agriculture stories in Marathi, fruit crops gives more economic stability | Agrowon

शाश्वत उत्पन्नासाठी फळबाग ठरतेय फायदेशीर

गोपाल हागे
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

केवळ पारंपरिक पिकातून शाश्वत उत्पन्न हाती येत नाही, हे लक्षात घेऊन चांधई (जि. बुलडाणा) येथील भारत रामदास दामधर यांनी फळबागेची जोड दिली आहे.

केवळ पारंपरिक पिकातून शाश्वत उत्पन्न हाती येत नाही, हे लक्षात घेऊन चांधई (जि. बुलडाणा) येथील भारत रामदास दामधर यांनी फळबागेची जोड दिली आहे. गेल्या तीन वर्षापासून आले पीक लागवडीतही सातत्य ठेवले आहे. शाश्वत उत्पन्नासाठी फळबाग अत्यंत उपयोगी ठरत असल्याचे त्यांचे मत आहे.

चांधई (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथील दामधरवाडीमध्ये भारत रामदास दामधर यांची ४० एकर शेती आहे. खरिपात प्रामुख्याने सोयाबीन, उडीद, मूग या पिकासोबत रब्बीमध्ये हरभरा ही पारंपरिक पिके घेत असत. गेल्या दहा वर्षामध्ये पारंपरिक पिकातून योग्य उत्पन्न हाती येत नसल्याचे पाहून भारत यांनी फळपिकांकडे मोर्चा वळवला आहे. त्यांच्याकडे एकूण १८ एकरासाठी सिंचनाची सोय आहे. त्याचा लाभ घेत २०१२-१३ मध्ये तीन एकर क्षेत्रात पेरूची लागवड केली. त्यानंतर दोन वर्षाने (२०१५-१६ मध्ये) सहा एकर क्षेत्रात सीताफळाच्या बाळानगर जातीची लागवड केली. गेल्या तीन वर्षापासून आले पिकांचीही लागवड करत आहेत. फळ पिकातून कुटुंबाचे अर्थकारण सुधारण्यास मदत झाली आहे.

उर्वरित क्षेत्रामध्ये सोयाबीन सलग १० एकर क्षेत्रामध्ये घेतले होते. तर सीताफळ बागेत आंतरपीक म्हणून ३.५ एकर क्षेत्रात सोयाबीन लागवड केली होती. चार एकर सीताफळ बागेत उडदाची लागवड केली होती. तर तूर आणि मूग आंतरपीक पद्धत ३ एकर क्षेत्रामध्ये होती. त्यांच्याकडे रब्बीत हरभरा १४ ते १५ एकर, गहू चार एकर क्षेत्रामध्ये असतो. पिकांची एकरी उत्पादकता ही सोयाबीन एकरी आठ ते नऊ क्विंटल, उडीद चार ते पाच क्विंटल, मूग दोन ते तीन क्विंटल अशी आहे. हरभऱ्याचे एकरी आठ ते नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन येत असल्याचे भारत यांनी सांगितले. फळपिकांसोबत पारंपरिक पिकांची सांगड घातल्याने उत्पन्नामध्ये शाश्वतता आली आहे.

अशी मिळवली बाजारपेठ

  • या भागातील काही शेतकरी एकत्र येत सीताफळ, पेरू यांची विक्री करतात. सीताफळ, पेरू या दोन्ही फळांची विक्री अकोला, बुलडाणा तसेच सुरत बाजारपेठेत केली जाते.
  • २०१८ -१९ मध्ये सिताफळाचा १२०० क्रेट माल निघाला. प्रति क्रेट सुमारे १५ ते १६ किलो फळे बसतात. उच्चतम दर्जाच्या सीताफळाच्या क्रेटला १२०० ते १५०० रुपये असा दर मिळाला. सरासरी ६०० रुपये प्रति क्रेट दर या प्रमाणे सीताफळापासून सात लाख वीस हजार रुपये उत्पन्न मिळाल्याचे भारत यांनी सांगितले.
  • पेरू बागेतून ७०० क्रेट पेरू उत्पादन निघाले. प्रति क्रेट सुमारे १५ ते १६ किलो फळे बसतात. प्रति क्रेट पाचशे ते सहाशे रुपये असा दर मिळाला.
  • सीताफळ, पेरूचा हंगाम सुरू होताच दामधर यांच्याकडे दररोज १५ ते २० मजूर कामाला असतात. दामधर दांपत्य हे पूर्णवेळ शेतीमध्ये काम करत असते. त्यांना कृष्णा आणि ओम दोन मुले असून, अनुक्रमे इयत्ता ९ वी व ७ वी मध्ये शिकत आहेत.

फळांचा उत्तम दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न

  • बाजारपेठेत चांगल्या दर्जाच्या फळांना अधिक मागणी व दर मिळतो, हे भारत जाणतात. त्यामुळे आपल्या फळांचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते. या विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांची मदत होते.
  • फळबागांमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वापर करतात. सेंद्रिय निविष्ठांच्या निर्मितीसाठी त्यांनी दोन गीर गाई घेतल्या आहे.
  • फळांना स्कर्टिंग बॅग लावल्या जातात. प्रतवारी व पॅकिंग या घटकांचा प्राधान्याने लक्ष दिले जाते.
वर्ष पीक क्षेत्र
२०१५-१६ सीताफळ सहा एकर
२०१२-१३ पेरू तीन एकर
२०१८-२० सीताफळ ९.५ एकर
सीताफळाचे मागील तीन वर्षातील अर्थकारण
वर्ष उत्पादन (क्विंटल) उत्पन्न खर्च (रुपये)
सन २०१८-१९ ४५ क्विंटल २२५००० १०००००
सन २०१९-२० १५० क्विंटल ७५०००० २५००००
सन २०२०-२१ १७५ क्विंटल ८७५००० ३०००००
पेरू
२०१७-१८ ५० क्विंटल २००००० १ लाख
२०१८-१९ ७५ क्विंटल ३००००० १ लाख
२०१९-२० ८० क्विंटल ४००००० दीड लाख

भारत दामधर, ९८५०३०३५९३, ८६६९१२४६१०


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
दोघे युवामित्र झाले जिरॅनिअम तेल उद्योजकनाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व...
रब्बीत मोहरीचे पीक ठरतेय वरदानमेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी...
गावाने एकी केली अन् जमीन क्षारपडमुक्ती...वसगडे (ता. पलूस, जि. सांगली) या उसासाठी प्रसिद्ध...
ऊसपट्ट्यात केळीतून पीकबदलतुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिवानंद...
अंजीर पिकात मास्टर अन् मार्गदर्शकहीपुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत येथील...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
सेंद्रिय प्रमाणित मूल्यवर्धित मालाला...नांदेडपासून सुमारे पंधरा किलोमीटरवरील मालेगाव...
डांगी गायींचे संवर्धन करण्याचे व्रतआंबेवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील बिन्नर...
बचत गटाने दिली आर्थिक ताकद.आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा...
बांबू प्रक्रिया उद्योगात देश-परदेशात...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉनबॅक या संस्थेने...
सुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा...गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे...
निर्यातक्षम मिरची उत्पादनात हातखंडासुजालपूर (ता.जि.नंदुरबार) येथील अशोक व प्रवीण या...
माडग्याळी मेंढींपालनाचा तीन पिढ्यांचा...येळवी (ता. जि. जत) येथील पवार कुटुंबाच्या तिसरी...
व्हर्जिन कोकोनट ऑइल’ तंत्रज्ञान...गोवा राज्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ‘...
शेतीपेक्षा ठरले वराहपालन फायदेशीर तळणी (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील जनार्दन व...
सामूहिक पाणी योजनेतून फुलली परसबागउशाला धरण असताना कळझोंडीतील (ता. जि. रत्नागिरी)...
गावशिवाराचा शाश्‍वत विकास करणारी ‘एफईएस’आनंद (गुजरात) येथे नोंदणीकृत असलेल्या फाउंडेशन...
टार्गेट ठेवूनच करतेय शेतीपतीची बॅंकेत नोकरी असल्याने बदली ठरलेली. त्यामुळे...
प्रक्रियेमुळे उत्पन्न वाढले शेतकऱ्यांना...वाघोदे बुद्रुक (ता. रावेर, जि. जळगाव) येथील किशोर...
तीन एकरांतील पेरूबाग फुलवतेय अर्थकारणऊस हेच प्रमुख पीक असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात...