agriculture stories in Marathi Fruit sucking moth management in fruit crops | Agrowon

फळातील रस शोषक पतंगाचे व्यवस्थापन

डॉ. संजोग बोकन, डॉ. अनंत बडगुजर
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये रस शोषक पतंगामुळे सुमारे ५० ते ६० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. या किडीचा जीवनक्रम समजून घेऊन वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे.

लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये रस शोषक पतंगामुळे सुमारे ५० ते ६० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. या किडीचा जीवनक्रम समजून घेऊन वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे.

रस शोषक पतंग हे मोठ्या आकाराचे व आकर्षक रंगाचे असतात. रस शोषक पतंगाच्या ओथ्रिस मॅटरना, ओथ्रिस फुलोनिका व अकिया जनाटा अशा विविध प्रजाती आढळून येतात.

ओथ्रिस मॅटरना : समोरील पंख तपकिरी रंगाचे असून, मागील पंख नारंगी रंगाचे असतात. मागील पंखावर मध्यभागी एक काळा ठिपका असतो. पंखाच्या कडा काळ्या रंगाच्या असून त्यावर पांढरे ठिपके असतात.

ओथ्रिस फुलोनिका : मागील पंख नारंगी रंगाचे असून, त्यावर मध्यभागी इंग्रजी 'C' अक्षरासारखा काळा ठिपका असतो.

अकिया जनाटा : समोरील पंख तपकिरी व मागील पंख पांढरे असून त्यावर काळे चट्टे असतात.

हे रस शोषणारे पतंग मोसंबी, संत्री फळाव्यतिरिक्त डाळिंब, आंबा, द्राक्ष इ. फळांवरही प्रादुर्भाव करतात. या पतंगांचा प्रादुर्भाव तुलनात्मकदृष्ट्या उशिराचा आंबिया बहार आणि मृग बहरात जास्त प्रमाणात दिसून येतो. ऑगस्ट ते ऑक्टोबर या पावसाळी कालावधीत प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो. पावसाळी हवामानात जून ते ऑगस्ट कालावधीत जीवनक्रम पूर्ण होऊन या किडीचे पतंग बाहेर पडतात. त्यांच्या प्रौढ होईपर्यंतचा जीवनक्रम आज आपण जाणून घेऊ.

जीवनक्रम

 • ज्या फळांना हे पतंग उपद्रव करतात, त्या फळझाडांवर पतंगापूर्वीच्या कोणत्याही अवस्था (उदा. अंडी, अळी आणि कोष) दिसून येत नाहीत. अंडी घालण्यापासून ते पतंगाची पूर्ण वाढ होईपर्यंत या किडीचा जीवनक्रम जंगली वनस्पतींवर होतो. (उदा. गुळवेल, वासनवेल, चांदवेल इ. वेलवर्गीय वनस्पती) या वनस्पती नदी नाल्यांच्या किनाऱ्याला किंवा जंगलांमध्ये आढळतात.
 • एक मादी पतंग जवळपास ८०० अंडी या वनस्पतींच्या पानांवर घालते. ही अंडी २ ते ३ दिवसात उबतात. त्यातून लहान पिवळसर रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. सुरवातीला अळ्या वेलींची पाने खरवडून खातात. वाढीच्या अवस्थेत नंतर त्या पूर्ण पाने कुरतडून खातात. अळीची पूर्ण वाढ होण्यास १२ ते १४ दिवसांचा कालावधी लागतो. पूर्ण वाढ झालेल्या अळीचा रंग तपकिरी होतो.
 • पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी स्वतःभोवती कोष विणून आत कोषावस्थेत जाते. कोषावस्था या वेलींवरच तयार होते. १० ते १५ दिवसांनी त्यातून पतंग बाहेर पडतो. हा बाहेर पडलेला पतंग डाळिंब, मोसंबी, संत्री अशा फळ पिकांकडे धाव घेतो.

नुकसान :
फक्त प्रौढ पतंग अवस्था फळाचे नुकसान करते. हे पतंग निशाचर असून सर्वसाधारणपणे दिवस मावळल्यापासून ते मध्य रात्रीपर्यंत पतंगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. बागेतील पक्व फळ शोधून त्यावर पतंग बसतात. आपल्या सोंडेने फळांना सूक्ष्म छिद्र पाडून त्यात सोंड खुपसून आतील रस शोषतात. कालांतराने छिद्र पडलेल्या जागेवर गोलाकार तपकिरी चट्टा तयार होतो. त्या जागी फळ सडण्यास सुरवात होते. त्या जागी बुरशींचा शिरकाव होऊन अशी प्रादुर्भावग्रस्त फळे गळून पडतात. पतंगामुळे जर फळगळ झाली असल्यास पडलेली फळे दाबल्यास त्यातून रस निघतो. फळांची प्रत कमी झाल्याने अशी फळे विक्री योग्य राहत नाहीत.
छायाचित्र ः PNE20R08743 रसशोषक पतंगामुळे पडलेला चट्टा

व्यवस्थापन :

 • अंडी, अळी आणि कोषाला पूरक असणाऱ्या फळ बागेतील आणि आजुबाजूस असलेली गुळवेल, वासनवेल व चांदवेल इ. वेळीच बंदोबस्त करावा.
 • जमिनीवर पडलेली प्रादुर्भावग्रस्त फळे ताबडतोब जमा करून जमिनीमध्ये पुरावे.
 • पतंगाचा प्रादुर्भाव दिसून येताच सायंकाळी बागेमध्ये धूर करावा.
 • त्यामुळे पतंगांचा शिरकाव फळबागेत वेळीच रोखता येईल.
 • शक्य असल्यास फळांना कागदी किंवा कापडी पिशवीने झाकावे.
 • पिकलेली केळी बागेमध्ये ठेवून त्यावर आकर्षित झालेले पतंग पकडून नष्ट करावेत.
 • बागेमध्ये प्रकाश सापळा लावावा.प्रकाशाकडे आकर्षित झालेले पतंग प्रकाशाच्या झोताने सुस्त होतात. असे पतंग पकडून नष्ट करावेत.
 • -बागेतील संपूर्ण झाडे ०.५ सेंमी मेश पेक्षा कमी असलेल्या नायलॉनच्या जाळीने झाकावे.
 • मॅलेथिऑन १०० मिली अधिक गूळ १०० ग्रॅम अधिक फळांचा रस १०० ते १५० मिली प्रति लिटर पाणी असे विषारी आमिष तयार करावे. हे मिश्रण १०० मिली प्रमाणात मोठ्या आकाराच्या बाटल्यांमध्ये भरून ८ ते १० झाडाच्या अंतरावर एक या प्रमाणे टांगून ठेवावे. या विषारी आमिषाकडे आकर्षित झालेले पतंग गोळा करून नष्ट करावेत.

डॉ. संजोग बोकन (संशोधन सहयोगी ), ९९२१७५२०००
डॉ. अनंत बडगुजर (सहाय्यक प्राध्यापक), ७५८८०८२०२४

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.


फोटो गॅलरी

इतर फळबाग
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
फळछाटणीपूर्वी करावयाच्या उपाययोजनासध्या द्राक्षबागेत पावसाची उघडीप अनुभवास येत आहे...
फळबाग सल्ला (कोकण विभाग) आंबा  वाढीची अवस्था  पावसाची...
फळातील रस शोषक पतंगाचे व्यवस्थापनलिंबूवर्गीय फळपिकांमध्ये रस शोषक पतंगामुळे सुमारे...
केळी बाग व्यवस्थापनसध्या केळी बागेतील मृगबाग मुख्य वाढीच्या तर...
लिंबूवर्गीय फळपिकावरील कोळीचे व्यवस्थापनकोळी किडीचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येत असला तरी...
केळीवरील फुलकिडीचे नियंत्रण ​सद्यःस्थितीत केळीवर मोठ्या प्रमाणावर फुलकिडींचा...
काडीची परिपक्वता, पानगळ या समस्यांकडे...गेल्या चार दिवसापासून लागवडीखाली विभागामध्ये...
रब्बी ज्वारी पेरणीची पूर्वतयारीपेरणीपूर्वी बियाण्यास गंधक ४ ग्रॅम किंवा थायरम ३...
किटकांमुळे होणाऱ्या फळगळवरील उपाययोजनाफळगळतीच्या कारणांमध्ये अपुरे पोषण, रोग व कीड इ....
बुरशी, अपुऱ्या पोषणामुळे होणाऱ्या...वातावरणातील बदलामुळे वनस्पती अंतर्गत घडामोडीमध्ये...
हापूस आंब्यासाठी नव्या बाजारपेठांची गरजपोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस...
द्राक्षबागेत नवीन फुटी वेगाने वाढण्याची...सध्याच्या स्थितीमध्ये द्राक्षबागेत पावसाळी...
नारळ उत्पादनवाढीसाठी उपाययोजना नारळ हे बागायती पीक आहे.  पाण्याची गरज ही...
नारळबागेच्या व्यवस्थापनाची सुत्रेप्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने नारळाच्या विविध...
संत्रा उत्पादकांना नव तंत्रज्ञानाची जोड...आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार योग्य सुधारणांसह...
केळीवरील कुकुंबर मोझॅक रोगाचे नियंत्रणसध्या केळी लागवड क्षेत्रामध्ये कुकुंबर मोझॅक...
काळ्या माशीवर वाढणारी उपयुक्त...सध्यस्थितीत नागपूर व अमरावती परिसरातील बऱ्याच...
डाळिंबावरील रोगांचे नियंत्रणडाळिंब फळपिकावर प्रामुख्याने तेलकट डाग, बुरशीजन्य...
केळीमधील सूत्रकृमीचे नियंत्रणकेळी पिकामध्ये पाच प्रकारचे सूत्रकृमी जास्त...