agriculture stories in marathi food processing business have opportunities | Agrowon

अन्नप्रक्रिया उद्योगात आहेत मुबलक संधी

राजन वारे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

शेती व्यवसाय हा केवळ शेतमालाची उत्पादकता वाढवणे एवढ्यावर अवलंबून नाही. तर त्यापुढे जाऊन
प्रक्रिया करणे, त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मागणीनुसार गुणवत्ता वाढवणे गरजेचे झाले आहे.
अन्नप्रक्रिया उद्योगाविषयीची ही मालिका आजपासून दर शनिवारी प्रसिद्ध करीत आहोत.

शेती व्यवसाय हा केवळ शेतमालाची उत्पादकता वाढवणे एवढ्यावर अवलंबून नाही. तर त्यापुढे जाऊन
प्रक्रिया करणे, त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मागणीनुसार गुणवत्ता वाढवणे गरजेचे झाले आहे.
अन्नप्रक्रिया उद्योगाविषयीची ही मालिका आजपासून दर शनिवारी प्रसिद्ध करीत आहोत.

जगात बदल हीच कायम टिकणारी गोष्ट आहे. याला कोणती व्यक्ती किंवा क्षेत्र अपवाद नाही.
सध्या शेतीसमोर निर्माण झालेल्या अडचणी या बदलातूनच कमी करणे शक्य होईल.
देशातील रिटेल क्षेत्रात होऊ घातलेल्या बदलाचा अन्नप्रक्रिया क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल असे
वाटते. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांनी तसेच अन्नप्रक्रिया उद्योजकांनी आपला दृष्टिकोन सकारात्मक व
व्यापक करणे क्रमप्राप्त आहे. या होऊ घातलेल्या प्रक्रियेत त्यांनी सहभागी व्हायला हवे.
कृषिमाल प्रक्रिया व्यवयासायाच्या संधींबाबत आपण मालिकेच्या पुढील भागापासून विस्तृतपणे
चर्चा करणार आहोत. या भागात आपण व्यवसायाचे संक्षिप्त स्वरूप समजावून घेऊया.

काढणीनंतर अत्याधुनिक शीतगृह तसेच पॅक हाउसमध्ये माल आणून त्याचे वर्गीकरण (सॉर्टिंग), प्रतवारी (ग्रेडिंग) आणि पॅकिंग केले जाते. बाजारपेठेतील मागणीनुसार कोल्डचेनद्वारे ग्राहकांपर्यंत मालाचे वितरण केले जाते. याद्वारे शेतकऱ्यांना तसेच लघू अन्नप्रक्रिया उद्योजकांना चांगल्या पद्धतीने रिटेल बाजारपेठेत संधी उपलब्ध होते.

काढणी पश्‍चात तंत्राचा वापर

काढणीपश्चात व्यवस्थापन तंत्र वापरून प्रक्रिया केंद्रापर्यंत नियंत्रित तापमानात रेफर
व्हॅनमध्ये आणले जाते. याठिकाणी खालील प्रक्रिया केल्या जातात.

पूर्वशितीकरण (प्री- कुलिंग) -
यामध्ये शीतगृहात तात्पुरत्या स्वरूपात मालाची साठवणूक करण्यात येते. फळे व पालेभाज्या यांच्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया होते. यात स्वच्छ धुणे (वॉशिंग), निर्जंतुकीकरण, वेगवेगळ्या भागात वर्गीकरण करून बाजारपेठांच्या गुणवत्ता मागणीनुसार अर्धवट शिजवणे (ब्लांचिंग), पुढे त्यास उणे १८ अंश सेल्सिअस तापमानाला थंड करणे, वेष्टनाद्वारे बाजारपेठेच्या मागणीनुसार पाठवणे आदींचा समावेश होतो.

हवाबंद डब्यामध्ये पॅकिंग (कॅनिंग)
या प्रकारात फळे व निवडक पालेभाज्या प्रक्रिया केंद्रापर्यंत आणल्या जातात. त्यानंतर त्या स्वच्छ धुण्यात येतात. निर्जंतुकीकरण प्रक्रिया केली जाते. त्यास उच्च तापमानात नेऊन त्यास नियंत्रित वातावरणात डब्यामध्ये पॅक करण्यात येते.

फळे व पालेभाज्या निर्जलीकरण (डिहायड्रेशन)
या प्रकारात फळे व पालेभाज्या प्रक्रिया केंद्रापर्यंत आणून स्वच्छ धुणे, निर्जंतुकीकरण या प्रक्रिया केल्या जातातच. त्यानंतर त्यास उच्च तापमानात नेऊन निर्जलीकरण करणाऱ्या उपकरणात (ड्रायर)
संथगतीने वेगवेगळ्या तापमानाच्या कक्षेत (टेम्परेचर झोन) ठेवण्यात येते. त्यातून शास्त्रीय
पद्धतीने अंतर्गत आर्द्रता (इंटर्नल मॉइश्चर) बाहेर काढले जाते. डाळ वा तत्सम कडधान्यांमध्येही क्लिनिंग, सॉर्टिंग, ग्रेडिंग या प्रक्रिया करण्यात येतात.

इन्स्टंट मिक्सेस -
या प्रक्रियेत विविध प्रकारच्या डाळी, तांदूळ, मैदा, रवा, मसाले आदी पदार्थांचे निर्जलीकरण
करण्यात येते. त्यांचे शास्त्रीय पद्धतीने मिश्रण करून हवाबंद पॅकिंग करता येते. याप्रमाणे खालील प्रक्रिया करता येतात.
१. सॉस , केचअप, जॅम, जेली, विविध प्रकारच्या फळांची उत्पादने
२. लोणचे , पापड, चटण्या , मसाले
३. टोमॅटो प्युरी, पेस्ट, कॉन्सन्ट्रेट
४. फ्रूट पल्प, फ्रूट जूस, बेव्हरेजीस
वरील सर्व व्यवसायासाठी आवश्यक असणारी कच्च्या मालाची गुणवत्ता, यंत्रसामुग्री, प्रक्रिया
तंत्रज्ञान, व्यावसायिकीकरण व व्यवस्थापन याबद्दल आपण पुढील भागापासून चर्चा करणारच आहोत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार मालाची गुणवत्ता व मानांकन म्हणजे आयएस ओ ९००१:२०१८,
हॅसेप प्रणाली, अन्न सुरक्षितता व्यवस्थापन पद्धती (फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम) या बाबी देखील प्रक्रिया उद्योजकांना माहीत असणे गरजेचे असते. या व्यवसायासाठी शासन व केंद्र शासनामार्फत
विविध योजना, अनुदानदेखील उपलब्ध आहे. या सर्व बाबींची माहिती टप्प्याटप्प्याने आपण घेत राहणार आहोत.

संपर्क- राजेंद्र वारे- ९८८१४९५१४७

----------

लेखक परिचय
राजेंद्र वारे यांनी ‘फूड बायोकेम’ या विषयात एमएस्सीची पदवी घेतली आहे. ते एलएलबीदेखील आहेत. आयएसओ फूड सेफ्टी ऑडिटर म्हणूनही त्यांची ओळख आहे. सुमारे २० वर्षांपासून विविध कंपन्यांसाठी अन्नप्रक्रिया उद्योगातील सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन व कायदेशीर बाबी आदी विषयांत ते तज्ज्ञ आहेत.

----------------

 


इतर कृषी प्रक्रिया
भाजीपाला साठवणीसाठी ‘शून्य ऊर्जा शीत-...काढणी, साठवणूक आणि प्रक्रिया यातील अयोग्य हाताळणी...
बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...
आरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...
शेळीपालन : परतफेड हप्ते ठरवण्यासाठी ...शेळीपालनामुळे शेतमजूर स्त्रियांच्या उत्पन्नामध्ये...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
आवळ्याचे गुणकारी पदार्थआवळा हे फळ इतर फळांसारखे वर्षभर टिकत नाही,...
डाळनिर्मितीला भारतात मोठी संधीभारतातील एकूण गरजेपैकी ६० टक्के डाळ देशांतर्गत...
काथ्या उद्योगासाठी अनुदान आणि वितरणकाथ्या उद्योगात रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत....
अन्नप्रक्रिया उद्योगात आहेत मुबलक संधीशेती व्यवसाय हा केवळ शेतमालाची उत्पादकता वाढवणे...
किवी फळापासून प्रक्रिया पदार्थकिवी फळ हे चॉकलेटी व हिरवे रंगाचे केसाळ, आंबट व...
दुग्ध व्यवसायाच्या प्रकल्प अहवालात काय...खरेतर राहुलला आता दूध व्यवसायाने झपाटले होते. दूध...
फळे, भाजीपाल्याचे निर्जलीकरण, साठवणूकशून्य ऊर्जा शीतकक्ष हा फळे व भाज्या जास्त काळ...
विड्याच्या पानापासून पावडर, पापड, खाकरापानवेलीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पानापासून...
आरोग्यदायी पेरूपासून प्रक्रियायुक्त...पेरू हे फळ फक्त चविष्टच नाही तर त्याचे...
अन्न शिजविण्याच्या विविध पद्धतीप्राचीन काळी माणूस शिकार करून कच्चे मांस किंवा...
ज्वारी पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण...भारत हा जगातील ज्वारी उत्पादनात चौथ्या क्रमांकाचा...
मागणी नसलेल्या माशांपासून मूल्यवर्धित...माशांच्या अनेक जाती अशा आहेत, की त्यांना मासळी...
रेनबो ट्राउट माशापासून मूल्यवर्धित...रेनबो ट्राउट हा थंड पाण्यात सापडणारा मासा मुळात...
सुधारित पद्धतीने टिकवा मासेमासे खारवून टिकविणे ही पद्धत तुलनात्‍मक स्‍वरूपात...
मैद्याच्या प्रतीवर ठरतो बेकरी...बेकरी उद्योगातील प्रमुख उत्पादनांमध्ये बिस्किटे,...