नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
ताज्या घडामोडी
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो फायदा
वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील बदलापासून सातत्याने उद्भवणारे रोगांचे उद्रेक अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीमध्ये वटवाघळांच्या अनेक प्रजाती धोक्यामध्ये येत असल्याचे विविध संशोधनांतून पुढे येत आहे. अशावेळी त्यातल्या त्यात एक चांगली बाब कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील संशोधकांच्या लक्षात आली आहे, ती म्हणजे सातत्याने जंगलांमध्ये लागणाऱ्या वणव्यांचा वटवाघळांवर फारसा परिणाम होत नाही. उलट सिएरा नेवाडा येथील काही प्रजातीच्या वटवाघळांसाठी वणवे काही प्रमाणात फायदेशीर होतात. हे संशोधन ‘जर्नल सायंटिफिक रिपोर्टस्’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

वटवाघळांवर वणव्यांचे होणारे परिणाम व हानी तपासण्यासाठी संशोधकांनी ध्वनीवर आधारित सर्वेक्षण केले. त्यामध्ये कॅलिफोर्निया येथे आढळणाऱ्या प्रमुख १७ प्रजातींच्या वटवाघळांवर वणव्यांच्या आगीमुळे होणारी इजा व अन्य परिणामांचा अभ्यास करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रत्येक वणव्याच्या स्थितीला वटवाघळे कसे सामोरे जातात, हेही पाहण्यात आले. ज्या जंगलामध्ये वणवे कमी लागले किंवा लागले नाहीत, अशा ठिकाणी एकूण प्रजातींची संख्या आठपासून वाढून ११ झाल्याचे आढळले. संशोधनाविषयी माहिती देताना संशोधक झॅक स्टिल यांनी सांगितले, की वटवाघळे ही विविध घटकांसाठी प्रामुख्याने जंगलावर अवलंबून असतात. जंगलामध्ये नैसर्गिकरीत्या लागणाऱ्या आगींमुळे त्यांच्या रहिवासाच्या स्थितीमध्ये अनेक बदल होतात. अशा बदलांसाठी अनेक प्रजातींनी स्वतःमध्ये बदल करून घेतले आहेत. काही प्रजातींसाठी अशा आगी प्रत्यक्षामध्ये फायद्याच्या ठरत असल्याचेही अभ्यासातून पुढे आले आहे.
अतिदाट जंगलामध्ये वाढीवर मर्यादा ः
अनेक जंगली वटवाघळे ही घनदाट जंगलामध्ये राहण्यास सरावलेली असतात, तर काही मोकळ्या वातावरणाला सरावलेली असतात. संशोधकांना अशा दोन्ही गटांतील प्रजातींनी जळलेल्या, अर्धवट किंवा कमी जळलेल्या जंगलांना प्राधान्य दिल्याचे आढळल्यानंतर खरेतर आश्चर्य वाटले होते.
स्टिल म्हणाले, की आपली काही जंगले इतकी घनदाट झाली आहेत, की त्याला सहनशील असलेल्या वटवाघळांनीही जळलेल्या जंगलांची निवड केल्याचे आढळले. जंगलाच्या अनेक मोठ्या क्षेत्रांना या शतकामध्ये आग लागलेली नाही. आगीमध्ये झाडे व रहिवास काही प्रमाणात नष्ट झाल्याने अन्य प्रजातींच्या वाढीसाठी संधी निर्माण होतात. मोकळ्या जागेमध्ये कीटकांचा शोध घेणे वटवाघळांना सोपे जाते. तसेच, जळलेली झाडे आणि मोठी खोडे ही काही वटवाघळांसाठी रहिवासाची ठिकाणे बनतात.
सिएरा नेवाडा येथील घनदाट जंगलातील दुर्गम ठिकाणी विजांमुळे लागलेल्या आगीप्रमाणे मर्यादित प्रमाणात लावण्यात आलेल्या आगींमध्ये संशोधकांनी अभ्यास केला. या अभ्यासासाठी कॅलिफोर्निया येथील सिएरा नेवाडा पर्वतांवरील जंगलांमध्ये २००४ मधील पॉवर फायर, २०१२ मधील चिप्स फायर, २०१३ मधील रीम फायर अशा आगीच्या घटना झालेल्या ठिकाणांची निवड करण्यात आली.
ध्वनींच्या पॅटर्नवरून अभ्यास ः
वटवाघळे आपल्या प्रवास आणि खाद्याच्या शोधार्थ ज्या आवाजांचा आधार घेतात, तो माणसांना ऐकू येत नाही. प्रत्येक प्रजातीचे ध्वनी पॅटर्न वेगवेगळे असतात. या आवाजाच्या नोंदी घेण्यासाठी संशोधकांनी अल्ट्रासॉनिक मायक्रोफोनच्या सहकार्याने ‘ॲकॉस्टिक सर्व्हेयिंग’ तंत्रज्ञानाचा वापर केला. वरून प्रत्येक वटवाघळाचे स्पेक्ट्रोग्राम किंवा आलेख बनवण्यात आले. त्यावरून त्यांची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर त्यांचा आढळण्याचा दर आणि रहिवास यांची तुलना करतानाच वणव्यांचा वटवाघळांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला.
- 1 of 1024
- ››