द्राक्षावरील स्पोडोप्टेरा, उडद्याचे असे करा नियंत्रण

द्राक्षावर स्पोडोप्टेरा अळी, उडद्याचा प्रादुर्भाव
द्राक्षावर स्पोडोप्टेरा अळी, उडद्याचा प्रादुर्भाव

नाशिक आणि पुणे विभागांतील काही द्राक्ष बागांमध्ये पाने खाणारी अळी आणि उडद्या भुंगेरे (फ्लिया बीटल) यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गेल्या काही आठवड्यांतील अधिक आर्द्रता आणि तापमान या दोन्ही किडींसाठी अनुकूल ठरत आहे. द्राक्ष घडांवर हल्ला करणाऱ्या अळींची प्रजाती ही स्पोडोप्टेरा लिट्यूरा ही आहे. काही ठिकाणी बंच वेबर आणि केसाळ अळी (हेअरी कॅटरपीलर या किडीही आढळत आहेत.  पाने जुनी होत असल्यामुळे खाणे आणि लपणे या दोन्हीसाठी उडद्या आणि पाने खाणारी अळी या किडींनी घडांकडे आपला मोर्चा वळवला आहे.  द्राक्ष विषयक अधिक माहितीसाठी अॅग्रोवन अॅप डाऊनलोड करा.. स्पोडोप्टेरा लिट्यूरा या अळ्यांनी मणी आणि घडांवर छिद्रे पाडल्याने नुकसान होत आहे. जर द्राक्ष बाग ही मण्यामध्ये पाणी उतरण्याच्या अवस्थेमध्ये असेल, तर द्राक्षमणी कुजण्याची शक्यता आहे. या कुजणाऱ्या द्राक्षांवर स्कॅव्हॅंजर फळमाश्यांचा (स्कॅव्हॅंजर फ्रुट फ्लाईज) दुय्यम प्रादुर्भाव वाढू शकतो. जेव्हा अळी घडामध्ये असते, त्या वेळी तिच्यापर्यंत कीडनाशकांची फवारणी पोचण्यामध्ये अडचणी येतात. परिणामी, व्यवस्थापन करणेही अवघड होते. अशा वेळी अळ्यांच्या उत्तम व्यवस्थापनासाठी माणसांच्या साह्याने अळ्या गोळ्या करून नष्ट करणे हाच उपाय योग्य ठरतो. 

  • रासायनिक नियंत्रणासाठी, 
  • फवारणी प्रतिलिटर पाणी इमामेक्टिन बेंझोएट (५ एसजी) ०.२२ ग्रॅम (पीएचआय २५ दिवस) 
  • उत्तम नियंत्रणासाठी रात्रीच्या वेळी फवारणी करावी. 
  • प्रौढ उडद्या भुंगेऱ्यांमुळे मणी, देठ यावर सरळ रेषेमध्ये खाल्ल्याच्या खुणा दिसतात. पुढे या खुणा तपकिरी होऊन द्राक्षाच्या दर्जावर विपरीत परिणाम होतो. जर उडद्या किडींचे वेळीच नियंत्रण झाले नाही आणि अधिक प्रादुर्भाव झाल्यास मातीमध्ये असणाऱ्या या किडीच्या अळी अवस्थेमध्ये नियंत्रणाचे उपाय करावेत. त्यासाठी मातीमध्ये मेटारायझीम अॅनिसोप्ली १ लीटर अधिक बिव्हेरिया बॅसियाना १ लीटर प्रति एकर (२ गुणिले १०८ बिजाणू प्रति मिली.) आळवणी करावी.

  • फवारणी प्रतिलिटर पाणी  लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ सीएस) ०.५ मि.लि. (पीएचआय ४५ दिवस) 
  • चांगल्या नियंत्रणासाठी फवारणी सकाळी लवकर करावी. 
  • या किडीच्या नियंत्रणासाठी बागेतील व बांधावरील तणांचे नियंत्रण आवश्यक आहे.  
  • द्राक्ष बागेमध्ये ओळीत हलकी मशागत केल्यास उडद्याची अळी अवस्था नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरते. 
  • जर उडद्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल आणि कीडनाशकांच्या फवारणीनंतरही नियंत्रण होत नसल्यास पीक वाचवण्यासाठी इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) १.५ मि.लि. प्रति लीटर पाणी या प्रमाणे मातीमध्ये आळवणी करावी.  द्राक्ष विषयक अधिक माहितीसाठी अॅग्रोवन अॅप डाऊनलोड करा..
  •  ः डॉ. दीपेंद्र यादव, ०२०-२६९५-६०३५ (वरीष्ठ शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com