संशोधक विद्यार्थी नादिया पईझ आणि डॉ. सॅण्टिगो रॉन यांनी जर्नल झूकीज प्रकाशित केले आहे. नादिया पईझ या सध्या कॅनडा येथील ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठामध्ये प्राणीशास्त्रामध्ये आचार्य (पीएच. डी.) पदवी घेत आहेत.  त्यांनी शोधलेल्या सर्व नव्या जाती २५०० वर्गकिलोमीटर पेक्षाही कमी क्षेत्रामध्ये आढळल्या आहे. म्हणजेच या परिसरातील सजीवांच्या रहिवासामध्ये जनावरांसाठी कुरणे, शेती, खाणकाम यांमुळे कितीतरी मोठ्या जैवविविधतेला फटका बसला असेल, याचा अंदाज येऊ शकेल. नव्याने सापडलेल्या जातींमध्ये एक आकर्षक रंगसंगती असलेला वर्षाबेडूक असून, त्यांच्या त्या रंगावरूनच त्यांचे नाव ठरवण्यात येत आहे. यातील प्रत्येक बेडूक वेगवेगळ्या रंगाचा असून, पिवळ्या रंगापासून गडद तपकिरी रंगापर्यंत वेगवेगळ्या छटा त्यामध्ये आढळतात. प्राथमिक अभ्यासामध्ये काही जाती या वेगळ्या मानल्या गेल्या असल्या तरी अधिक जनुकीय अभ्यासानंतर त्या एकच असल्याचे दिसून आले. बहुतांश नव्या अज्ञात जातींना या संशोधनासह संवर्धनामध्ये कार्यरत शास्त्रज्ञांची नावे देण्यात आली आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com