नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
अॅग्रो विशेष
भविष्यातील आहारामध्ये असतील फुलेही
सामान्यपणे फुलांचे उत्पादन हे व्यावसायिकरीत्या सुगंध आणि सुशोभीकरण या उद्देशानेच केले जाते. मात्र, स्पेन येथील एका कंपनीने आहारासाठी खास काही फुलांचे उत्पादन सुरू केले आहे. अशी काही फुलांची उत्पादने बाजारामध्ये आणली आहेत.
सामान्यपणे फुलांचे उत्पादन हे व्यावसायिकरीत्या सुगंध आणि सुशोभीकरण या उद्देशानेच केले जाते. मात्र, स्पेन येथील एका कंपनीने आहारासाठी खास काही फुलांचे उत्पादन सुरू केले आहे. अशी काही फुलांची उत्पादने बाजारामध्ये आणली आहेत.
सध्या फुलांचा आहारामध्ये फारसा वापर होत नसला, तरी प्राचीन रोमन काळामध्ये लॅव्हेंडर फुलांच्या खाण्यामध्ये वापर केला जात होता. तर गुलाबाचा वापर ऑम्लेटमध्ये केला जात असे. इंग्लंडमध्ये अगदी व्हिक्टोरियन काळापर्यंत आहारामध्ये फुलांचा वापर हा मुख्यतः सॉसेसमध्ये केला जाई. खाण्याच्या उद्देशाने फुलांचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न स्पेन येथील इन्नोफ्लॉवर ही कंपनी करत आहे. या कंपनीच्या कार्यकारी अधिकारी लॉरा कॅर्रेरा गेल्या सहा वर्षांपासून स्पेन येथील बाजारपेठेमध्ये फुलांची विक्री करत आहेत. ताज्या फुलांपेक्षाही त्यांनी अधिक साठवण कालावधी असलेल्या निर्जलीकरण, स्फटीकरण, भुकटी अशा स्वरूपामध्ये विक्री केली जाते. मार्सेडोना यासारख्या सुपर मार्केटमध्ये व रेस्टॉरंटमध्ये फुलांच्या सॅलडसह अनेक उत्पादने विक्रीसाठी ठेवली जात आहेत.
औषधी गुणधर्म ः
सॅन जॉर्ज विद्यापीठातील औषधशास्त्र तज्ज्ञ क्रिस्टिना मोलिनार यांनी औषधांमध्ये पूर्वापार फुलांचा वापर होत असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, अनेक फुलांमध्ये अॅंटिऑक्सिडेंड, मेंदू संरक्षक आणि सूक्ष्मजीवरोधक गुणधर्म असतात. पॅन्से अर्काचा उपयोग वार्धक्य रोखण्यासाठी होऊ शकत असल्याचे सूत्रकृमींवर झालेल्या प्रयोगात आढळले आहे