agriculture stories in marathi Farmers planning Rice, Nitin Gaikwad, Chandkhed, Maval, Dist. Pune | Agrowon

शेतकरी नियोजन : भात शेतीत सेंद्रिय कर्ब उपलब्धतेसाठी वापरतो तीनही पर्याय

टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जून 2020

भात पिकांसाठी अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी वरील तिन्ही पद्धतीचा वापर गेल्या सात वर्षांपासून करत आहे. यामुळे जमिनीच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाली आहे. या तंत्राने पिकांना नत्र आणि सेंद्रिय कर्बाची उपलब्धता होते. रासायनिक खतांवरील खर्चात बचत होते.

शेतकरी नियोजन

शेतकरी ः नितीन चंद्रकांत गायकवाड
चांदखेड, ता. मावळ, जि. पुणे
एकूण शेती - १३.५ एकर
भाताखालील क्षेत्र एकर ः ३.५ एकर

सध्या माझी भातरोपे २० दिवसांची झाली आहेत. ती लागवड योग्य झाली आहेत. चारसूत्री पद्धतीने लागवडीचे नियोजन केले असून, त्यासाठी भात खाचरामध्ये ग्लिरिसिडीयाचा पाला अंथरला होता. त्याचा पाला आता गळून पडला असून, त्यांचा शिल्लक राहिलेल्या फांद्या बांधावर काढून घेतल्या आहेत.
काही भात खाचरामध्ये ताग आणि धैंचा या हिरवळीच्या खतपिकांची लागवड केली आहे. त्यांची वाढ जोमात आहे. दोन दिवसांमध्ये पॉवर टिलरने चिखलणी करतेवेळी तो गाडून घेणार आहे. एका खाचरामध्ये ३ आठवड्यापूर्वी गेल्या वर्षीच्या भाताचा शिल्लक पेंढा पसरून घेतला होता. तो आता कुजण्याच्या परिस्थितीत आहे. या सर्व खाचरांची चिखलणी येत्या दोन दिवसांत करण्याचे नियोजन केले आहे.
भात पिकांसाठी अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी वरील तिन्ही पद्धतीचा वापर गेल्या सात वर्षांपासून करत आहे. यामुळे जमिनीच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाली आहे. या तंत्राने पिकांना नत्र आणि सेंद्रिय कर्बाची उपलब्धता होते. रासायनिक खतांवरील खर्चात बचत होते.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचे नियोजन केले आहे. १५ बाय १५ सेंमी अंतरावर खुणा केलेल्या दोरीद्वारे एका जागी एकच रोप रोवणी करतो. या पद्धतीमध्ये १५ सेंमी आणि २५ सेंमी असे दोन पट्टे तयार होतात. त्यातील १५ सेंमीच्या पट्ट्यात मध्यावर लागवडीच्या दिवशीच युरिया-डिएपी (६० ः४०) ब्रिकेट्स रोवतो. म्हणजेच खतातील अन्नद्रव्यांचा चारही रोपांना समान व सावकाश पुरवठा होतो. २५ सेंमी च्या पट्ट्याचा उपयोग बेणणी करण्यासाठी चालताना होतो. या पद्धतीने सर्व रोपांना चांगला सूर्यप्रकाश व खेळती हवा मिळत असल्याने रोपांची जोमदार वाढ होते. उत्पादनात वाढ होते.

मॅट पद्धतीने रोपवाटिका, यंत्राने लागवड

यावर्षी प्रथमच एक एकर क्षेत्रावर यंत्राने भात लागवडीचे नियोजन केले आहे. साधारण दोन एकर लागवडीसाठी पुरेल एवढी रोपवाटिका मॅट पद्धतीने तयार केली आहे. किंचित उंच गादीवाफे करून त्यावर प्लॅस्टिक मल्चिंग अंथरले आहे. त्यावर ४ फूट बाय ४ फूट लोखंडी साचे ठेवले. त्यात रोपांच्या १० लाद्या तयार होतात. किंचित मातीचा थर टाकून रोपे तयार केली आहेत. आता ही रोपे १८ दिवसांची झाली आहेत. ही रोपे लवकर लागवडयोग्य होतात. लागवडीसाठी मजुरांची कमतरता अलीकडे फारच भासत आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणाचा पर्याय अवलंबून बघणार आहे. यंत्राने लागवडीचा खर्च एकरी दोन ते अडीच हजार रुपये लागेल, असा अंदाज आहे.
सध्या पावसाची वाट पाहत आहे. पाऊस झाल्यानंतर यंत्राने त्वरित लागवड करणार आहे.

संपर्क ः ७५८८२४९७०९


इतर तृणधान्ये
चाऱ्यासाठी ज्वारीचा नवा वाण ‘सीएसव्ही...चारा पीक म्हणून ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे....
रहू, चटई पद्धतीने भात लागवडीचे नियोजनचटई पद्धतीने नवीन भात रोपवाटिका तयार करावी. या...
ज्वारी उत्पादनवाढीची सूत्रेज्वारी हे कमी पावसात धान्य व कडब्याचे हमखास...
शेतकरी नियोजन : भात शेतीत सेंद्रिय कर्ब...शेतकरी नियोजन शेतकरी ः नितीन चंद्रकांत गायकवाड...
खरीप ज्वारी लागवडीची सूत्रेअन्न आणि चारा उत्पादनासाठी महत्त्वाचे अन्नधान्य...
भात पुर्नलागवडीची चारसूत्री पद्धतीसूत्र १  भातपिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व...
भात पिकासाठी सुधारित लागवड व्यवस्थापनभारतातील प्रमुख अन्नधान्याखालील पिकक्षेत्रापैकी...
धान्य, चाऱ्यासाठी बाजरीबाजरी हे पीक पाण्याच्या ताणाला सहनशील आणि...
भरघोस मका उत्पादनासाठी सुधारीत पद्धतीमहाराष्ट्रात रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात मका...
तंत्र खरीप ज्वारी लागवडीचे..पेरणी १५ जून ते १० जूलै दरम्यान करावी. पेरणीसाठी...
साठवणूकीतील कीडी रोखण्यासाठी उपाययोजनाशेतीमालाच्या साठवणुकीच्या किफायतशीर आणि...
बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...
आरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...
असे करा ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण..ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा...
असे करा गव्हावरील तांबेरा रोगाचे...गहू पिकाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेले...
असे करा ज्वारी, गव्हावरील खोडमाशीचे...रब्बी हंगामातील ज्वारी व गहू पिकावर खोडमाशीचा...
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा...तूर शेंगा पक्वतेची अवस्था शेंग माशी, घाटे अळी...
असे करा गहू पिकावरील खोडमाशी व मावा...गहू पिकात बुटक्या आणि मध्यम बुटक्या वाणांचा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
नियोजन गव्हाच्या उशिरा पेरणीचे बागायत उशिरा पेरणीची शिफारस १६ नोव्हेंबर ते १५...