agriculture stories in marathi Farmers planning, Banana fruit | Page 3 ||| Agrowon

शेतकरी नियोजन पीक ः केळी

चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड केली होती. १८ एकरांतील २५ हजार झाडांमध्ये गेल्या महिन्यापासून निसवण सुरू आहे. निसवण आणखी पुढील काही दिवस सुरू राहील.

शेतकरी - प्रेमानंद हरी महाजन,
तांदलवाडी, ता. रावेर, जि. जळगाव
एकूण क्षेत्र - ११० एकर
केळी क्षेत्र ः ६० एकर

प्रेमानंद महाजन यांच्याकडे ६० एकरांत केळी पीक असून, त्यातील गेल्या मार्च, एप्रिल महिन्यांत लागवड केलेल्या सुमारे १८ एकर केळी बागेत निसवण वेगात सुरू आहे. त्यामुळे गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये फळांची काळजी घेतली जात आहे. आगामी २० ते २५ दिवसांमध्ये फळांच्या काळजीसह पाणी व खते यांच्या व्यवस्थापन काटेकोरपणे केले जाईल.
निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड केली होती. १८ एकरांतील २५ हजार झाडांमध्ये गेल्या महिन्यापासून निसवण सुरू आहे. निसवण आणखी पुढील काही दिवस सुरू राहील.

पानांची काळजी ः
सध्या थंडी व विषम वातावरण आहे. या अवस्थेमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तो नियंत्रणात ठेवणे हे निसवलेल्या बागेसाठी महत्त्वाचे आहे. निसवणीच्या वेळेस किमान १० ते १२ हिरवीगार, मजबूत पाने झाडाला हवीत. काढणीच्या वेळेस हिरवीगार किंवा चांगल्या अवस्थेतील किमान सात पाने झाडाला हवीत. करपा रोगाने पाने पिवळी, लालसर होऊन खराब होतात. निसवलेल्या बागेत करपा रोगाने केळी अवेळी पक्व होऊन पिकण्याची समस्याही तयार होते. ही समस्या दूर करण्यासाठी केळी पिकात गेल्या १० दिवसांत करपा रोगाचा अटकाव करण्यासाठी बुरशीनाशकांची फवारणी केली. फवारणी करताना पूर्ण घडाची व्यवस्थित फॉगिंग होईल, फवारणी योग्य प्रमाणात होईल, याची काळजी घेतली.

वाढत्या फळांची काळजी ः

  • फवारणीनंतर फळांची काळजी घेण्याची (फ्रूटकेअर) कार्यवाही केली. त्यात निसवलेल्या घडाचे फ्लोरेट काढले.
  • घड निसवणीच्या काळामध्ये फुलकिडींचाही उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. तो नियंत्रणात ठेवण्यासाठी बड तयार होत असताना कीटकनाशकांचे इंजेक्शन दिले.
  • निर्यातक्षम केळी तयार होण्यासाठी नऊ फण्यांचे सूत्र अवलंबले असून, एका घडाला फक्त नऊ फण्या ठेवल्या आहेत. घड स्कर्टिंग बॅगने झाकून घेतले आहेत.
  • घड चांगले पक्व होण्यासाठी शिफारशीनुसार ठिबकद्वारे आठ दिवसांतून एकदा पोटॅश, युरिया, गंधकयुक्त खते दिली.
  • सध्या तापमान कमी आहे. यानुसार रोज किमान १५ लिटर पाणी एका झाडाला मिळेल असे नियोजन केले. सध्या तापमानात चढउतार होत आहेत. त्यानुसार सिंचनाचे प्रमाण कमी अधिक केले जाते.
  • घडाची वाढ व्हावी यासाठी झाडाभोवती खालच्या भागात तयार होणारे फुटवे काढून घेण्यावरही भर दिला.

पुढील २० दिवसांचे नियोजन ः

  • आगामी २० ते २५ दिवस निसवण सुरूच राहणार आहे. तापमानही कमी अधिक होईल.
  • वातावरणानुसार करपा रोग आटोक्यात ठेवण्यासाठी फवारणी घेतली जाईल.
  • तापमान वाढल्यास सिंचनात पाण्याचे प्रमाण वाढवावे लागणार आहे.
  • बागेत घड निसवतील तशी फळासंबंधी काळजी घेतली जाईल. घडांची जोमदार वाढ कशी होईल, निर्यातक्षम केळी कशा तयार होतील, या उद्देशाने ठिबकद्वारे खतांचे नियोजन केले जाईल.

प्रेमानंद हरी महाजन, ९७६३८९३७७७

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
शासकीय हरभरा खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
बंद आठवडी बाजाराचा कांदा उत्पादकांना...जळगाव ः जळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार ६ मार्चपर्यंत...
महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘...रत्नागिरी ः पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगार...
कापडण्यात कांद्याला फटकाकापडणे, जि. धुळे : पावसाळ्यात सलग तीन महिने पाऊस...
परभणी जिल्ह्यात अवकाळीने हरभरा, ज्वारी...परभणी ः जिल्ह्यात या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस...
मारुती माळ येथे टस्कराचे दर्शनकोल्हापूर ः बाळेघोल (ता. कागल) येथील जंगलातून...
मराठवाड्यात अवकाळीने ३३ टक्के पिकांचे...औरंगाबाद : अठरा व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्तांसाठी...नांदेड : जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे २०२० या...
निम्न पेढी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण...अमरावती : निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती व अकोला...
...तर खंडणीचे गुन्हे दाखल करा ः गरडपुणे ः ‘‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली...
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा...कोल्हापूर ः राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून...
बाजार समित्यांनी पेट्रोल, सीएनजी पंप...परभणी ः उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा...
जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची ‘गिनेस...जळगाव :  जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष...
सातारा जिल्ह्यात ५५ टक्के क्षेत्रावर...सातारा ः जिल्ह्यात २५ फेब्रुवारीअखेर तीन हजार १५४...
शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी योजनामहाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि नाबार्डद्वारे...
कृषी सल्ला (परभणी विभाग)पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळी भाजीपाला...
राज्यात टोमॅटो १५० ते १००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला ३०० ते ६०० रुपये दर...
वनशेतीमध्ये चारा पिकांची लागवड फायदेशीर...वनशेतीमध्ये वनीय कुरण, कृषी वनीयकुरण, उद्यान...
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...