जनावरांच्या शरीरावरील गोचिड निर्मुलन करण्यासाठी ग्रामीण पातळीवर सहज उपलब्ध होईल, अशा औषधी
ताज्या घडामोडी
शेतकरी नियोजन पीक ः केळी
निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड केली होती. १८ एकरांतील २५ हजार झाडांमध्ये गेल्या महिन्यापासून निसवण सुरू आहे. निसवण आणखी पुढील काही दिवस सुरू राहील.
शेतकरी - प्रेमानंद हरी महाजन,
तांदलवाडी, ता. रावेर, जि. जळगाव
एकूण क्षेत्र - ११० एकर
केळी क्षेत्र ः ६० एकर
प्रेमानंद महाजन यांच्याकडे ६० एकरांत केळी पीक असून, त्यातील गेल्या मार्च, एप्रिल महिन्यांत लागवड केलेल्या सुमारे १८ एकर केळी बागेत निसवण वेगात सुरू आहे. त्यामुळे गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये फळांची काळजी घेतली जात आहे. आगामी २० ते २५ दिवसांमध्ये फळांच्या काळजीसह पाणी व खते यांच्या व्यवस्थापन काटेकोरपणे केले जाईल.
निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड केली होती. १८ एकरांतील २५ हजार झाडांमध्ये गेल्या महिन्यापासून निसवण सुरू आहे. निसवण आणखी पुढील काही दिवस सुरू राहील.
पानांची काळजी ः
सध्या थंडी व विषम वातावरण आहे. या अवस्थेमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तो नियंत्रणात ठेवणे हे निसवलेल्या बागेसाठी महत्त्वाचे आहे. निसवणीच्या वेळेस किमान १० ते १२ हिरवीगार, मजबूत पाने झाडाला हवीत. काढणीच्या वेळेस हिरवीगार किंवा चांगल्या अवस्थेतील किमान सात पाने झाडाला हवीत. करपा रोगाने पाने पिवळी, लालसर होऊन खराब होतात. निसवलेल्या बागेत करपा रोगाने केळी अवेळी पक्व होऊन पिकण्याची समस्याही तयार होते. ही समस्या दूर करण्यासाठी केळी पिकात गेल्या १० दिवसांत करपा रोगाचा अटकाव करण्यासाठी बुरशीनाशकांची फवारणी केली. फवारणी करताना पूर्ण घडाची व्यवस्थित फॉगिंग होईल, फवारणी योग्य प्रमाणात होईल, याची काळजी घेतली.
वाढत्या फळांची काळजी ः
- फवारणीनंतर फळांची काळजी घेण्याची (फ्रूटकेअर) कार्यवाही केली. त्यात निसवलेल्या घडाचे फ्लोरेट काढले.
- घड निसवणीच्या काळामध्ये फुलकिडींचाही उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. तो नियंत्रणात ठेवण्यासाठी बड तयार होत असताना कीटकनाशकांचे इंजेक्शन दिले.
- निर्यातक्षम केळी तयार होण्यासाठी नऊ फण्यांचे सूत्र अवलंबले असून, एका घडाला फक्त नऊ फण्या ठेवल्या आहेत. घड स्कर्टिंग बॅगने झाकून घेतले आहेत.
- घड चांगले पक्व होण्यासाठी शिफारशीनुसार ठिबकद्वारे आठ दिवसांतून एकदा पोटॅश, युरिया, गंधकयुक्त खते दिली.
- सध्या तापमान कमी आहे. यानुसार रोज किमान १५ लिटर पाणी एका झाडाला मिळेल असे नियोजन केले. सध्या तापमानात चढउतार होत आहेत. त्यानुसार सिंचनाचे प्रमाण कमी अधिक केले जाते.
- घडाची वाढ व्हावी यासाठी झाडाभोवती खालच्या भागात तयार होणारे फुटवे काढून घेण्यावरही भर दिला.
पुढील २० दिवसांचे नियोजन ः
- आगामी २० ते २५ दिवस निसवण सुरूच राहणार आहे. तापमानही कमी अधिक होईल.
- वातावरणानुसार करपा रोग आटोक्यात ठेवण्यासाठी फवारणी घेतली जाईल.
- तापमान वाढल्यास सिंचनात पाण्याचे प्रमाण वाढवावे लागणार आहे.
- बागेत घड निसवतील तशी फळासंबंधी काळजी घेतली जाईल. घडांची जोमदार वाढ कशी होईल, निर्यातक्षम केळी कशा तयार होतील, या उद्देशाने ठिबकद्वारे खतांचे नियोजन केले जाईल.
प्रेमानंद हरी महाजन, ९७६३८९३७७७
- 1 of 1055
- ››