agriculture stories in Marathi Grape advice by Dr. Somkunwar | Agrowon

मणी तडकण्यासह भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढेल

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. सुजय साहा
गुरुवार, 7 जानेवारी 2021

द्राक्ष बागा घडाच्या विकास अवस्थेत असलेल्या बागांमध्ये मणी तडकणे, भुरीचा रोगाचा प्रादुर्भाव होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

सध्याच्या वातावरण परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाच्या सरीही आल्या. यासोबत पुढील काही दिवसामध्येही ढगाळ व पावसाळी वातावरणाची शक्यता असल्याचा हवामान अंदाज आहे. अशा स्थितीमध्ये द्राक्ष बागा घडाच्या विकास अवस्थेत असलेल्या बागांमध्ये मणी तडकणे, भुरीचा रोगाचा प्रादुर्भाव होणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यावर मात करण्यासाठी पुढील उपाययोजना उपयुक्त ठरतील.

पाने पिवळी पडण्याची समस्या ः
या पूर्वी (खरड छाटणी नंतर) काड्यांची संख्या गरजेपेक्षा जास्त ठेवलेल्या बागांमध्ये या हंगामातही (फळछाटणीनंतर ) त्याच काडीवर पुन्हा फुटींची संख्या जास्त ठेवली असल्यास कॅनोपीमध्ये जास्त गर्दी झाली असेल. या वेळी घडाचा विकास होण्याच्या दृष्टीने काडीवर उपलब्ध असलेले प्रत्येक पान सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात असले पाहिजेत. सूर्यप्रकाशात असलेले प्रत्येक निरोगी पान अन्नद्रव्य तयार करून घडाच्या विकासात मदत करते. साधारणतः एक पान (१६० ते १७० वर्ग सें.मी.) हे एका घडातील सात ते आठ मण्यांचा विकास करण्यास मदत करते. याचा अर्थ एका घडात उपलब्ध असलेल्या १०० ते १२० मण्यांचा विकास करण्यासाठी त्या काडीवर घडाच्या पुढे १० ते १२ पाने पुरेशी असतात. यापेक्षा जास्त पाने असल्यास कॅनोपीची गर्दी वाढते. कॅनोपीच्या प्रत्येक भागात एकसारखा सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे पाने पिवळी पडतात. ही पाने शक्यतो खालील भागात आढळून येतील. ही पिवळी पडलेली पाने एकतर स्वतःचे अन्नद्रव्य स्वतः तयार करू शकत नाहीत. त्यासाठी ती दुसऱ्या पानांवर अवलंबून असतात. याचाच अर्थ दुसरे पान सुद्धा अन्नद्रव्य करताना पिवळे पडू शकते. जास्त फुटी असलेल्या वेलीवर खालच्या भागामध्ये यामुळेच पिवळ्या पानांची संख्या जास्त असते. ढगाळ वातावरण असल्यानंतर अशा कॅनोपीमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.

यावर प्रभावी उपाययोजना करताना मणी सेटिंग झाल्यानंतर शेंडा थांबलेला असतो, तेव्हा निर्णय घेऊन अनावश्यक फुटी कमी करणे महत्त्वाचे ठरते. मणी सेटिंगच्या पूर्वीच फेलफुटी जर काढून टाकल्या तर प्रत्येक पानात हरितद्रव्याचे प्रमाण वाढून प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्ये तयार करून घडाच्या विकासात मदत होईल. सोर्स आणि सिंकचा समतोल राहील.

मुळांचे कार्य ः
ज्या बागांमध्ये मणी सेटिंग होऊन आठ ते दहा मि.मी. पर्यंतचे मणी आहे. अशा बागेत या वेळी मुळे कार्य करत नसल्यास मण्याचा विकास थांबलेला दिसेल. खरेतर मणी सेटिंग ते पाणी उतरण्यापर्यंतचा कालावधी हा फार महत्त्वाचा आहे. या दरम्यान शक्य तितक्या लवकर मण्याचा आकार वाढवून घेण्याकरिता बागेत पाणी व्यवस्थापन, संजीवकांचा वापर, खत व्यवस्थापन आणि पुरेशी कॅनोपी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. या गोष्टींचा समतोल ठेवण्याकरिता मुळे कार्यरत असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा पावसामुळे, ट्रॅक्टरच्या वजनामुळे, मजुरांद्वारे बोद तुडवले गेल्यामुळे (विरळणी आणि डिपिंगवेळी) आवश्यक असलेली पांढरी मुळे तयार होणे कठीण होते. या ठिकाणी बोद खोदून पाहिल्यास मुळे काळी पडलेली दिसून येईल. याचाच अर्थ या मुळांची कार्य करण्याची क्षमता कमी झालेली आहे. मात्र, अशा वेळी आपण बागेमध्ये पाणी वाढवतो किंवा संजीवकांची एखादी फवारणी देण्याचा प्रयत्न करतो. पाणी वाढवल्यामुळे भुरीचा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असेल. तर संजिवकांच्या फवारणीमुळे मण्याची साल जाड होऊन गोडी येण्यास विलंब होईल. अशा परिस्थिती मुळे कार्य करण्याकरिता बोद मोकळे करणे गरजेचे राहील. बोद मध्यभागातून न खोदता बोदाच्या बाजूने लहान चारी घेतल्यास फायदा होऊ शकतो. किंवा ड्रिपरचे पाणी ज्या ठिकाणी पडते, त्यापासून २५ ते ३० सेंमी बाजूला खुरप्याने साळून घेतले तरी त्याचा फायदा होऊ शकतो. यानंतर त्या बोदावर सेंद्रिय आच्छादन केल्यास मुळांच्या कक्षेतील तापमान वाढण्यास मदत होईल. परिणामी वेलीची शरीरशास्त्रीय हालचाली सुरळीत राहतील.

रोगाचा प्रादुर्भाव ः
बऱ्याचशा ठिकाणी ढगाळ व पावसाळी वातावरण असल्याने किंवा काही सरी कोसळून तापमान कमी झाल्याने बागेत भुरी रोगाच्या प्रसारासाठी पोषक वातावरण तयार झालेले असेल .

 

भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी फळछाटणीनंतर ८० दिवसापूर्वीच्या बागेत मेट्राफिनॉन ०.२५ ग्रॅम प्रति लिटर पाणी ही फवारणी उपयुक्त ठरेल. त्यानंतर सल्फर (८० डब्ल्यूडीजी) २ ग्रॅम प्रति लिटर अधिक सिलिकॉन युक्त ॲडज्युएंट ०.५ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी केल्यास भुरी रोगावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. ॲडज्युएंटचा वापर महत्त्वाचा असेल कारण यामुळे फवारणीचे द्रावण प्रत्येक पानावर व्यवस्थित रीत्या पसरेल व रोगाचे नियंत्रण सोपे होईल. अशा बागेत प्रत्येक सात दिवसानंतर एक फवारणी ॲम्पिलोमायसीस ( ५ ते ६ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे) करावी. तसेच ट्रायकोडर्मा २.५ ते ३ लिटर प्रति एकर या प्रमाणे ठिबकद्वारे द्यावे.

फळछाटणीनंतर ९० दिवसानंतरच्या अवस्थेत असलेल्या बागेत दोन फवारण्या बॅसिलस सबटिलिस २ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे तीन दिवसाच्या अंतराने करून घ्याव्यात. ज्या बागेत बागेत पाऊस येऊन गेला किंवा दव आहे, अशा बागेत लगेच ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे करून घेतल्यास रोग नियंत्रण सोपे होईल. या अवस्थेतील बागेत मॅन्कोझेब ३ ते ५ किलो प्रति एकर या प्रमाणे धुरळणी करून घ्यावी.
पलुस व सांगली भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. अशा बागांमध्ये भुरी प्रादुर्भाव आणि मणी तडकण्याची समस्याही दिसून येईल. अशा ठिकाणी कायटोसॅन २ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी केल्यास नियंत्रण ठेवणे सोपे होईल.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...