agriculture stories in marathi fruit crop advice | Agrowon

फळपीक सल्ला

योगेश परूळेकर
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

यावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला. नुकत्याच झालेल्या पावसामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. थंडीचा हंगाम लांबल्यामुळे आंबा, काजूमध्ये मोहोर येण्यास विलंब होण्याची दाट शक्यता आहे. सध्याच्या काळात आंबा, काजू पिकांमध्ये विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

यावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला. नुकत्याच झालेल्या पावसामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. थंडीचा हंगाम लांबल्यामुळे आंबा, काजूमध्ये मोहोर येण्यास विलंब होण्याची दाट शक्यता आहे. सध्याच्या काळात आंबा, काजू पिकांमध्ये विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

आंबा
तुडतुडे लक्षणे

    मोहरातील तसेच कोवळ्या फळातील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहर गळून जातो.
    शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर सोडतात. तो पानांवर पडून नंतर त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे झाडे तसेच फळे काळी पडतात.
नियंत्रण ः (प्रमाण प्रतिलिटर पाणी) 
प्रादुर्भाव कमी असल्यास ः 

    क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिलि किंवा
    इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के  प्रवाही) ०.३ मिलि किंवा

प्रादुर्भाव जास्त असल्यास ः 
    क्लोथीयानिडीन (५० टक्के पाण्यात मिसळणारे) १.२ ग्रॅम किंवा 
    थायामेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) ०.१ ग्रॅम 

करपा लक्षणे 
    प्रादुर्भाव नवीन पानांवर जास्त होतो. पानावर अनियमित वेडेवाकडे फिकट किंवा गडद विटकरी रंगाचे ठिपके पडतात.
    मोहरामध्ये फुलांच्या देठावर व उमललेल्या फुलांवर काळसर विटकरी काळे डाग पडतात. परिणामी मोहर गळून जातो. 
नियंत्रण ः (प्रमाण प्रतिलिटर पाणी) 
    कॅप्टन २ ग्रॅम किंवा 
    कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम किंवा  
    कार्बेन्डाझीम १ ग्रॅम
    झाडे दाट असल्यास फांद्याच्या विरळणी करावी.

काजू 
ढेकण्या लक्षणे
    झाडांवर नवीन पालवी आल्यापासून ते फलधारणेपर्यंत प्रादुर्भाव होतो.
    मोहर, नवीन पालवीतील रस शोषून घेतल्यामुळे मोहर सुकतो, फळगळ होते. 
नियंत्रण ः (प्रमाण प्रतिलिटर पाणी) 
    लॅंबडा साहॅलोथीन (५ टक्के) १ मिलि किंवा
    प्रोफेनोफॉस (४० टक्के) १ मिलि.
    करपलेले शेंडे काढून नष्ट करावेत.

नारळ 
    नारळाला पाणी देण्यास सुरवात झाल्यानंतर, खताची दुसरी मात्रा (७५० ग्रॅम युरिया आणि ७०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) आळ्यांमध्ये द्यावी.
    बुरशीमुळे फळगळ होण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी १ टक्का बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.

 ः योगेश परूळेकर, ८२७५४५७६७८
(उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, 
दापोली, जि. रत्नागिरी).
(पीक सल्ल्यामध्ये शिफारसीत बुरशीनाशक आणि कीडनाशकांच्या चाचण्या विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर झालेल्या आहेत, यांना लेबल क्लेम नाही)


इतर ताज्या घडामोडी
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...
खानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
नगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...
जळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव  ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...
सोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात रब्बी पीककर्जाचे सात...सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी...
‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...
शेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...
सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...
लोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...
किमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...
टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...
चोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...