agriculture stories in marathi grape advice by Dr. Somkuwar | Agrowon

कलम केलेल्या द्राक्ष बागेमध्ये करावयाची कामे

डॉ. आर. जी. सोमकुंवर 
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

द्राक्ष बागेमध्ये सध्या वाढीच्या विविध स्थितीमध्ये असलेल्या बागांमध्ये कामे सुरू आहेत. या वेळी तापमान पाहिजे तसे कमी झाले नाही. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे, तर काही ठिकाणी वातावरण ढगाळ आहे. अशा परिस्थितीमध्ये नवीन लागवडीपासून जुन्या बागांमध्ये बऱ्याच अडचणी दिसून येत आहेत. कलम केलेल्या बागेतील स्थिती आणि तिथे सद्यःस्थितीमध्ये करावयाची कामे यांची माहिती घेऊ.

द्राक्ष बागेमध्ये सध्या वाढीच्या विविध स्थितीमध्ये असलेल्या बागांमध्ये कामे सुरू आहेत. या वेळी तापमान पाहिजे तसे कमी झाले नाही. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे, तर काही ठिकाणी वातावरण ढगाळ आहे. अशा परिस्थितीमध्ये नवीन लागवडीपासून जुन्या बागांमध्ये बऱ्याच अडचणी दिसून येत आहेत. कलम केलेल्या बागेतील स्थिती आणि तिथे सद्यःस्थितीमध्ये करावयाची कामे यांची माहिती घेऊ.

कलम केलेल्या बागेमध्ये डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव आणि काडीची परिपक्वता अशा दोन महत्त्वाच्या अवस्था दिसून येतात. काही दिवसांपूर्वी झालेल्या पाऊस आणि नंतरच्या दव, धुके या वातावरणामुळे डाऊनी मिल्ड्यूची समस्या अद्यापही जाणवत आहे. काही बागांमध्ये या रोगांना काडीमध्ये प्रवेश केल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीमध्ये काडी कलम जोडाजवळ काळी पडलेली दिसेल. दुसऱ्या परिस्थितीमध्ये रोगाचा जास्त प्रसार झालेला असल्यास त्या ठिकाणाहून काडी तुटत असल्याचे दिसून येईल. काडी पुढील काळासाठी फायद्याची राहणार नाही. तेव्हा ही काडी यावेळीच शक्यतो कापून घ्यावी. सध्या उपलब्ध असलेले तापमान पुन्हा नवीन फूट निघण्यास मदत करेल. ज्या ठिकाणी काडी पूर्ण खराब झाली आहे, अशा ठिकाणी कलमजोडाच्या २-३ डोळे खाली काडी कापून घ्यावी. पुन्हा रूटस्टॉकवरून नवीन फुटी घेऊन फेब्रुवारी महिन्यात शक्य झाल्यास रिकट करतेवेळी त्याच बागेतून सायन काडी घेऊन कलम करावे.

याच बागेत दुसरी परिस्थितीही आढळून येते. पाऊस जास्त झालेला असल्यामुळे काडीची वाढ आवश्यकतेपेक्षा जास्त झाली. जास्त झालेल्या शाकीय वाढीमुळे बागेत काडी अजूनही हिरवी असेल. या बागेमध्ये काही वेली रोगग्रस्त असतील, तर काहींची वाढ कलम जोडाच्या पुढे फक्त ३-४ पानांवर दिसेल. अशा स्थितीमध्ये बागेमध्ये खोड, ओलांडा व मालकाडी तयार करण्याच्या दृष्टीने रिकट घेणे आवश्यक असते. हा रिकट तापमानाच्या विचार करता साधारणतः फेब्रुवारी महिन्यात सुरू करावयाचा असतो. रिकट घेतेवेळी कलमजोडापासून किमान ६-७ डोळे पूर्ण परिपक्व असावेत.

याकरिता बागेमध्ये सध्या नत्राचा वापर बंद करून सल्फेट ऑफ पोटॅशची (०-०-५०) पूर्तता जमिनीतून किंवा फवारणीद्वारे करावी. सध्या सुरू असलेला पाऊस संपल्यानंतर तापमान कमी होऊ लागेल. अशावेळी अन्नद्रव्याचा फारसा फायदा होणार नाही. ०-०-५० च्या ३ ते ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे तीन ते चार फवारण्या कराव्यात. १० ते १२ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति एकर जमिनीतून उपलब्ध करावे. या बागेमध्ये बोर्डो मिश्रण एक टक्का प्रमाणे एक ते दोन फवारण्या कराव्यात.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६००१
(संचालक, द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)


इतर ताज्या घडामोडी
मक्यापासून निर्मित जैवप्लॅस्टिकचा...मक्यातील स्टार्च आणि अन्य नैसर्गिक घटकांचा वापर...
जुन्या बागेमध्ये घडाच्या विकासाकडे लक्ष...द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी...
औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक...औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत...
औरंगाबाद जिल्ह्यात गव्हावर आढळला...औरंगाबाद : जिल्ह्यातील गव्हाच्या पिकावर खोडमाशीचा...
नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी...वाशीम : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत...
रत्नागिरी जिल्ह्यात खरिपाच्या विमा...रत्नागिरी : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत ऊस...कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना नऊ टक्के वाढ...
‘नासाका’ सुरू करण्यासाठी शरद पवारांना...नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली...
कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा...नाशिक : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दोन...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पीकविम्याच्या भरपाईसाठी प्रस्ताव पाठवा...सोलापूर : उत्तर सोलापूर, नरखेड, मार्डी, शेळगी,...
पुणे विभागातील १७०० गावांमधील भूजल...पुणे  ः यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला,...
नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेसात...नगर  ः जिल्ह्यात १४ सहकारी व नऊ खासगी असे...
नवीन लाल कांद्याच्या दरात चढ-उतारनाशिक: अतिवृष्टीमुळे अनेक खरीप कांदा लागवडी बाधित...
कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल...
भंडारा : शेतकऱ्यांना आज होणार विमा...मुंबई : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९...
...म्हणून सहा एकरांवरील द्राक्षबागेवर...नाशिक  : निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे...
राज्याला केंद्राकडून १५ हजार कोटी येणे...मुंबई  :  वस्तू व सेवा कर (जीएसटी)...
शिवनेरीवरून कर्जमाफीची घोषणा होण्याची...पुणे  ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी...
पंकजा मुंडे यांच्या स्वाभिमान...बीड  : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या...