agriculture stories in Marathi food wastage prevention | Page 2 ||| Agrowon

छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न नासाडी

वाणी एन.
रविवार, 27 सप्टेंबर 2020

सर्वसामान्यांच्या किंवा ग्राहकांच्या पातळीवर होणाऱ्या अन्नाची नासाडी टाळण्याविषयी काय करता येईल, हे पाहू.

मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या पातळीवर होणाऱ्या अन्नाच्या नासाडीविषयी माहिती घेतली. या भागामध्ये सर्वसामान्यांच्या किंवा ग्राहकांच्या पातळीवर होणाऱ्या अन्न नासाडीची माहिती घेणार आहोत. अन्नाची नासाडी टाळण्याविषयी काय करता येईल, हे पाहू.

शेतीमध्ये एक सलग उत्पादन होत नाही. हंगामानुसार त्यात चढ उतार होत असतात. हंगामाअखेर सर्वांची काढणी साधारण एक दोन महिन्यामध्ये येत असते. अशा वेळी बाजारात येणारे उत्पादन हे नेहमीच बाजाराच्या गरजेपेक्षा अधिक असण्याची शक्यता असते. त्यातील साठवण्यायोग्य घटकांची साठवणूक बाजारातील मोठ्या व्यापाऱ्यांपासून सामान्य ग्राहकांपर्यंत सारेजण करत असतात. प्रत्येकाची साठवण्याची क्षमताही वेगवेगळी असते. अशा वेळी साठवणीच्या पद्धतीमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. सामान्यतः साठवण म्हटले की आपल्याला मोठी गोदामे आठवतात, पण घरातील सामान्य महिलाही वर्षासाठी धान्य व अन्य घटकांची साठवण करत असते. लवकर खराब होणाऱ्या फळे, भाज्यांची लोणची किंवा वाळवण करून ती साठवली जातात. छोट्या प्रक्रियांद्वारे मूल्यवर्धनासोबतच साठवण शक्य होते. संवेदनशील व लवकर खराब होणाऱ्या घटकांच्या साठवणीसाठीही खास पॅकेजिंग आवश्यक आहे.

आर्थिक निधी ः

१) अधिक साठवणीसाठी भारत सरकारमार्फत एक लाख कोटी रुपयांचा कृषी पायाभूत सुविधा निधी उभा केला आहे. त्यातून कृषी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी उद्योग, स्टार्ट अप यांना दहा वर्षाच्या मुदतीवर दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. त्यातून काढणीपश्चात पुरवठा साखळीतील विविध टप्प्यामध्ये होणारे नुकसान कमी करणे शक्य होऊ शकते. त्यासाठी इ मार्केटिंग प्लॅटफॉर्म, गोदाम, वखारी, सायलो, पॅक हाऊस, प्रतवारी केंद्रे, शीतगृहे, वाहतूक व्यवस्था, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, पिकवणगृहे उभारता येतील.
२) कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागामार्फत अशा प्रकल्पामध्ये गुंतवणुकीसाठी मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध होऊ शकते.

सर्वसामान्यांच्या किंवा ग्राहकांच्या पातळीवर...

भारतातील अन्नाचे नुकसान ग्राहकांच्या पातळीवरही होत असते. शिजल्यानंतर फेकून दिल्या जाणाऱ्या अन्नाने वाहणाऱ्या कचराकुंड्या सर्वांना दिसत असतात. ज्या ठिकाणी अन्न अधिक प्रमाणात शिजते, अशा लग्न व कार्ये, भोजनालये, सामाजिक कार्यक्रम, हॉटेल ही अशा वाया जाणाऱ्या अन्नांचे प्रमुख स्रोत आहेत. शहरी भागामध्ये शिजवलेल्यापैकी १० ते १५ टक्के अन्न वाया जाते. त्याच वेळी शहरामध्ये भुकेले झोपणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे.

  • केवळ शासकीय पातळीवर धोरणांची आखणी करून काही होणार नाही, समाजामध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे.
  • २०१८ मध्ये जागतिक पर्यावरण दिवशी जागतिक पातळीवर लोकांमध्ये अन्नाची नासाडी टाळण्यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘थिंक इट सेव्ह’ ही मोहीम राबवण्यात आली.
  • भूक आणि अन्नाची नासाडी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे कायम लक्षात ठेवा.
  • फळे, भाज्या व अन्य लवकर खराब होणाऱ्या घटकांची आवश्यक तितकीच खरेदी करा.
  • विकत घेताना प्रत्येक घटकांची साठवणक्षमता नक्की पाहा. त्यानुसार त्यांच्या वापराची वेळ ठरवा. हिरव्या भाज्या, फळे इ. लवकर खराब होणारे घटक आधीच वापरले गेले पाहिजेत, याकडे लक्ष ठेवा.
  • प्रति दिन आवश्यकतेपेक्षा अधिक अन्न शिजवू नका.
  • थोडे जरी अन्न उरले तरी गरजूंपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा.
  • कॅन किंवा बाटल्यातील पदार्थ त्यांच्या अंतिम तारखेपूर्वी संपवा. संपणे शक्य नसल्यास वेळीच गरजूंपर्यंत पोचवा.
  • खराब झालेले अन्नाचे कंपोस्ट बनवा. त्याचा शेतात, बागेमध्ये वापर करा.
  • भोजनालय, हॉटेल किंवा मंगल कार्यालये येथील शिल्लक राहणारे अन्न गरजूंपर्यंत पोचवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या.

इतर कृषी प्रक्रिया
अळिंबीचे पौष्टिक, औषधी गुणधर्म अन्...लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबी (मशरूम)...
पपईपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थपपई ही आरोग्यास पोषक असून, त्यापासून जाम, जेली,...
आवळा प्रक्रिया उद्योगातील संधीआवळा फळांमध्ये असणारे औषधी गुणधर्म व भरपूर...
गुलाबापासून गुलकंद, जॅम,जेलीगुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद, जॅम, जेली इत्यादी...
फळे, भाजीपाल्याचे पूर्व शीतकरणपूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक...
मसाल्यातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती बाजारामध्ये उपलब्ध असलेल्‍या अनेक मसाल्यांमध्ये...
संत्र्याचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानसंत्रावर्गीय फळांचा आकर्षक रंग,स्वाद, चव टिकून...
ऑलिव्ह तेलापासून बनवले वनस्पतिजन्य मांसप्राणीज मांसाचा वापर केलेल्या अनेक पदार्थातून...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
उद्योजकतेमध्ये कुटुंब, समाजाचा हिस्साउद्योग म्हणजे जोखीम. त्याच्याच यश व अपयश या दोन...
बटाट्यापासून वेफर्स, पावडर, फ्रेंच...मानवी आहारामध्ये बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
लघु उद्योग आजारी का पडतात?लघुउद्योगांना दीर्घकाळ नफ्यात चालण्यासाठी अनेक...
भाजीपाल्यावरील प्राथमिक प्रक्रियासौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या...
बीटपासून बनवा पराठा, पावडर, सूपबीट ही भाजी तशी फार लोकांना आवडत नाही. मात्र,...
ग्रामीण सेवा क्षेत्रातील उद्योगांचा...ग्रामीण भागामध्ये सेवा उद्योगाच्या विस्ताराला...
सीताफळापासून बनवा आइस्क्रीम, रबडी,...सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने...
बहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धित पदार्थआवळा हे तुरट व आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे...
उत्पादन क्षेत्रातील ग्रामीण उद्योगांचे...ग्रामीण भागातील निर्मिती करणाऱ्या एका छोट्या...
छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न...मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या...