agriculture stories in marathi Farmers planning, crop cotton | Page 2 ||| Agrowon

शेतकरी नियोजन (पीक कापूस)

गोपाल हागे
गुरुवार, 2 जुलै 2020

कपाशीची लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच ५ तारखेला केली. यंदा १२ एकरांत लागवड असून, यासाठी पाच कंपन्यांच्या विविध वाणांची निवड केली. पिकातील नियोजन व्यवस्थापनाची ही माहिती...

पीक - कापूस
गणेश शामराव नानोटे,
निंभारा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला
क्षेत्र - १२ एकर

  • यंदा मी शासकीय शिफारशीनुसार कपाशीची लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच ५ तारखेला केली. यंदा १२ एकरांत लागवड असून, यासाठी पाच कंपन्यांच्या विविध वाणांची निवड केली. माझी शेती सर्वसाधारण प्रकारची असून, जमिनीच्या मगदुरानुसार पिकातील अंतर ३.२५ बाय १.२५ फूट एवढे ठेवले आहे. या अंतरानुसार एकरी झाडाची संख्या १० हजारांपर्यंत राहिली.
  • या सर्व कापूस क्षेत्राच्या सिंचनासाठी तुषार पद्धतीचा अवलंब करतो. पेरणीवेळी पाऊस नसल्यामुळे तुषार सिंचन पद्धतीने पिकाची उगवण केली. त्यामुळे पिकात खाडे भरण्याची गरज पडली नाही.
  • बैलाद्वारे केलेल्या पेरणीसोबत एकरी एक बॅग डीएपी सरत्याद्वारे दिले. आवश्‍यकतेनुसार तुषार सिंचनाचा वापर करत आहे.
  • पिकाला आतापर्यंत दोन डवरणी झालेल्या आहेत. काही क्षेत्रात मजुरांच्या मदतीने निंदण केले. एकरी १० मजूर लागले. काही क्षेत्रात तणनाशकांचा वापर केला.
  • माझ्या शेताचा सेंद्रिय कर्ब चांगला ठेवण्यासाठी मागील २५ वर्षांपासून मी शेतात गव्हाचे काड; तर ११ वर्षांपासून कापसाचे संपूर्ण पीक रोटाव्हेटरद्वारे जमिनीत गाडत आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून तणे (गाजर गवतासह इतर) जागेवर कुजवितो. परिणामी,माझ्या जमिनी भुसभुशीत असून, गांडुळाची संख्याही लक्षणीय आहे.
  • विकत घेतलेल्या बियाण्यांस मुळात प्रक्रिया केलेली असल्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेत होणारा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसत नाही.
  • पीक पेरणीपासून आता ३० दिवसांनी खताचा दुसरा हप्ता १ बॅग १०.२६.२६, युरिया २२ किलो आणि पाच किलो सल्फर देणार आहे. माझे खताच्या सर्व मात्रा ६० दिवसांमध्ये संपविण्याचे नियोजन असते. मी दरवर्षी ४० किलो नत्र, ३५ किलो स्फुरद, ३० किलो पालाश एवढी एकूण खते देतो. यंदाही तितकेच नियोजन केले आहे.
  • पेरणीपासून ३५व्या दिवशी गुलाबी बोंड अळीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी कामगंध सापळे एकरी चार या प्रमाणात लावणार आहे. सापळ्यात पतंग आढळल्यास पीकसंरक्षणाचे नियोजन करता येते. पतंगाची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा अधिक झाल्यानंतर फवारणी करतो. दरम्यान, किडीची आश्रयस्थाने असलेल्या बांध, धुरे यांच्यावर फवारणी केल्यास किडींना बऱ्यापैकी अटकाव करता येतो.
  • आमच्या परिसरात माकडे, नीलगाय, हरीण, रानडुक्कर अशा वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी दक्ष राहावे लागते.
  • पावसाने उघडीप दिल्यास तुषार संचाद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केलेली आहे.

संपर्क ः गणेश शामराव नानोटे, ९५७९१५४००४


इतर नगदी पिके
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापनगुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे...
कपाशीवरील तुडतुड्याचे नियंत्रणतुडतुडे ही बी टी कपाशीवरील सर्वात महत्त्वाची रस...
आडसाली उसासाठी खतमात्रेचे नियोजनउसाच्या योग्य वाढीसाठी माती परिक्षणाच्या...
नियोजन आडसाली ऊस लागवडीचेलागवड १५ जुलै ते १५ ऑगष्टपर्यंत करावी.जोडओळ पट्टा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...
शेतकरी नियोजन (पीक कापूस)पीक - कापूस गणेश शामराव नानोटे, निंभारा, ता....
कपाशी लागवडीमध्ये नवा दृष्टिकोन हवा दरवर्षी कपाशीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
एकात्मिक व्यवस्थापनातून वाढवा बीटी...अलीकडील वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घटत...
गुलाबी बोंडअळी रोखण्यासाठी पूर्वहंगामी...कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या...
ऊस पिकासाठी योग्य ठिबक सिंचन पद्धतउसासाठी योग्य ठिबक सिंचन ठिबक सिंचन पद्धती...
सुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...
सुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये...
उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म...जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके...
उसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रारासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
ऊस पीक सल्ला१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत...