agriculture stories in Marathi Farmers planning, pomegranate | Agrowon

शेतकरी नियोजन- पीक - डाळिंब

सुदर्शन सुतार
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

सध्या मृग बहरातील बागेत स्वच्छतेचे काम सुरू आहे. हस्त बहराच्या बागेत फळे फुगवण अवस्थेत आहेत. तर आंबिया बहरासाठी बाग सध्या ताणावर आहे.

शेतकरी- ः ज्ञानेश्‍वर वाघमोडे
गाव ः चळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
एकूण क्षेत्र ः २१ एकर
डाळिंब क्षेत्र ः २१ एकर

चळे (ता. पंढरपूर) येथे माझी २१ एकर शेती आहे. गेल्या १३ वर्षांपासून डाळिंब बाग असून, १० वर्षांपासून संपूर्ण निर्यातक्षम उत्पादन घेत आहे. माझ्याकडे फुले भगवा या जातीची लागवड आहे. या वर्षी महाराष्ट्रातून युरोपला निर्यात करणाऱ्या तीन शेतकऱ्यांमध्ये माझा समावेश आहे. वर्षातील मृग, हस्त आणि अंबिया या तीनही बहरात डाळिंब उत्पादन घेतो. दरवर्षी सरासरी एकरी ८ ते १० टन निर्यातक्षम उत्पादन असते. प्रत्येकाचे निर्यातीसाठी योग्य ठरेल, अशा प्रकारे नियोजन ठरवले आहे. त्यानुसार त्या त्या हंगामात बागेचे नियोजन करतो. मृग बहराच्या बागेचे क्षेत्र ९ एकर, हस्त बहरातील बाग ६ एकर आणि आंबिया बहराचे सहा एकर असे क्षेत्र आहे. सध्या मृग बहरातील बागेत स्वच्छतेचे काम सुरू आहे. हस्त बहराच्या बागेत फळे फुगवण अवस्थेत आहेत. तर आंबिया बहरासाठी बाग सध्या ताणावर आहे.

मृग बहरातील बागा

 • गेल्या पंधरवड्यापासून बागेतील खराब फळे काढून टाकणे, अनावश्यक फांद्या काढण्याचे काम सुरू आहे.
 • झाडाला अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात मिळावेत. यासाठी मुख्य अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्यासह
 • सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस दिला आहे.
 • कीड-रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या आठवड्यातच कीडनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारणी घेतली आहे.
 •  झाडाच्या वयानुसार ४० ते ६० किलो या प्रमाणात प्रति झाडाला शेणखत टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.
 • यामध्ये पाण्याचा वापर मात्र अगदीच काटेकोर केला जातो. जमिनीत वाफसा स्थितीत ओलावा ठेवला जातो.

हस्त बहरातील बाग

 • या बागेतील फळ सध्या फुगवण अवस्थेत आहे.
 • फळाचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी त्याला क्रॉप कव्हर लावण्याचे काम सुरू आहे.
 • अन्नद्रव्यांसाठी नत्र, स्फुरद आणि पालाशच्या मात्रा देत आहे. त्या एसओपी आणि कॅल्शिअम नायट्रेटच्या स्वरूपात दिला आहे.
 • या कालावधीत फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यासाठी फवारणी घेतली आहे.
 • सध्या बुरशीजन्य रोगांचा फारसा प्रादुर्भाव दिसत नाही. मात्र मध्येच येणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जैविक बुरशीनाशकांची फवारणी केली आहे.

सध्या जानेवारीत आंबिया बहर
सध्या जानेवारी महिन्यामध्ये बागेची ताण अवस्था आहे. येथे बहर धरण्याचे नियोजन सुरू आहे.

 • पानगळ केली जात आहे.
 • बागेला पहिले पाणी ८ ते १० तासांपर्यंत देतो आहे.
 • त्यानंतर पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा लागणार आहे.
 • या कालावधीत नवीन बहराच्या बागेवर मावा या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी पाने चिकट होऊन, त्यावर बुरशींची वाढ होत असल्याने त्याला चिकटा असेही म्हटले जाते. या किडीला आटोक्यात ठेवण्यासाठी कीटकनाशकाची एक फवारणी घेतली आहे.
 • पुढील पंधरवड्यातही या किडीच्या प्रमाणावर लक्ष ठेवावे लागणार आहे.

संपर्क ः ज्ञानेश्‍वर वाघमोडे, ९८८१६५४५२५
(शब्दांकन ः सुदर्शन सुतार)


इतर प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची
शेतकरी नियोजन (पीक : कलिंगड)माझी गाढोदे (ता. जळगाव) येथे गिरणा, तापी नदीच्या...
शेतकरी नियोजन- पीक - डाळिंबशेतकरी- ः ज्ञानेश्‍वर वाघमोडे गाव ः चळे, ता....
शेतकरी नियोजन पीक ः केळीशेतकरी - प्रेमानंद हरी महाजन, तांदलवाडी, ता....
केळी सल्लामृग बागेतील केळी गर्भावस्थेत आहेत. कांदेबाग लागवड...
शेतकरी नियोजन ः पीक केळी----------------------- शेतकरी ः प्रेमानंद हरी...
तंत्र कारले लागवडीचे...साधारण कारल्याच्या तुलनेत आकाराने लहान असलेल्या...
वाढत्या थंडीचे फळबागांवरील परिणामगेल्या आठवड्यापासून राज्यामध्ये वातावरणात बदल...
सुपिकतेसाठी माती परीक्षण गरजेचेमाती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे...
अशी करा काजू लागवड...पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जमिनीत, जांभा...
..अशी करा करवंदाची लागवडकरवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत...
पंढरपुरी म्हैस : हलक्‍या चाऱ्यावर तग...पंढरपुरी म्हैस ही हलक्‍या चाऱ्यावर तग धरून...
फणस उत्पादनवाढीसाठी झाडाचे व्यवस्थापन...१) फणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
रताळे लागवडरताळे लागवडीसाठी साधारण उतार असलेली व उत्तम...
शेवगा लागवड तंत्रज्ञानशेवगा लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे...
एरंडी लागवड तंत्रएरंडी लागवड हलक्‍या व मध्यम जमिनीवर जून ते...
फणस उत्पादनासाठी झाडाचे व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
नारळ बागेत मसाला पिकांची लागवड    नारळ बागेमध्ये नारळाच्या...
मोगरा लागवडमोगरा लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा...
ट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्याचा कीड...कीड नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा वापर...
पानवेल, लवंग, जायफळ, काजू लागवड कशी...पानवेल लागवड कशी करावी? - व्ही. के. देवकर,...