अन्न सुरक्षेेचा प्रश्न ऐरणीवर...

अंतर्गत संघर्ष, हिंसा या मानवी कारणांसोबतच विविध आपत्ती, कीड रोगांचा प्रादुर्भाव, आर्थिक अवनती या कारणांमुळे अन्न सुरक्षा धोक्यात येत आहे. या कारणांमध्ये २०२० या वर्षी कोविड महामारीची भर पडली आहे.
अन्न सुरक्षेेचा प्रश्न ऐरणीवर...
अन्न सुरक्षेेचा प्रश्न ऐरणीवर...

अंतर्गत संघर्ष, हिंसा या मानवी कारणांसोबतच विविध आपत्ती, कीड रोगांचा प्रादुर्भाव, आर्थिक अवनती या कारणांमुळे अन्न सुरक्षा धोक्यात येत आहे. या कारणांमध्ये २०२० या वर्षी कोविड महामारीची भर पडली आहे. आधीच ५५ पेक्षा अधिक देशांची अन्न सुरक्षितता धोक्यात असून, या वर्षी अन्न सुरक्षेचा प्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता ‘ग्लोबल नेटवर्क अगेन्स्ट फूड क्रायसिस’ या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 

अन्न असुरक्षा म्हणजे काय?   सामान्य माणसाच्या वाढ, विकास आणि आरोग्यदायी कार्यक्षमतेसाठी आवश्यक सुरक्षित आणि पोषक अन्नाची पुरेशा प्रमाणात उपलब्धता न होणे याला अन्न असुरक्षा म्हणतात.   अन्न सुरक्षेमध्ये पुरेशा प्रमाणात आणि विविधतेचे अन्न सातत्यपूर्ण उपलब्ध असणे किंवा उपलब्ध होऊ शकण्याच्या अवस्थेत असणे अपेक्षित असते. ते कुटुंब अन्नाची साठवण, शिजवणे, तयार करणे आणि कुटुंबातील सर्व व्यक्तींना मिळणे यामध्ये कार्यक्षम असले पाहिजे.    तीव्र अन्न असुरक्षा (Acute food insecurity) म्हणजे अन्न असुरक्षेमुळे माणसाचे जीवन, जीवनशैली किंवा दोन्हीही धोक्यात येण्याच्या प्रकटीकरणाला सुरुवात होण्याचा विशिष्ट बिंदू होय. हे प्रकटीकरण कारणे, संदर्भ किंवा कालावधी यांच्या निरपेक्ष असते.     जुनाट अन्न असुरक्षा (Chronic food insecurity) म्हणजे वर्षातील लक्षणीय कालावधीसाठी आहारातून  आवश्यक ऊर्जा उपलब्ध करण्यातील दीर्घकालीन किंवा सातत्यपूर्ण अक्षमता होय.   यासाठी जागतिक अन्न आणि कृषी संघटनेद्वारे कुपोषण या शब्दाचा वापर केला जातो. याची नेमकी व्याख्या करताना  २.१.१ शाश्वत विकास ध्येय निर्देशांकांचा (Sustainable Development Goal Indicator) आधार घेतला जातो.  त्यानुसार २०१८ मध्ये जागतिक पातळीवरील ८२० दशलक्ष पेक्षा अधिक लोक कुपोषित, ७०० दशलक्ष पेक्षा अधिक लोक तीव्र अन्न असुरक्षिततेच्या पातळीवर असून, १.३ अब्ज लोकांना मध्यम अन्न असुरक्षा भेडसावत आहे. 

( स्रोत ः The State of Food Security and Nutrition in the World 2019).

☛ २०१९ मध्ये जगभरातील सुमारे १३५ दशलक्ष लोक हे अन्न असुरक्षेच्या कक्षेत ((IPC/CH Phase 3 किंवा त्यापेक्षा अधिक) होते. गेल्या चार वर्षामध्ये हे प्रमाण सर्वोच्च होते. ☛ २०१९ आणि २०२० या दोन वर्षाच्या अन्न असुरक्षा असलेल्या ५० देशांची तुलना केली असता अडचणीमध्ये असलेल्या लोकांचे प्रमाण ११२ दशलक्ष वरून १२३ दशलक्ष पर्यंत वाढलेले दिसते. 

तीव्र अन्न असुरक्षाबाधित लोकसंख्या, देश व त्याची कारणे

१) संघर्ष स्थिती - ७७ दशलक्ष - २२ देश. प्रामुख्याने मध्यपूर्व आणि आशियातील देश, आफ्रिकेतील देशांमध्ये लष्करी संघर्ष, आंतर समुदाय हिंसा व ताण. उदा. दक्षिण सुदान. येथून स्थलांतर होऊन युगांडासारख्या शेजारी देशांवर ताण आला आहे. २) टोकाचे हवामान - ३४ दशलक्ष - २५ देश. उदा. सुदान, सोमालिया या सोबत दक्षिण आफ्रिकेतील काही देश. त्यानंतर मध्य अमेरिका आणि पाकिस्तान. ३) आर्थिक धक्के - २४ दशलक्ष - ८ देश. उदा. बोलेव्हेरियन व्हेनेझुला प्रजासत्ताक, झिंबाब्वे, हैती, सुदान. २०१९ च्या मध्यापर्यंत जागतिक पातळीवर ७० दशलक्ष लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. त्यातून ४४ दशलक्ष देशांतर्गत स्थलांतरित असून, २० दशलक्ष स्थलांतरित लोक हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यक्रमांतर्गत नोंदलेले आहेत.

कोविड १९ चा अन्न सुरक्षेवरील परीणाम

कोरोना विषाणू (कोविड १९) च्या प्रादुर्भावामुळे जागतिक पातळीवर मोठी उलथापालथ झाली आहे. एकूण २१३ देशांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून, त्यातील सुमारे ५५ देश, प्रदेशातील लोकांचे आरोग्य, सामाजिक व आर्थिक पातळीवर विपरीत परिणाम दिसून येत आहेत. २१ ऑगस्टपर्यंत च्या माहितीनुसार, जागतिक पातळीवर २२.८९ दशलक्ष लोकांना कोरोना प्रादुर्भाव झाला. त्यातील ६.५६ दशलक्ष लोक अॅक्टिव्ह असून, त्यापैकी ६१,७६१ लोक (एक टक्के) अत्यवस्थ आहेत. आजवर कोविडमुळे सुमारे ७९७,६९५ लोकांचा मृत्यू झाला आहे.   आरोग्य आणि पोषकतेवरील परीणाम 

  • या अहवालामध्ये समाविष्ट देशातील गरीब किंवा विकसनशील देशांच्या आरोग्य व्यवस्था आधीच ताण स्थितीमध्ये आहेत. 
  •   अशा ठिकाणी कोविड प्रादुर्भावामुळे आवश्यक उपकरणे, औषधे आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी यांचा तुटवडा जाणवत आहे. 
  •   मुळातच आर्थिक दृष्टीने संकटात असलेल्या स्थलांतरितांसह गरीब लोक आरोग्याच्या सुविधांपासून वंचित राहत आहेत. 
  •   संसर्गजन्य रोग असल्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये या लोकांना कितपत सामावून घेतले जाईल, याबाबत शंका आहेत. 
  • प्राधान्यक्रम असे हवेत कोविड १९ च्या संभाव्य परिणामांचा अंदाज घेताना अन्न सुरक्षिततेसाठी सामुदायिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.  सर्वांत संवेदनशील समाजांचा, लोकांचा शोध घेऊन मानवतेच्या दृष्टीने शासकीय, सामाजिक आणि विकासाच्या वेगवेगळ्या योजनांची निर्मिती करणे, अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी

  •   प्रत्यक्ष वेळेनुसार दुर्गम भागापर्यंत अन्न सुरक्षिततेविषयीची माहिती जमा करणे.
  •   संवेदनशील गटांसाठी अन्न, जीवनावश्यक घटक आणि पोषकता साह्य पुरवणे.
  •   अन्नांची असुरक्षितता असलेल्या देशांमध्ये सामाजिक सुरक्षिततेचाही विचार करणे.
  •   अन्नांचा पुरवठा, साठवण, वहन, स्थानिक अन्न बाजारपेठ आणि विक्रीसाठी सदा खुले असतील असे योग्य ते पद्धती, मार्ग तयार करणे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com