agriculture stories in Marathi Entrepreneurship development - starting a small business | Agrowon

लघुउद्योग चालू करण्यापूर्वीची तयारी

डॉ. विशाल सरदेशपांडे
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

या लेखामध्ये आपण लघुउद्योग चालू करण्यापूर्वी काय तयारी केली पाहिजे, याविषयी माहिती घेऊ.

मागील दोन लेखांमध्ये आपण छोट्या उद्योगात नफ्याचे महत्त्व, त्यावर परिणाम करणारे घटक व तो वाढवण्यासाठीचे धोरण या गोष्टींची माहिती घेतली. या लेखामध्ये आपण लघुउद्योग चालू करण्यापूर्वी काय तयारी केली पाहिजे, याविषयी माहिती घेऊ.

अनेक लोकांच्या मनात ‘‘मी उद्योग करू? की नोकरी करू ?’’ हा प्रश्न घोटाळत असतो. या प्रश्नाच्या उत्तरासाठी अनेकांची आयुष्यभर आणि बहुतेकांची विशेषतः उमेदीचा काळात सातत्याने धडपड चाललेली असते. अनेकांना भेटत असताना, प्रश्न विचारत असतात. मात्र, या प्रश्नाचे साधे आणि सरळ उत्तर नाही. जी उत्तरे आहेत, ती व्यक्तीगणिक बदलणारी आहेत. साधे सरळ पाहिले तरी आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारला पाहिजे. तो म्हणजे जीवनात आपल्याला काय करायचे आहे किंवा कसे जीवन जगायचे आहे? कारण प्रत्येकाचा स्वभाव आणि वृत्ती वेगळी असू शकते. एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी तुमच्याकडे वेगवेगळी कौशल्ये अपेक्षित आहेत. मात्र, त्यासोबत हवी साहसी वृत्ती! काहीं कौशल्ये ही अनुभवाने व प्रयत्नपूर्वक आत्मसात करता येतात. मात्र साहसी वृत्तीही मूलभूत असली पाहिजे.

कौशल्य प्राप्तीसाठी...

तुम्हाला नवीन उद्योग सुरू करायचा आहे. त्यासाठी आवश्यक एखाद्या कौशल्याचा तुमच्याकडे अभाव आहे तर तुम्ही प्रयत्नपूर्वक काम केल्यास ते मिळवता येते. अगदीच शक्य न होणारे असल्यास सुरवातीच्या काळात आपल्याला जो उद्योग करायचा आहे, तशाच एखाद्या छोट्या किंवा मध्यम स्वरूपाच्या उद्योगात नोकरी पत्करू शकता. अशा छोट्या उद्योगात डोळसपणे नोकरी केल्याचा मुख्य फायदा म्हणजे तुम्ही त्या व्यवसायाची विभिन्न अंगे जवळून अनुभवू शकता.
नोकरी करताना आपण दृश्य स्वरूपाची कौशल्ये उदा. विक्री, उत्पादन, आर्थिक व्यवहार याकडे लक्ष ठेवले पाहिजे. अदृश्य स्वरूपाची कौशल्ये उदा. व्यावसायिक धोरण कसे ठरवले आहे, वाटाघाटी कशा प्रकारे केल्या जातात, कामगाराचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते, अशा बाबींवर लक्ष ठेवावे. सातत्यपूर्ण प्रयत्नातून हे सारे आत्मसात करता येते. नोकरी करताना आपण जर डोळसपणे व जबाबदारीने काम केले तर कमी वेळात आपल्याला बरेच काही शिकता येते. यातून आपल्याला नव्या उद्योगाची कल्पनाही सुचू शकते. आपल्या एकंदरीत क्षमता आणि आत्मसात केलेली कौशल्ये यांचा विचार करून नवीन उद्योगाची निवड करावी.

जोखीम तिथे बक्षिसही!

कोणताही उद्योग करताना प्रामुख्याने चार प्रकारच्या जोखीम असतात.
१) कच्च्या मालाचा पुरवठा (योग्य दर व योग्य गुणवत्ता)
२) तंत्रज्ञानाची शाश्वती
३) कुशल कामगारांची आवश्यकता
४) विक्रीची हमी (योग्य दरात).
या चार पैकी एक किंवा दोन गोष्टींवर तुमचे प्रभुत्व असायला हवे. बाकी गोष्टी तुम्ही उद्योग करताना शिकू शकता.
कोणताही उद्योग हा जोखीम घेतल्याशिवाय होत नाही. अर्थात, उद्योगात जोखीम नसेल तर तो करायला खऱ्या उद्योजकालाही मजा येत नाही. असे म्हटले जाते, की जिथे जोखीम (रिस्क) असते, तिथे बक्षीस (रिवॉर्ड) असते.

कसे शिकणार - अनुभवातून किंवा दुसऱ्याच्या ठेचेतून?

छोट्या उद्योगामध्ये उद्योजक उद्योगाच्या पैशावर म्हणजेच उद्योगात होणाऱ्या नफ्याला वेठीस धरून शिकत असतो. तुम्ही किती लवकर शिकून उद्योगाचे बारकावे आत्मसात करता, यावर तुमच्या उद्योगाची यशाकडे वाटचाल ठरते.
काही गोष्टी स्वतःच्या अनुभवातून तर काही गोष्टी दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकाव्या लागतात. यासाठी उद्योजकाची दुसऱ्यांचे ऐकण्याची व त्याचे पृथक्करण (analysis) करण्याची वृत्ती विकसित केली पाहिजे. जे उद्योजक मला सगळं समजतं किंवा मी प्रत्येक गोष्ट अनुभव घेऊनच शिकणार अशा पद्धतीने किंवा हेक्याने चालणाऱ्याला यश मिळण्यासाठी खूप वेळ लागू शकतो.
उद्योग म्हणजे महाभारतातील धर्मयुद्धा सारखा आहे. या युद्धामध्ये उद्योजकरुपी पार्थाला कृष्णाची म्हणजेच अनुभवी सल्लागाराची
(मेंटरची) आवश्यकता असते. प्रत्येक वेळा सल्लागार हा कुणी व्यक्तीच असला पाहिजे असे नाही. तर ती तुम्हाला दिशा दाखवणारी विचारशक्ती किंवा प्रेरणास्रोतही असू शकते. जर तुम्ही भाग्यवान असाल तर ती तुम्हाला एखाद्या व्यक्तीमध्येच मिळू शकते. अन्यथा तुम्हाला अनेक व्यक्तींमध्ये, पुस्तकांमध्ये व इतर माध्यमांमधून शोधून ती मिळवावी लागते.

दडलेल्या संधी शोधल्या पाहिजेत...

समाजात उद्योगाच्या विविध संधी दडलेल्या असतात. त्या ओळखून त्यावर काम करून त्याचे व्यवसायात कशा प्रकारे रूपांतर करता येईल, हे पाहिले पाहिजे. नवीन उद्योग सुरू करताना आपण ‘समाजात उद्योगाच्या संधी’ (त्याला इंग्रजीमध्ये अपॉर्च्युनिटी कॅनव्हास असे म्हणतात.) या संकल्पनेचा वापर करता येतो. त्यातील आपल्याला आवडेल व झेपेल असा उद्योग निवडू शकतो.
उद्योग सुरू करताना आपले उत्पादन (product) किंवा सेवा (service) खरोखरच लोकांच्या उपयोगाची आहे का? त्यासाठी लोक पैसे खर्च करतील का? केले तर किती करतील? याचा अभ्यास करावा लागतो. त्याला किमान शक्य उत्पादन (minimum viable product) असे म्हणतात.
या संकल्पनेमध्ये आपण भावी ग्राहकांसाठी आपल्या उत्पादनाचे छोटे स्वरूप किंवा प्रतिरूप कमी खर्चात तयार करतो. हे उत्पादनाचे छोटे स्वरूप ग्राहकांना दाखवून त्याबद्दलचे त्यांचे मत, खर्च करायची तयारी व उत्पादनांकडून आणखी अपेक्षा यांचा अभिप्राय घेतो. हा अभिप्राय आपल्याला अनेकार्थाने उपयोगी पडतो. अगदी उद्योग करावा की नाही, करायचा झाल्याच तर त्यात काय सुधारणा किंवा बदल करावे लागतील हे ठरवण्यासाठी उपयोगी पडतो.

लघु उद्योगांचे सबलीकरण व त्यांची यशस्वी वाटचाल ही देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व भरभराटीसाठी महत्त्वाची आहे


इतर कृषी प्रक्रिया
बटाट्यापासून वेफर्स, पावडर, फ्रेंच...मानवी आहारामध्ये बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
लघु उद्योग आजारी का पडतात?लघुउद्योगांना दीर्घकाळ नफ्यात चालण्यासाठी अनेक...
भाजीपाल्यावरील प्राथमिक प्रक्रियासौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या...
बीटपासून बनवा पराठा, पावडर, सूपबीट ही भाजी तशी फार लोकांना आवडत नाही. मात्र,...
ग्रामीण सेवा क्षेत्रातील उद्योगांचा...ग्रामीण भागामध्ये सेवा उद्योगाच्या विस्ताराला...
सीताफळापासून बनवा आइस्क्रीम, रबडी,...सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने...
बहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धित पदार्थआवळा हे तुरट व आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे...
उत्पादन क्षेत्रातील ग्रामीण उद्योगांचे...ग्रामीण भागातील निर्मिती करणाऱ्या एका छोट्या...
छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न...मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या...
लघुउद्योग चालू करण्यापूर्वीची तयारीमागील दोन लेखांमध्ये आपण छोट्या उद्योगात नफ्याचे...
तंत्रज्ञान वापरातून टाळा अन्नाची नासाडीकार्लो पेट्रिनी यांच्या मते, प्रत्येकासाठी अन्न...
डाळिंब फळांची प्रतवारी, साठवणूकमहाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दशकांपासून डाळिंब एक...
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?नवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...
हळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...
दुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडीबऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही....
सुरणपासून रुचकर पदार्थसुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ...
टोमॅटोपासून केचअप, चटणी, वेफर्सबाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात...