डाळिंब पिकातील बहारनिहाय नियोजन

डाळिंब पिकातील मृग बहार, अंबिया बहार आणि हस्त बहाराचे नियोजन.
 डाळिंब पिकातील बहारनिहाय नियोजन
डाळिंब पिकातील बहारनिहाय नियोजन

मृगबहार अ) अन्नद्रव्य व्यवस्थापन फळबागेची अवस्था - ताण तोडणे १) कुजलेले शेणखत २५-३० किलो किंवा शेणखत १५-२० किलो अधिक गांडूळ खत २ किलो अधिक निंबोळी पेंड २ किलो प्रती झाड द्यावे. किंवा कुजलेले कोंबडी खत ७.५ किलो चांगले अधिक निंबोळी पेंड ७.५ किलो चांगले प्रती झाड याप्रमाणे द्यावे. २) प्रत्येक झाडाला जिप्सम २.५ ते २.८ किलो आणि मॅग्नेशिअम सल्फेट ८०० ग्रॅम मुळाजवळ (राईझोस्फियर) मातीत मिसळा. ३) जैव-फॉर्म्युलेशन जसे अॅझोस्पिरिलम स्पेसीज, अ‍ॅस्परजिलस नायजर, ट्रायकोडर्मा व्हिरीडी आणि पेनिसिलिअम पिनोफायलम हे चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत मिसळावे. ६०% ओलावा ठेवून सावलीत १५ दिवस नियमितपणे उलथापालथ करत राहावे. त्यानंतर ते १०-२० ग्रॅम प्रती झाड द्यावे . ४) अर्बुस्कूलर मायकोरायझा बुरशी, एएमएफ (राइझोफॅगस इररेगुलरिस) १०-१५ ग्रॅम प्रती रोप/झाड द्यावे. ५) खत दिल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. ब) कीड व्यवस्थापन अंकुरण्याची अवस्था : १. पहिली फवारणी ः कडुनिंब तेल (१%) किंवा अॅझाडिरेक्टिन (१०,००० पीपीएम) ३ मिली अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिली प्रती लीटर किंवा करंज बियांचे तेल ३ मिली अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिली प्रती लीटर. २. पहिल्या फवारणीनंतर ७-१० दिवसाने ः सायअॅण्ट्रानिलीप्रोल ०.७५ मिली अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिली प्रती लीटर किंवा थायामिथोक्झाम (२५% डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टीकर ०.२५ मिली प्रती लीटर. फुल कळीची/फुलांची अवस्था : फवारणी प्रती लीटर पाणी स्पिनेटोरम (१२ % एससी) १ मिली किंवा स्पिनोसॅड (४५% एससी) ०.५ मिली या सोबत स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिली. मायक्रोन्यूट्रिएंट मिश्रणाची १-१.५ किलो प्रती हेक्टर या प्रमाणे फवारणी करावी. फुलधारणेसाठी नॅप्थील अॅसेटीक अॅसीड २२.५ मिली प्रती १०० लीटर पाणी. फळधारणेस सुरुवात/फळधारणा : क्लोरअॅण्ट्रानिलीप्रोल (१८.५% ईसी) ०.७५ मिली अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिली प्रती लीटर /लि प्रमाणे फवारावे. फुलधारणा अवस्था : जर सूत्रकृमींचा प्रादुर्भाव झाला असेल तर फ्ल्युन्सल्फोन (२% जीआर) ४० ग्रॅम प्रती झाड याप्रमाणे दोन वर्षापुढील झाडाना ड्रिपर्सच्या संख्येप्रमाणे द्यावे. प्रत्येक ड्रिपरच्या खाली मातीच्या सम प्रमाणात किंवा ४० ग्रॅम प्रती ४ ते ५ लीटर पाणी विरघळून झाडाभोवती गोलाकार पद्धतीने ५-१० सेंमी खोल ओतावे. क) आंतरमशागतीची कामे १) वाळलेली, मोडलेली सर्व अवशेष काढून टाका. तण काढून त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. २) पहिल्या पावसानंतर बागेतील मातीवर ब्लिचिंग पावडर (२% ) ची फवारणी करावी. ३) फळ लिंबाच्या आकाराची झाल्यानंतर १०० ग्रॅमची होईपर्यंत वेळोवेळी नवीन फुटवे (स्प्राउट्स) काढावीत. ४) झाडाखालील तण काढून बाग स्वच्छ ठेवा. हस्त बहार अ) अन्नद्रव्य व्यवस्थापन फळबागेची अवस्था - विश्रांतीचा कालावधी १. मागील फळ तोडणीनंतर पिकाची छाटणी केली नसेल तर झाडाची हलकी छाटणी करा. २. प्रत्येक रोपासाठी कुजलेले शेणखत २० ते २५ किलो किंवा कुजलेले शेणखत १३-१५ किलो अधिक गांडूळ खत २ किलो अधिक निंबोळी पेंड २ किलो द्या. किंवा चांगले कुजलेले कोंबडी खत ७.५ किलो अधिक निंबोळी पेंड २ किलो प्रती झाड द्यावे. ४. २०५ ग्रॅम नत्रासाठी (४४६ ग्रॅम नीम कोटेड युरिया), ५० ग्रॅम स्फुरदसाठी (३१५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट) आणि १५२ ग्रॅम पालाशसाठी (२५४ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा ३०४ ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश) प्रती झाड हलक्या सिंचनाद्वारे द्यावे. ब) कीड व्यवस्थापन १. स्टेम बोरर, शॉट होल बोरर, वाळवी आणि पाने खाणारे सुरवंट इ. साठी नियमित निरीक्षण करावे. २. पुढील फवारणीच्या नियोजनानुसार गरजेनुसार फवारणी घ्यावी. आंबिया बहार अ) अन्नद्रव्य व्यवस्थापन फळबागेची अवस्था - फळ वाढीचा कालावधी १. ड्रीपद्वारे मोनो-पोटॅशिअम फॉस्फेट (००:५२:३४) ८.५० किलो, युरिया २२.५ किलो आणि ०:०:५० हे खत १६.३० किलो प्रती हेक्टर या प्रमाणे ५-७ दिवसाच्या अंतराने ५ वेळा द्यावे. २. सूक्ष्मअन्नद्रव्य युक्त मिश्रणाची १-१.५ किलो प्रती हेक्टर याप्रमाणे फवारणी करावी. ३. जिबरेलिक अॅसिड (५० पीपीएम) या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. ४. मोनो-पोटॅशिअम फॉस्फेट (००:५२:३४) १० ग्रॅम प्रती लीटर याप्रमाणे तीन फवारण्या कराव्यात. ५. मॅंगनीज सल्फेटच्या १० दिवसांच्या अंतराने ६ ग्रॅम प्रती लीटर याप्रमाने दोन फवारण्या कराव्यात. टीप ः वरील एन. पी. के. च्या शिफारशी पाने परिक्षण अहवालाच्या इष्टतम श्रेणीप्रमाणे आहेत. जर एखादा घटक इष्टतम श्रेणीपेक्षा कमी असल्यास, वरील शिफारस २५% ने वाढविण्याची शिफारस केली जाते. ब) कीड व्यवस्थापन - १. फळ पोखरणारी अळीची अंडी अवस्था आढळल्यास : कडुलिंबाचे तेल १% किंवा अॅझाडिरेक्टीन (१०,००० पीपीएम) ३ मिली अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिली/लीटर किंवा करंज बियांचे तेल हे ३ मिली अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिली/लीटर ची फवारणी करावी. २. अळी दिसल्यास/फळावर छिद्रे दिसल्यास : सर्व प्रादुर्भावित फळे काढून खड्ड्यात पुरून टाकावीत. सायअॅण्ट्रानिलीप्रोल किंवा क्लोरअॅण्ट्रानिलीप्रोल ०.७५ मिली अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिली प्रती लीटर या प्रमाणे फवारणी करा. तेलकट डागासाठी फळ पिकाच्या कालावधित फवारणी (७ ते १० दिवसांच्या अंतराने) (फवारणी प्रमाण ः प्रती लीटर पाणी) बोर्डो मिश्रण(फक्त ०.५%, छाटणीनंतर १% वगळता) त्यानंतर स्ट्रेप्टोमायसीन* ०.५ ग्रॅम किंवा २-ब्रोमो, २-नायट्रो प्रोपेन -१, ३-डायओल (ब्रोनोपोल) ०.५ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सीक्लोराइड किंवा कॉपर हायड्रोक्साईड २ ते २.५ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ०.५ मिली सॅलीसिलिक अॅसिड ०.३ ग्रॅम प्रती लीटर याप्रमाणे ४ फवारण्या कराव्यात. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या ४ फवारण्या करा. तेलकट डागासाठी तातडीच्या फवारण्या हिरव्या लिंबाच्या अवस्थेतील फळांवर तेलकट डागाचा प्रादुर्भाव दिसल्यास त्वरीत ४ दिवसांच्या अंतराने १-२ फवारण्या घ्याव्यात. (प्रमाण प्रती लीटर पाणी) १. स्ट्रेप्टोमायसीन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोनोपोल ०.५ ग्रॅम अधिक कॉपर हायड्रॉक्साईड २ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ०.५ मिलि . २. स्ट्रेप्टोमायसीन* ०.५ ग्रॅम अधिक ब्रोनोपोल ०.५ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ०.५ मिली. हे लक्षात ठेवा...

  • शिफारशीत मात्रेनुसार फक्त आवश्यक तेवढ्या फवारण्या घ्याव्यात.
  • एकूण फवारण्यांची संख्या कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • पाऊस झाल्यानंतर अतिरिक्त फवारणी घ्यावी.
  • बोर्डो मिश्रणाशिवायच्या फवारणीत नॉन आयनिक स्प्रेडर स्टीकरचा वापर करावा.
  • प्रत्येक फवारणी करण्यापूर्वी सर्व जीवाणूजन्य डाग किंवा कूज प्रादुर्भावित फळे काढून जाळावीत.
  • बोर्डो मिश्रण ताजे तयार करून त्याच दिवशी वापरावे.
  • फवारण्या संध्याकाळी घ्याव्यात.
  • विश्रांती कालावधीत (१०-१५ दिवसांचे अंतर) (फवारणी प्रमाण प्रती लीटर पाणी) बोर्डो मिश्रण (१% ) किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा कॉपर हायड्रोक्साईड २ ते २.५ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ०.५ मिली डाळिंब बुरशीजन्य स्कॅब, स्पॉट्स आणि रॉट्ससाठी काही उपयोगी बुरशीनाशके (फवारणी प्रमाण प्रती लीटर पाणी) मॅण्डीप्रोपामीड (२३.४% एससी) १ मिली किंवा प्रोपिकोनॅझोल (२५% ईसी) १ मिली अधिक अॅझोक्सिस्ट्रॉबीन १ मिली किंवा अॅझोक्सिस्ट्रॉबिन (२०%) अधिक डायफेनोकोनॅझोल (१२.५% ​​एससी) २ मिली किंवा क्लोरोथॅलोनिल (५०%) अधिक मेटॅलॅक्झिल एम. (३.७५%) २ मिली किंवा बोर्डो मिश्रण (०.५%) ट्रायसायक्लॅझोल (१८%) अधिक मॅन्कोझेब (६२% डब्ल्यूपी) २-२.५ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनिल (७५% डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझोल १ मिली टीप ः

  • वरीलपैकी कोणत्याही २ बुरशीनाशकाच्या फुलधारणा आणि फळधारणेच्या कालावधीत १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या केल्यास चांगला फायदा होतो. पुढील काळातील अनेक फवारण्या टाळता येतात.
  •  बोर्डो मिश्रण वगळता इतर फवारणीमध्ये स्प्रेडर स्टीकरचा वापर करावा.
  •  हंगामात कॉपरजन्य बुरशीनाशकांशिवाय कोणत्याही कीडकनाशकाचा वापर २ पेक्षा जास्त वेळा करू नये.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com