agriculture stories in marathi Five new fish species discovered in Arunachal | Agrowon

माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध 
वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी विद्यापीठातील संशोधकांनी अरुणाचल प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये माशांच्या पाच नव्या जाती शोधल्या आहेत. 

अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी विद्यापीठातील संशोधकांनी अरुणाचल प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये माशांच्या पाच नव्या जाती शोधल्या आहेत. 

अशा आहेत जाती ः 
लोअर दिबांग खोरे जिल्ह्यातील सिनकिन आणि डिबांग नदीमध्ये आढळणाऱ्या मत्स्य जातीला मायस्टर प्रबिनी (Mystus prabini,), तर लोअर सुबान्सिरी जिल्ह्यातील रंगा नदीमध्ये आढळणाऱ्या मत्स्यजातीला एक्सोस्टोमा कोट्टेलाटी (Exostoma kottelati) व गॅरा रॅंगानेन्सिस (Garra ranganensis) असे नाव दिले आहे. 
तवांग जिल्ह्यातील तावांगचू नदीमध्ये सापडलेल्या प्रजातीला क्रेटेचिलोगलॅन्सि तावागेनेसिस (Creteuchiloglanis tawangensis) असे नाव दिले आहे. तर दिबांग आणि लोहित नदीमध्ये सापडलेल्या मत्स्यजातीला फायसोस्किस्टूरा हार्किशोरेई (Physoschistura harkishorei) असे नाव दिले असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे. 

विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाच्या मत्स्य आणि जलचर पर्यावरणशास्त्र संशोधन विषयाचे प्रो. डी. एन. दास यांच्या नेतृत्त्वाखाली केलेल्या संशोधनामध्ये या नव्या पाच जाती सापडल्या आहेत. त्या विषयी माहिती देताना प्रो. दास म्हणाले, की राज्यातील दुर्गम भागातील जल अधिवासातील या जाती आहे. दुर्गम प्रदेश, वर्षावने, टोकदार कड अशा स्थितीमध्ये जल अधिवासापर्यंत पोचणे हे संशोधकांसाठीही आव्हानात्मक होते. मात्र, या प्रदेशामध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता असून, आणखी नव्या जाती आढळण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...