agriculture stories in Marathi, grape advice | Agrowon

द्राक्षाच्या विविध अवस्थेत घ्यावयाची काळजी 

डॉ. आर. जी. सोमकुंवर 
शुक्रवार, 19 जुलै 2019

द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात पावसाची फारशी शक्यता नसली, तरी ढगाळ वातावरण टिकून राहील. काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाच्या सरी मिळून तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल. सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्क्यांपर्यंत टिकून राहील. या परिस्थितीत बागेत येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती घेऊ. 

द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात पावसाची फारशी शक्यता नसली, तरी ढगाळ वातावरण टिकून राहील. काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाच्या सरी मिळून तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल. सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्क्यांपर्यंत टिकून राहील. या परिस्थितीत बागेत येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती घेऊ. 

जुनी बाग ः 
या बागेमध्ये वातावरणाची सद्यःस्थिती व बदल हानिकारक ठरू शकतो. बागेतील वाढती आर्द्रता ही द्राक्षवेलीत जिबरेलिन्सचे प्रमाण वाढविण्यास मदत करते. परिणामी, वेलींचा शेंडा जोमाने वाढतो. या वेळी वाढत असलेला शेंडा काडीची परिपक्वता लांबणीवर टाकेल. बऱ्याच वेळा नुकत्याच झालेल्या पावसामुळे बागेत शेंडा पिंचिंग करणे कठीण होते किंवा काही स्थितीमध्ये शेंडा पिंचिंग करण्यास उशीर झाल्यास बगलफुटीसुद्धा तितक्याच जोमाने वाढतात. याचाच परिणाम म्हणजे काडी परिपक्वतेस आवश्यक असलेली फुटीमधील ऊर्जा नवीन फूट वाढविण्यासाठी वाया जाते. अशा वेळी बागेत शेंडावाढ जर होत असली, तर काडीची परिपक्वता लांबणीवर जाते. 

शेंडावाढ थांबविणे हे काडी परिपक्वतेसाठी महत्त्वाचे असते. तेव्हा बागेमध्ये पुढील प्रकारे नियोजन करावे. 
१) पाण्यावर पूर्ण नियंत्रण असावे. ठिबकद्वारे पाणी फक्त खते देण्यापुरते द्यावे. 
२) वेलीवर पालाशची फवारणी ४ ते ५ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे करावी. जमिनीतूनसुद्धा पालाशची उपलब्धता करावी. 
३) बगलफुटी वाढू नयेत, याची काळजी घ्यावी. 
४) शेंडावाढ नियंत्रणात ठेवावी. 
५) आवश्यकतेपेक्षा शेंडा जास्त वाढत असल्यास बोर्डो मिश्रणाची १ टक्केप्रमाणे फवारणी करावी. यामुळे कोवळ्या फुटीवर स्कॉर्चिंग येईल. त्यानंतर वाढ नियंत्रणात राहण्यास मदत होईल. 

खुंट लागवड ः 
या बागेत रिकट घेतल्यानंतर नवीन फुटी जोमात वाढण्यास सुरवात झाली असेल. आपल्याकडे पावसाचे प्रमाण कमी असल्यास वाढीचा वेग कदाचित कमी राहू शकेल. अशा स्थितीमध्ये बागेतील फुटींचे नियोजन पुढील प्रकारे करावे. 
१) पूर्ण निघालेल्या फुटींपैकी ३ ते ४ सरळ वाढणाऱ्या, सशक्त व रोगमुक्त फुटी राखून इतर फुटी काढून टाकाव्यात. फुटींची गर्दी कमी झाल्यामुळे उपलब्ध असलेले अन्नद्रव्य मोजक्या काड्याच्या वाढीसाठी उपयोगात येईल. 
२) नवीन फुटींच्या वाढीकरिता १८-४६-० हे खत एकरी ३० किलो याप्रमाणे जमिनीतून द्यावे. यासोबत नत्रयुक्त खतेही योग्य प्रमाणात द्यावीत. 
३) जमीन वाफशात राहील, अशा प्रकारे पाण्याचे नियोजन करावे. अन्यथा, मुळांची कार्य करण्याची क्षमता कमी होऊन त्याचा परिणाम फुटींच्या वाढीवर होईल. 

नवीन बाग ः 
या बागेमध्ये ओलांड्याचा दुसरा टप्पा पूर्ण होत असेल. म्हणजेच, या नवीन वाढलेल्या ओलांड्यावर ३-४ नवीन काड्या पुन्हा वाढल्या असतील. या काड्यांमध्ये घडनिर्मिती होणे व काडीची परिपक्वता येणे, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतील, तेव्हा पुढील उपाययोजना कराव्यात. 
१) नवीन निघालेली फुट १०-११ पानांवर शेंडा पिंचिंग करून घ्यावी. 
२) या काडीच्या तळातील २-३ पाने काढून घ्यावीत. 
३) ०-५२-३४ हे खत ३ ते ४ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे तीन ते चार फवारण्या कराव्यात. 
४) नत्राचा वापर या वेळी बंद करावा. 
५) ६ बीए १० पीपीएम आणि युरासिल २५ पीपीएम याप्रमाणे एक फवारणी करावी. 
६) प्रत्येक काडी ओलांड्यावर बांधली असल्याची खात्री करावी. यामुळे काडीच्या प्रत्येक डोळ्यावर एकसारखा सूर्यप्रकाश मिळेल.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६० 
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे) 


इतर फळबाग
सिट्रस सायला, पाने पोखरणारी अळीचे...सद्यःस्थितीत संत्रा व मोसंबीच्या फळबागांना नवीन...
शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढतोय,...शंखी गोगलगाय किंवा शेंबी हे मृदकाय वर्गातील सजीव...
लिंबूवर्गीय फळपिकावरील पाने खाणाऱ्या...सद्यस्थितीत लिंबूवर्गीय फळबागेमध्ये नवीन नवती...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
व्यवस्थापन मोसंबी बहराचेसध्याच्या वातावरणात मोसंबीच्या आंबे बहराच्या...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
पावसाळी स्थितीतील द्राक्षबागेचे नियोजनगेल्या आठवड्यापासून सर्वच भागात पावसाची नोंद झाली...
प्रयोगशील शेतीतून पीक बदलनोकरीच्या निमित्ताने संजय साळवे यांना गाव सोडावे...
केळी पिकातील खत नियोजनप्रति झाड २०० ग्रॅम नत्र, ६० ग्रॅम स्फुरद व २००...
पावसाळी वातावरणातील द्राक्षबागेतील...गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी पाऊस झाला, तर काही...
आरोग्यदायी फणसवरून काटेरी पण आतून गोड.. असे म्हटले की फणस हे फळ...
पावसाळी वातावरणातील द्राक्षबागेचे...गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे....
डाळिंबातील बुरशीजन्य मररोगाचे व्यवस्थापनडाळिंब बागेमध्ये सूत्रकृमी, वाळवी, शॉर्ट होल बोरर...
डाळिंब पिकातील बहारनिहाय नियोजनमृगबहार अ) अन्नद्रव्य व्यवस्थापन फळबागेची...
तंत्र करवंद लागवडीचेकरवंदाच्या भरपूर जाती आढळतात. डॉ. बाळासाहेब सावंत...
उशिरा खरड छाटणीच्या बागेतील सूक्ष्मघड...सध्याचे वातावरण ः सध्या द्राक्ष विभागामध्ये...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
आधुनिक पद्धतीने करा संत्रा लागवडविशिष्ट अशी आंबट गोड चवीबरोबर प्रतिकारशक्ती...
उन्हाळ्यातील केळी बागेचे व्यवस्थापनउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...