agriculture stories in marathi Farmers planning, crop cotton | Agrowon

वेचणीयोग्य कपाशीला येत्या पावसाची चिंता

गोपाल हागे
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

माझे कापसाचे पीक जवळपास ११५ ते १२० दिवसांचे झाले आहे.  अपेक्षित बोंड आता परिपक्व झाले आहेत. मला आता नवीन पाते, फुले, बोंड यांची अपेक्षा नाही. 

माझे कापसाचे पीक जवळपास ११५ ते १२० दिवसांचे झाले आहे.  अपेक्षित बोंड आता परिपक्व झाले आहेत. मला आता नवीन पाते, फुले, बोंड यांची अपेक्षा नाही. 
पिकावर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव नगण्य आहे. थोड्या प्रमाणात पांढरी माशी दिसून येत असली तरी त्याची नियंत्रणाची गरज वाटत नाही. 

गुलाबी बोंडअळीचे पतंग सुद्धा शेतात दिसत नाही. 
पिकावर दहिया या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परंतु त्यामुळे होणारी पानगळ नुकसानदायक ठरणार नाही. कारण माझे पीक १६५ दिवसानंतर काढणीचे नियोजन आहे. 

मी दरवर्षी कपाशीचे फरदड न घेता रब्बी पिके घेण्याचे नियोजन करीत असतो. कपाशीचे पीक १६५ दिवसानंतर काढणी करून रब्बी  हंगामामध्ये गहू, हरभरा किंवा कांदा यासारखे पीक घेता येईल. याचा सर्वात मोठा फायदा जमिनीचा पोत राखण्यासाठी होतो. याचा दुसरा फायदा म्हणजे आपल्याला उत्पन्नात सातत्य राखता येते. 

मागील पंधरवड्यात सततच्या पावसामुळे काही प्रमाणात बोंड काळे पडले होते. त्यामधून निघणारा कापूस कवळीयुक्त, काळपट, ओलसर निघाला. त्याचा वेचणीचा खर्चसुद्धा जास्त आला. निघालेला कापूस दोन दिवस उन्हात वाळू घातला. हा निघालेला कापूस वेगळा ठेवणार आहे. या दर्जाचा कापूस संकलन केंद्रावरून परत आणावा लागला होता. सीसीआयच्या निकषात बसेल अशा दर्जाचा कापूसच संकलन केंद्रावर नेण्याचे माझे नियोजन असते. यामुळे कापूस विक्रीला फारसा त्रास होत नाही. 

आता लवकरच कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करणार आहे. त्यामुळे भविष्यात गर्दीचा त्रास होणार नाही.

पुढील आठवड्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस येण्याची शक्यता आहे. बोंडे उमलली आहेत. मात्र, सोयाबीन सोंगणीचा हंगाम सुरू असल्यामुळे मजूर उपलब्ध होणे शक्य नाही. पाऊस कसा व किती दिवस येतो यावरच कापसाची गुणवत्ता ठरणार आहे. पाऊस थांबल्यावरच त्याचे नियोजन ठरवावे लागेल.

 : गणेश शामराव नानोटे, ९५७९१५४००४
 


इतर नगदी पिके
उन्हाळी कांदा पिकाची काढणी, साठवणूक कांदा पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची निवड...
उन्हाळ्यात राबवा प्रभावी सिंचन...पाणी हा ऊस उत्पादनातील अतिशय महत्त्वाचा व...
खोडवा ऊस व्यवस्थापनाचे सुधारित तंत्रराज्यामध्ये तिन्ही हंगामांतील ऊस  तुटून...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरसूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांची उसाच्या पानांवर...
दर्जेदार कांदा बीजोत्पादनासाठी...उत्तम कांदा बीजोत्पादनासाठी कंदाच्या योग्य...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी...
व्यवस्थापन ऊस पाचटाचे ...पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच...
सुरू उसातील सूक्ष्मअन्नद्रव्य व्यवस्थापनमाती परीक्षण अहवालानुसार जमिनीत या सूक्ष्म...
नियोजन सुरू ऊस लागवडीचे...सुरू हंगामातील ऊस लागवड १५ डिसेंबर ते १५...
ऊस पिकावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापनपश्‍चिम महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यापासून ते...
आरआरसी’ म्हणजे काय रे भाऊ...?राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर...
गुलाबी बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापनाकडे...सध्या अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या...
सूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांदा लागवडकांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
वेचणीयोग्य कपाशीला येत्या पावसाची चिंतामाझे कापसाचे पीक जवळपास ११५ ते १२० दिवसांचे झाले...
दर्जेदार कांदा रोपनिर्मितीचे तंत्रमहाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोरायनेस्पोरा बुरशीजन्य पानांवरील ठिपके...कपाशीचे पीक हे सध्या ६० ते ७५ दिवसांचे आहे....
कपाशीवरील रस शोषक किडींचे एकात्मिक...सध्या ढगाळ वातावरण कायम असून, कपाशीवर रस शोषक...
कपाशीतील बोंडे सडण्यावरील उपाययोजनामहाराष्ट्राच्या प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात...