अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव

अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव

अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू डिसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या पूर्वी २०१७ मध्ये अलाबामाच्या किनाऱ्यावरील सहा देशांमध्ये कपाशीवरील ब्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव नोंद झाला होता. त्यामध्ये राज्यातील कपाशीचे अंदाजे २५ टक्के नुकसान झाले होते. तर उत्पादनामध्ये ४ टक्के नुकसान नोंदवले होते. हा रोग २०१८ मध्ये पुन्हा नोंदवला गेला. २०१८ मध्ये अलाबामामध्ये कपाशी पिकांमध्ये ३ ते १०० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव दिसून आला असला तरी, उत्पादनामध्ये एक टक्के नुकसान झाले. लक्षणे ः

  • वनस्पतींची वाढ खुंटणे
  • हरितद्रव्याचे प्रमाण कमी होणे,
  • प्रादुर्भाव झालेली पाने आखूड राहणे.
  • सामान्यतः हा रोग पूर्ण फुलोऱ्यापर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत दिसून येत नाही.
  • अशी झाली नोंद ऑगस्ट २०१७ मध्ये ऑबर्न विद्यापीठातील वनस्पती विकृती तज्ज्ञ कॅथी एस. लॉरेन्स यांना कृषी एएफसीच्या ड्र्यू श्रीमश्चर यांचा फोन आला. आग्नेय अलाबामा येथील सुमारे ५० हजार एकर कपाशी पिकांमध्ये पानांतील विकृती आणि पाने वेडीवाकडी होऊन गुंडाळली गेल्याची समस्या दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रथम तणनाशकांचा परिणाम असल्याचा संशय दूर झाल्यानंतर त्यांनी लॉरेन्स यांना भेट देण्यासाठी गळ घातली. लॉरेन्स यांनी भेट देऊन नमुने घेतले. या नमुन्यांचे अॅरिझोना विद्यापीठातील ज्युडीथ के. ब्राऊन यांच्याकडून विश्लेषण करून घेतले. त्यांनी या लक्षणानुसार कॉटन ब्ल्यू डिसीस या कपाशीतील लिफरोल डॉर्फ व्हायरस (CLRDV) या रोगाचा अंदाज व्यक्त केला. हा रोग अमेरिकेमध्ये पूर्वी कधीही दिसला नव्हता. या रोगाची पहिली नोंद आफ्रिकेमध्ये १९४९ मध्ये झाली होती. त्यानंतर पुढे ब्राझीलमध्ये २००५ साली या रोगाची नोंद झाली होती. पुढे २०१७ मध्ये अलाबामा येथील किनाऱ्यावरील सहा देशांमध्ये सुमारे २५ टक्के कपाशी पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यामुळे उत्पादनामध्ये ४ टक्के नुकसान झाले. त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा रोगाचा प्रादुर्भाव होऊन ३ ते १०० टक्के कपाशी पिकामध्ये दिसला. त्यामुळे उत्पादनामध्ये १ टक्के घट झाली. या रोगासाठी अमेरिकेमध्ये अद्याप फारसा अभ्यास झालेला नाही. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी कोणत्याही शिफारशी नाहीत.

    भारतामधील पहिली नोंद २०१२ मधील... महाराष्ट्रातील नागपूर परिसरामध्ये या विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव २०१२ मध्ये नोंदवण्यात आला होता. नागपूर येथील कपाशी संशोधन संस्थेतील ए. के. मुखर्जी, पी. आर. चंदेले. एम. के. मेश्राप आणि के. आर. क्रांती यांनी कॉटन ब्ल्यू रोगाची भारतामध्ये प्रथमच २०१२ मध्ये नोंदवल्याची माहिती संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. शैलेश गावंडे यांनी दिली.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com