agriculture stories in marathi fruit crop advice | Agrowon

कृषी सल्ला (कोकण विभाग)

कृषी विद्या विभाग, दापोली
गुरुवार, 12 मार्च 2020

भुईमूग

 • शेंगा अवस्था
 • भुईमूग पिकावर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 
 • किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) २.५ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. भुईमूग पिकाला ७ ते ८ दिवसांनी पाणी देण्याची व्यवस्था करावी.

आंबा

भुईमूग

 • शेंगा अवस्था
 • भुईमूग पिकावर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 
 • किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) २.५ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. भुईमूग पिकाला ७ ते ८ दिवसांनी पाणी देण्याची व्यवस्था करावी.

आंबा

 • फळधारणा
 • फळधारणा झालेल्या आंबा बागेमध्ये (वाटाणा अवस्था), फळगळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाडास या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात तसेच झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.
 • उत्पादन व फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट १ टक्के (म्हणजेच १० ग्रॅम प्रतििलटर पाणी) या प्रमाणे फवारणी फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना करावी. 
 • फळे गोटी ते अंडाकृती आकाराची असताना विद्यापीठाच्या शिफारशीनुसार फळगळ कमी करण्यासाठी, फळाचा आकार व वजन वाढून डाग विरहीत फळांसाठी, फळामधील साक्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी २५ x २० सें.मी. आकाराची कागदी पिशवी लावावी.
 • हापूस आंबा फळाचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी ५५ टक्के तीव्रतेचे गोमूत्र, फळे वाटाण्याचा आकाराची असल्यापासून पुढे आठवड्याच्या अंतराने उपलब्धतेनुसार ३ ते ६ वेळा फवारावे.

काजू 

 • फुलोरा ते फळधारणा अवस्था 
 • काजू पिकामध्ये उशिराने येत असलेल्या नवीन पालवीवर ढेकण्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पालवीचे किडीपासून संरक्षण करण्याकरिता, फवारणी प्रतिलिटर पाणी
 • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मिली 
 • फुलोरा अवस्थेत असलेल्या काजूची फळधारणा वाढविण्यासाठी इथेफॉन १० पी.पी.एम. (१० मिली ग्रॅम प्रति लिटर) या संजीवकाची फवारणी फुलोरा अवस्थेत करावी. 
 • पाण्याची उपलब्धता असल्यास फुलोरा ते फळधारणा अवस्थेत काजूला पाणी देण्याची व्यवस्था करावी.
 • काजू बियांचे उत्पादन व बियांचे आकारमान वाढविण्यासाठी प्रति झाड ताज्या किंवा आठ दिवसापर्यंत साठविलेल्या २५ टक्के गोमूत्राची फवारणी (५ लिटर द्रावण) आणि २५ टक्के गोमूत्राची झाडाच्या बुंध्यामध्ये जिरवणी (१० लिटर द्रावण) करावी. (अॅग्रेस्को शिफारस आहे.)
 • काजू बिया पूर्ण तयार झाल्याशिवाय बियांची काढणी करू नये. 
 • काढणी केलेल्या बिया उन्हामध्ये ७ ते ८ दिवस वाळवून साठवणूक करावी.

कलिंगड 

 • फुलोरा ते फलधारणा
 • कलिंगड पिकाला ३ ते ४ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. पाण्याच्या अनियमित पाळ्या मुळे फळे तडकण्याची शक्यता असते. 
 • कलिंगडाच्या फळांचे सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी फळे भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून घ्यावीत.

चिकू 

 • फुलोरा ते फलधारणा
 • चिकू बागेस ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
 • झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे. चिकू पिकामध्ये फुलकळी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
  इमामेक्टीन बेन्झोंएट  (५ टक्के एस.जी.) ०.४५  ग्रॅम  किंवा 
  डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मिली किंवा  
  लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) १ मिली किंवा 
  प्रोफेनोफोस (४० टक्के प्रवाही) १ मिली 
 • या पैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी ५० टक्के फुले आल्यावर करावी. किडीच्या सर्वेक्षणासाठी निळ्या रंगाच्या प्रकाश सापळा बागेत बसवावा.  

वांगी, मिरची, टोमॅटो
फुलोरा ते फलधारणा 
वांगी, मिरची आणि टोमॅटो भाजीपाला पिकास ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच रोपांजवळ मातीची भर द्यावी. 

नारळ

 • किनारपट्टी भागामध्ये नारळ बागेत काळ्या डोक्याची अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या अळ्या पानाच्या खालच्या भागावर जाळी तयार करून पानांतील हरितद्रव्य खाल्ल्यामुळे पाने करपल्यासारखी दिसून येतात. 
 • किडीच्या नियंत्रणासाठी किडलेली पाने काढून नष्ट करावीत. फवारणी प्रति लिटर पाणी 
 • डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १.६ मिली
 • किडीच्या जैविक नियंत्रणासाठी प्रति माड किडीच्या १२ अळ्या आढळून आल्यास गोनीओझस नेफटीडीस ३५०० प्रौढ परोपजीवी कीटक प्रति हेक्टरी या प्रमाणात बागेत सोडावेत.  
 • नारळ बागेस ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच तसेच आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात आणि झावळ्यांचे आच्छादन करावे.

०२३५८ -२८२३८७
(कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)


फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
हवामान सुसूत्रीकरण करणारी जागतिक हवामान...पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामध्ये तापमान वाढीसोबतच...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...
निघोजच्या शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
मोबाईल ‘ॲप’द्वारे मिळणार कोरानाविषयीची...जिनिव्हाः जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू...
कांदा साठवणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून अवकाळी...
नगर बाजारसमितीत भाजीपाला खरेदी-विक्री...नगर  ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि...
नगर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुचनगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीची घडी...अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्याचे...पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या...