agriculture stories in marathi Farmers planning, Banana fruit cotton | Agrowon

शेतकरी नियोजन ः पीक केळी

शब्दांकन- चंद्रकांत जाधव
गुरुवार, 7 जानेवारी 2021

तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथील प्रेमानंद हरी महाजन यांच्यांकडे विविध टप्प्यांत लागवड केलेली सुमारे ६० एकर केळी आहे. पिकाचे केलेले नियोजन...

-----------------------
शेतकरी ः प्रेमानंद हरी महाजन
गाव ः तांदलवाडी, ता. रावेर, जि. जळगाव
एकूण क्षेत्र ः ११० एकर
केळी क्षेत्र ः ६० एकर
-------------------------

तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथील प्रेमानंद हरी महाजन यांच्यांकडे विविध टप्प्यांत लागवड केलेली सुमारे ६० एकर केळी आहे. त्यात मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट यादरम्यान लागवड झालेल्या केळीचे प्रमाण अधिक आहे.

  • खानदेशात सध्या थंड वातावरण असून, सूर्यप्रकाश कमी आहे. अशा स्थितीत काढणीवरील केळी बागांचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला आहे. मार्च, एप्रिल, मे यादरम्यान लागवडीच्या बागांची काढणी येत्या आठ व १५ दिवसांत सुरू होईल.
  • उतिसंवर्धित रोपांची १०० टक्के लागवड केली आहे. केळीची निर्यात केली जाते. निर्यातक्षम उत्पादनासाठी बागांचे नियोजन केले आहे.
  •  लागवड व काढणीचा कालावधी उन्हाळ्यात असल्याने काढणीवरील बागांची लागवड गादीवाफ्यावर साडेपाच फूट बाय साडेपाच फूट या अंतरात लागवड केली आहे. अन्य बागांची लागवड सहा फूट बाय सहा फूट अंतरात आहे.
  • काढणीवरील बागांना सध्या दर सात दिवसाआड नत्र, गंधक व पालाश दिले जात आहे. ठिबकद्वारे प्रति एक हजार केळी झाडांना पाच किलो गंधक, सात किलो नत्र व १० किलो पालाश दिले जाते. यामुळे केळी घडांना चमकदारपणा येऊन, केळांचा आकार व लांबी वाढते. निर्यातक्षम केळी उत्पादनाच्या दृष्टीने केळीचा घेर, चमकदारपणा, लांबी याला अतिशय महत्त्व आहे. या खतांचा नियमित वापर केल्याने चांगला परिणाम दिसत आहे.
  • काढणीवरील केळी बागांमध्ये थंडीमुळे करपा रोगाची लक्षणे दिसत आहेत. ही बाब लक्षात घेऊन बागेची चांगली स्वच्छता केली आहे. बागेतील रोगग्रस्त किंवा रोगाला बळी पडू शकणारी पाने बागेबाहेर काढून ती जाळून नष्ट केली आहेत. बागेत बुरशीनाशकाची शिफारशीत मात्रेनुसार फवारणीही घेतली आहे.
  •  बागेतील केळी झाडांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी निश्‍चित वेळापत्रकानुसार मोनो पोटॅशिअम फॉस्फेट (०.५४.३४) यासोबत कॅल्शिअम, बोरॉन याचीदेखील योग्य मात्रेनसार फवारणी घेतली आहे.
  •  घडाच्या कमळातील पाने काढून घेतली आहेत. बागेत पाने कुजणार नाहीत, याची काळजी घेतली आहे.
  •  केळी घडांची चांगली वाढ दिसत आहे. वेळेत काढणी होईल, अशी स्थिती योग्य व्यवस्थापनामुळे तयार झाली आहे.

- प्रेमानंद महाजन, ९७६३८९३७७७
(संपर्क ः दुपारी दोन ते तीन या वेळेत.)


इतर प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची
शेतकरी नियोजन (पीक : कलिंगड)माझी गाढोदे (ता. जळगाव) येथे गिरणा, तापी नदीच्या...
शेतकरी नियोजन- पीक - डाळिंबशेतकरी- ः ज्ञानेश्‍वर वाघमोडे गाव ः चळे, ता....
शेतकरी नियोजन पीक ः केळीशेतकरी - प्रेमानंद हरी महाजन, तांदलवाडी, ता....
केळी सल्लामृग बागेतील केळी गर्भावस्थेत आहेत. कांदेबाग लागवड...
शेतकरी नियोजन ः पीक केळी----------------------- शेतकरी ः प्रेमानंद हरी...
तंत्र कारले लागवडीचे...साधारण कारल्याच्या तुलनेत आकाराने लहान असलेल्या...
वाढत्या थंडीचे फळबागांवरील परिणामगेल्या आठवड्यापासून राज्यामध्ये वातावरणात बदल...
सुपिकतेसाठी माती परीक्षण गरजेचेमाती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे...
अशी करा काजू लागवड...पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जमिनीत, जांभा...
..अशी करा करवंदाची लागवडकरवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत...
पंढरपुरी म्हैस : हलक्‍या चाऱ्यावर तग...पंढरपुरी म्हैस ही हलक्‍या चाऱ्यावर तग धरून...
फणस उत्पादनवाढीसाठी झाडाचे व्यवस्थापन...१) फणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
रताळे लागवडरताळे लागवडीसाठी साधारण उतार असलेली व उत्तम...
शेवगा लागवड तंत्रज्ञानशेवगा लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे...
एरंडी लागवड तंत्रएरंडी लागवड हलक्‍या व मध्यम जमिनीवर जून ते...
फणस उत्पादनासाठी झाडाचे व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
नारळ बागेत मसाला पिकांची लागवड    नारळ बागेमध्ये नारळाच्या...
मोगरा लागवडमोगरा लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा...
ट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्याचा कीड...कीड नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा वापर...
पानवेल, लवंग, जायफळ, काजू लागवड कशी...पानवेल लागवड कशी करावी? - व्ही. के. देवकर,...