agriculture stories in marathi Farmers of Vidarbha attracts towards cash crops | Agrowon

विदर्भातील शेतकऱ्यांनाही खुणावताहेत नगदी पिके

विनोद इंगोले
बुधवार, 1 जुलै 2020

संत्रा, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा ही विदर्भाची ओळख. मात्र, गेल्या दहा वर्षामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांना हळद, आले, मका, केळी यांसारखी नगदी पिके खुणावत आहेत. वर्धा, अकोला, यवतमाळ, अमरावती हे जिल्हे केळी लागवडीसाठी नावारूपास येत आहेत.

संत्रा, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा ही विदर्भाची ओळख. मात्र, गेल्या दहा वर्षामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांना हळद, आले, मका, केळी यांसारखी नगदी पिके खुणावत आहेत. वर्धा, अकोला, यवतमाळ, अमरावती हे जिल्हे केळी लागवडीसाठी नावारूपास येत आहेत. अमरावती, नागपूर या संत्रा उत्पादक जिल्ह्यांत आता मका लागवड क्षेत्र वाढत आहे.

तिवसा तालुक्‍यात भुईमूग, धारणी, चिखलदरा, अचलपूर या तीन तालुक्‍यांत मका क्षेत्र वाढीस लागले आहे. धारणी, चिखलदरा उन्हाळी मूग, चांदूरबाजार, पथ्रोट, अचलपूर हा भाग केळीने व्यापला आहे. नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात हळद लागवडीसाठी कोरडवाहू शेतकऱ्यांनी सिंचनासाठी संरक्षित स्रोत तयार केले आहेत. वरुड, मोर्शी हे परंपरागत संत्रा उत्पादक तालुके असून या दोन्ही तालुक्‍यांत ५५ हजार हेक्‍टरवर उत्पादनक्षम संत्रा झाडे आहेत. नांदगाव खंडेश्‍वर या तालुक्‍यातील चोर माहुली गावात ५० हेक्टर क्षेत्रावर लिंबू लागवड आहे.

पेरूसाठी बुलडाणा जिल्हा
कापूस, सोयाबीन अशी पारंपरिक पिकांच्या जोडीला बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर, बुलडाणा या तीन तालुक्‍यांत पेरूची २०० हेक्‍टरपर्यंत लागवड झाली आहे. संग्रामपूर, नांदुरा, बुलडाणा मका, संग्रामपूर, टुणकी, काकनवाडा, कोंटी, वारणा खामगाव या भागात केळी लागवड वाढली आहे.

वर्धा जिल्ह्यात केळी, भुईमूग लागवड
मुख्यत्वे कापूस उत्पादक वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्‍यात केळी पिकाखाली ५० ते ६० एकर क्षेत्र आले आहे. आर्वी, आष्टी, कारंजा या तालुक्‍यात भुईमुगाचा २००० हेक्‍टरपर्यंत विस्तार झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

यवतमाळमध्ये भुईमुगाने दिला हात
यवतमाळ जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र थोडे कमी करत पुसद तालुक्‍यातील वरवट, वेणी या दोन गावात ३५० एकरापर्यंत भुईमुगाची लागवड केली आहे. पूस प्रकल्पाचे पाणी मिळाल्यास लिंडी, पार्डी, काटखेडा, कासोळा या गावशिवारातही भुईमूग लागवड क्षेत्र ५५० एकरापर्यंत पोचते. महागाव तालुक्‍यात हळद १५०० एकर तर उमरखेड तालुक्‍यात सात हजार एकरपर्यंत ऊस होतो. भोजला, वालतूर या भागात एक हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर कलिंगडाची लागवड उन्हाळ्यात होते.
भात आणि कापूस पिकातील चंद्रपूर जिल्ह्यातील चोरगाव परिसरात विदेशी भाजीपाल्याचे क्‍लस्टर तयार झाले आहे.

गडचिरोलीत रब्बी मक्‍याची धूम
अहेरी, मुलचेरा, सिरोंचा चामोर्शी या तालुक्‍यांचा दक्षिणेकडील भाग तेलंगणा सीमेशी जुळलेला असून, २०१२ पर्यंत येथील शेतकरी भाजीपाला करत होते. तेलंगण राज्यात पोल्ट्रीसाठी मागणी
असल्याने आत्माअंतर्गंत येथील २० शेतकऱ्यांना प्रत्येकी एक एकर मका लागवड प्रात्यक्षिक देण्यात आले. आज ५५०० हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर मका होतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोल्ट्री उद्योगाची मागणी आणि वाहतुकीचा थेट पर्याय यामुळे १००० ते १२०० रुपयांवरून मका दर २२०० रुपये क्‍विंटलवर पोचले. हा मका कागजनगर, करीमनगर, हैदराबाद या भागाला पुरवला जातो. तेलंगणा राज्यातील काही शेतकऱ्यांनी गडचिरोलीत करारावर शेती घेत करीत कापूस लागवड केली. आता धानासाठी प्रसिद्ध भागातील कापूस लागवड १२ हजार हेक्‍टरवर पोचली आहे.

नागपूरातही पशुखाद्याकरिता मका
नगदी पीक म्हणून गडचिरोलीप्रमाणेच नागपूर जिल्ह्यातील सावेनर, कळमेश्‍वर, रामटेक, उमरेड भागातील शेतकऱ्यांकडून मक्‍याला पसंती दिली आहे. गेल्या हंगामात तीन एकरवर असलेली मका लागवड यावेळी पाच हजारापेक्षा अधिक एकर क्षेत्रापर्यंत वाढेल, अशी शक्यता आहे.

हळद पावडर आणि केळीचा अकोला पॅटर्न
पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्‍यातील माटोडा गावात ५०० एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर हळद लागवड होते. येथे प्रक्रिया
करून हळद पावडर तयार केली जाते. या पिकातून या शिवारातील अनेक गावांमध्ये संपन्नता आली आहे. त्यासोबतच अकोट, तेल्हारा या सिंचनाची सोय असलेल्या तालुक्‍यात केळी लागवड वाढती आहे. सहा हजार एकरपर्यंत ती असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रतिक्रिया...
पूर्वी अकोल्याप्रमाणेच कापूस लागवड असलेल्या वाशीम जिल्ह्यात सोयाबीन लागवड वाढली. काटा येथे १५०० एकर, तर शिरपूर (जैन) येथे २५०० एकरापर्यंत हळदीचे क्षेत्र वाढले आहे. वाशीम जिल्ह्यात बहुतांश गावात हळदीखालील क्षेत्र १०० ते १५० एकरापर्यंत झाले. वाशीम व रिसोड बाजार समिती एक दिवस खास हळद खरेदीकरिता राखून ठेवत आहे. हळद काढणी, शिजविणे, वाळविणे, पॉलिश करणे व पोते भरणे अशा कामातून महिनाभर मजुरी उपलब्ध होते.
- डॉ. गजानन ढवळे
हळदउत्पादक, शिरपूर, वाशीम.


इतर यशोगाथा
खरीप पिकांतील तण नियंत्रण व्यवस्थापनजगात सर्वांत जास्त वापर तणनाशकांचा (४३.६ टक्के)...
अतीव संघर्ष, धैर्यातून साधली उल्लेखनीय...उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली घुगे...
चिकाटी, आर्थिक नियोजनातून पोल्ट्री...वांजोळी (जि. नगर) येथील ३८ वर्षे वयाच्या अमोल...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...
दुग्धप्रक्रिया उद्योगातून कमावला...सांगली येथील माळी कुटुंबीय गेल्या काही...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार...अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि....
संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलतादाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम...
पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळाकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील...
फिरत्या प्रक्रिया उद्योगाची राबवली...लोकांसाठी उपयुक्तता, गरज यांचा विचार करून वर्धा...
पोल्ट्रीसह खाद्यनिर्मितीतून व्यवसायात...परभणी येथील प्रकाशराव देशमुख यांनी केवळ शेती...
पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले...अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या...
तांदूळ, भाजीपाला थेट विक्रीतून शाश्वत...खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी...
पांढऱ्या अंड्यांसह तपकिरी अंड्यांना...धोलवड ( जि. पुणे) येथील गीताराम नलावडे चार...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
बीबीएफ तंत्रासह प्रयोगशीलतेतून साधली...बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अति...