पशुखाद्य निर्मितीसाठी आधुनिक यंत्रणा

दळलेले आणि योग्य प्रकारे मिसळले पशुखाद्य पावडर स्वरूपात पॅकिंग करता येते. परंतु पशुखाद्य जर गोळी पेंड स्वरूपात बनवायचे असेल, तर पॅलेट मिलची गरज असते. पॅलेट मिलची क्षमता ही ग्राइंडरच्या क्षमतेनुसार असावी.
पशुखाद्य निर्मितीसाठी आधुनिक यंत्रणा
पशुखाद्य निर्मितीसाठी आधुनिक यंत्रणा

दळलेले आणि योग्य प्रकारे मिसळले पशुखाद्य पावडर स्वरूपात पॅकिंग करता येते. परंतु पशुखाद्य जर गोळी पेंड स्वरूपात बनवायचे असेल, तर पॅलेट मिलची गरज असते. पॅलेट मिलची क्षमता ही ग्राइंडरच्या क्षमतेनुसार असावी. पशुखाद्य बनविण्यासाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे यंत्रसामग्री. पशुखाद्यनिर्मितीमध्ये विविध प्रकारची यंत्रसामग्री वापरली जाते. ग्राइंडर ः १) पशुखाद्यात वापरला जाणारा कच्चा माल दळून किंवा भरडून घेणे महत्त्वाचे असते. त्यासाठी ग्राइंडर वापरतात. २)पशुखाद्य बनविण्याच्या क्षमतेनुसार चक्की निवडावी. उदा. ताशी १ टन, २ टन, ५ टन, १० टन क्षमता. एलेव्हेटर ः दळलेला कच्चा माल उचलण्यासाठी एलेव्हेटरचा वापर होतो. त्यामध्ये छोट्या छोट्या बकेट असतात. या बकेट दळलेले पदार्थ उचलण्यास व मिक्सरमध्ये टाकण्यास मदत करतात. मिक्सर : दळलेले पशुखाद्य योग्य प्रकारे मिसळले तर त्याची पचनीयता वाढते. त्यासाठी आडवे किंवा उभ्या प्रकारचे मिक्सर वापरावेत. बाजारात विविध प्रकारचे मिक्सर उपलब्ध आहेत. पशुखाद्य तयार करताना तांत्रिक व्यक्तीचा सल्ला घेऊनच योग्य मिक्सर निवडावा. १) पात्याचे मिक्सर: यामध्ये दळलेले घटक मिसळण्यासाठी पाते वापरले जातात. २) पॅडल मिक्सर: यामध्ये वेगवेगळ्या दिशेने पॅडल बसवलेले असतात आणि ते पॅडल सर्व दळलेले घटक मिसळते. ३) रिबन मिक्सर: यामध्ये नागमोडी रिबनच्या आकाराचे पाते सर्व दळलेले घटक मिसळते. गोळी पेंड बनविण्याचे यंत्र (पॅलेट मिल) ः १) दळलेले आणि योग्य प्रकारे मिसळले पशुखाद्य पावडर स्वरूपात पॅकिंग करता येते. परंतु पशुखाद्य जर गोळी पेंड स्वरूपात बनवायचे असेल, तर पॅलेट मिलची गरज असते. गोळी पेंड बनविण्यासाठी पेलेट मिलला आर्द्र वाफेची गरज असते. २) पॅलेट मिलची क्षमता ही ग्राइंडरच्या क्षमतेनुसार असावी. शक्यतो ग्राइंडरची क्षमता थोडीशी पेलेट मिलपेक्षा जास्त असावी, जेणे करून पेलेट मिलसाठी घटक कमी पडणार नाहीत. पॅलेट मिलमधून गोळी बनविण्यासाठी त्यामध्ये डाय असतो, त्याच्या आकारानुसार गोळी पेंडीचा आकार बनवता येतो. उदा. ः ३ मिमी डाय : ३ मिमी गोळी पेंड, ४ मिमी डाय : ४ मिमी गोळी पेंड, ८ मिमी डाय : ८ मिमी गोळी पेंड आणि १० मिमी डाय : १० मिमी गोळी पेंड बॉयलर : १) गोळी पेंड बनविण्यासाठी दळलेल्या आणि मिसळलेल्या पशुखाद्यातून वाफ जाणे गरजेचे असते. ही लागणारी वाफ बॉयलरमधून मिळवली जाते. त्या वाफेचे तापमान ८० ते ८५ अंश सेल्सिअस इतके असते. २) वाफ दळलेल्या पशुखाद्य मिश्रणात सोडली जाते. त्यापासून गोळी पेंड बनवली जाते. त्यामुळे अन्न घटकांचे निर्जंतुकीकरण होते आणि गोळी पेंड चांगली तयार होते. ३) बॉयलर हा डिझेल आणि एलडीओ प्रकारच्या इंधनावर चालतो. कुलर : १) गोळी पेंड हे ८० ते ८५ अंश सेल्सिअस तापमानामुळे अति गरम असते. ही थंड करणे गरजेचे असते. त्यामुळे कुलर हे खूप आवश्यक आहे. चाळणी: १) थंड झालेली गोळी पेंड नंतर चाळून त्यातील पावडर बाजूला केली जाते. त्यासाठी यांत्रिक चाळण्या मिळतात. पॅकिंग व शिलाई यंत्र ः १) थंड झालेली गोळी पेंड चाळल्यानंतर पोत्यामध्ये भरून शिलाई केली जाते. पशुखाद्य बनविण्याची पद्धत : फॉर्म्यूलेशन : १) पशुखाद्याचे फॉर्म्यूलेशन पशुआहार तज्ज्ञांकडून करून घ्यावे. त्यासाठी सर्व कच्च्या मालाची गुणवत्ता, उपयुक्तता, अपायकारकता, प्रमाण, जनावरांची गरज इत्यादी माहिती असावी. २) प्रत्येक जनावराची पशुखाद्याची गरज ही वेगवेगळी असते. शारीरिक प्रक्रियेसाठी, शरीर वाढीसाठी, दूधनिर्मिती, प्रजनन, गर्भात वाढणाऱ्या वासरासाठी वेगवेगळी गरज असते. ३) पशू आहारातल्या या सर्व बाबी लक्षात घेऊनच फॉर्म्यूलेशन करावे लागते. फॉर्म्यूलेशन करताना ः १) जनावरांची पशुखाद्याची गरज २) कच्च्या मालाची गुणवत्ता ३) कच्च्या मालातील हानिकारक तत्त्वे ४) कच्च्या मालाची उपलब्धता ५) कच्च्या मालातील पौष्टिक तत्त्वे उदाहरणार्थ ः नमुना १ : शेंगदाणा पेंड ः १५ किलो ज्वारी ः २० किलो मका ः २२ किलो गहू भुसा ः १४ किलो डी.ओ.आर.बी. ः २६ किलो खनिज मिश्रण ः २ किलो मीठ ः १ किलो नमुना २ : शेंगदाणा पेंड ः १२ किलो मका ः २० किलो गहू भुसा -२० किलो डी.ओ.आर.बी. ः ३५ किलो खनिज मिश्रण ः २ किलो मीठ ः १ किलो मळी ः १० किलो नमुना ३ : शेंगदाणा पेंड ः १५ किलो सूर्यफूल पेंड ः १० किलो मका ः १० किलो गहू भुसा ः २१ किलो डी.ओ.आर.बी. ः ४० किलो खनिज मिश्रण ः २ किलो मीठ ः १ किलो युरिया ः १ किलो पशुखाद्य बॅचनिर्मिती ः फॉर्म्यूल्याप्रमाणे आपण आपल्या यंत्रणेच्या क्षमतेनुसार पशुखाद्याची बॅच तयार करावी. त्यासाठी प्रत्येक कच्चा माल काट्यावर मोजून घ्यावा. १) तयार झालेली बॅच एकत्रितपणे ग्राइंडर चक्कीमध्ये दळून घ्यावी. २) दळलेली बॅच मिक्सरमध्ये ठरलेल्या वेळेत मिसळून घ्यावी. मिसळण्याची वेळ ही त्या मिक्सरच्या क्षमतेवर अवलंबून असते. ३) मिसळलेले पशुखाद्य पावडरच्या स्वरूपात पोत्यामध्ये भरू शकता किंवा गोळी पेंड बनवू शकता. गोळी पेंड बनविण्यासाठी वाफेचे तापमान, दाब तसेच पशुखाद्यातील सर्व घटकांचे प्रमाण महत्त्वाचे असते. ३ मिमी, ४ मिमी, ६ मिमी, ८ मिमी, १० मिमी अशा वेगवेगळ्या आकारांत गोळी पेंड बनवता येते. ४) गोळी पेंड बनविताना गरम वाफेचा उपयोग केल्यामुळे त्याचे तापमान थंड करणे गरजेचे असते, अन्यथा बुरशी लागण्याचा धोका असतो. त्यासाठी कुलर गरजेचा असतो. त्यामधील बसवलेल्या सेन्सरमुळे थंड झालेली गोळी पेंड आपोआप खाली येते. ५) थंड झालेली गोळी पेंड इलेक्ट्रॉनिक चाळणीमधून पाठवावी. जेणेकरून त्यातील पावडर कमी होऊन आपल्याला चांगल्या गुणवत्तेची गोळी पेंड मिळेल. ६) सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तयार झालेले गोळी पेंड स्वरूपातील पशुखाद्य पोत्यामध्ये किंवा प्लॅस्टिक बॅगमध्ये भरावे. पशुखाद्यातील तंत्रज्ञान : बायपास प्रथिने : १) उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून एका विशिष्ट पद्धतीने अन्न घटकांतील प्रथिनांवर प्रक्रिया करून बायपास केले जाते. २) यामुळे अन्न घटकातील प्रथिनांची उपलब्धता जवळपास पूर्णपणे होऊन दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. बायपास फॅट : १) बंदिस्त उच्च दाबयुक्त व्हेसल्स वापरून बायपास फॅट बनवले जाते. त्याचा फायदा दूध वाढीला होतो. २) यामुळे अन्न घटकातील स्निग्ध पदार्थांची उपलब्धता जवळपास पूर्णपणे होऊन दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. यामुळे जनावरांची तब्येत सुधारण्यास मदत होते. हायड्रोपोनिक्स ः १) साध्या ट्रेपासून ते प्लॅस्टिक पिशव्या, बांबू तसेच उच्च तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या युनिटचा वापर करून हायड्रोपोनिक्स म्हणजेच अंकुरत हिरवा चारा तयार केला जातो. २) हा चारा पौष्टिक असून नेहमीच्या चाऱ्याला एक उत्तम पर्याय म्हणून वापरला जातो. संपर्क ः डॉ. मनोजकुमार आवारे, ९४२१००७७८५ (डॉ. आवारे बाएफ संस्थेमध्ये येथे पशुआहार व पशुपोषण विभागाचे प्रमुख आहेत. डॉ. थोरात मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये पशू सूक्ष्म जिवाणू व विषाणू तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com