agriculture stories in marathi grapes advice, control measures for powdery mildew & mealy bug | Agrowon

भुरी, मिलिबग नियंत्रणासाठी उपाययोजना आवश्यक

डॉ. रोशनी समर्थ, डॉ. डी. एस. यादव, डॉ. सुजय साहा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. तर काही काही ठिकाणी निर्भर आकाश दिसते. जिथे ढगाळ वातावरण असलेल्या ठिकाणी तापमान थोडेफार जास्त राहील. अशा परिस्थितीत बागेत मणी सेटिंग झालेल्या अवस्थेनंतर बागेत भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येईल.

सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. तर काही काही ठिकाणी निर्भर आकाश दिसते. जिथे ढगाळ वातावरण असलेल्या ठिकाणी तापमान थोडेफार जास्त राहील. अशा परिस्थितीत बागेत मणी सेटिंग झालेल्या अवस्थेनंतर बागेत भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येईल.

याच परिस्थिती ज्या ठिकाणी कॅनोपीची गर्दी आहे, अशा दाट कॅनोपीमध्ये असलेल्या घडावर भुरीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येईल. बुरशीनाशकांची फवारणी करतेवेळी या घडापर्यंत बुरशीनाशक पोचत नसल्यामुळे वरील कॅनोपीतील रोगांचा प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. परंतु, आतील कॅनोपीमध्ये रोगाचे जिवाणू तसेच राहतात, त्यामुळे रोग नियंत्रण कठीण होते.

रोग नियंत्रणाकरिता महत्त्वाचे पाऊस म्हणजे कॅनोपी मोकळी करून घ्यावी. प्रत्येक काडी तारेवर बांधून घडही एक विशिष्ट जागेत राहील आणि फवारणीच्या माध्यमातून रोग नियंत्रणात राहील. भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यूडीजी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यानंतर अॅम्पिलोमायसिस ५ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करावी. ज्या बागेत फळ काढणीकरिता ६० दिवसांपेक्षा कमी कालावधी उपलब्ध आहे, अशा बागेत टेट्राकोनॅझोल १ मिलि प्रतिलिटर पाणी किंवा मायक्लोब्युटानील ०.३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. याचसोबत प्रत्येक अवस्थेतील बागेत ट्रायकोडर्मा ३ ते ४ लिटर प्रतिएकर याप्रमाणे जमिनीतून द्यावे. व ५ मि.लि. प्रतिलिटर याप्रमाणे फवारणीसुद्धा करून घ्यावी. ट्रायकोडर्माचा वापर प्रत्येकी ८ ते १० दिवसांनंतर एकदा याप्रमाणे केल्यास रोग नियंत्रणाचा चांगले परिणाम मिळू शकतील.

मिलिबगचा प्रादुर्भाव
सध्याच्या परिस्थितीत बागेमध्ये तापमान वाढत आहे व घडाचा विकासही होत आहे. अशा वेळी बागेत घडावर मिलिबगचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. ब्यूप्रोफ्रेजीन २५ एससी १.२५ मिलि प्रतिलिटर प्रमाणे १० दिवसांच्या अंतराने दोन वेळा खोड व ओलांडे धुऊन घ्यावेत. जुन्या बागेत ब्युप्रोफ्रेजीनचा वापर करावयाचा असल्यास या फवारणीपूर्वी साल काढून घेणे फायद्याचे ठरेल. कारण हे कीडनाशक स्पर्शजन्य असल्यामुळे किती चांगले कव्हरेज झाले, यावर कीड नियंत्रण अवलंबून असेल. याचा पीएचआय ६५ दिवसांचा आहे.
ज्या बागेत द्राक्षघडाचे नमुने काढण्यासाठी ६५ दिवसांपेक्षा कमी कालावधी आहे, अशा बागेत फक्त निवडक रोगग्रस्त वेलींचे खोड व ओलांडे सिलिकॉनयुक्त सरफॅक्टंटचा वापर करून धुऊन घ्यावेत. अशा वेलीवर सुमारे १० ते १२ लिटर पाणी प्रतिवेल वापरले जाईल, याची काळजी घ्यावी. असे केल्यास घडामध्ये असलेले मिलिबगवरील मेणाचे आवरण धुऊन जाईल. मिलिबग नियंत्रणात येईल.

संजीवकाचा अनावश्यक वापर टाळावा
निरभ्र वातावरण असलेल्या बागेत किमान तापमानामध्ये पुन्हा घट होईल, अशा परिस्थितीमध्ये वेलीचा शरीरशास्त्रीय हालचालीचा वेग मंदावेल. मण्यांचा विकास यामुळे होणार नाही. बऱ्याचशा बागेत आकार थांबल्याचे दिसून येईल. अशा वेळी बागायतदार संजीवकांची पुन्हा एक फवारणी घेण्याचा प्रयत्न करतात. असे न करता बागेत मुळे कार्यरत आहेत की नाहीत, हे समजून घेणे गरजेचे असेल. बोदावर मल्चिंग किंवा आच्छादन केल्यास मुळीच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर चांगले परिणाम मिळतात. शक्यतोवर संजीवकांचा अतिरेक करणे या वेळी टाळावे.

संपर्क ः डॉ. डी. एस. यादव, ०२० -२६९५६०३५
(प्रमुख शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)


इतर फळबाग
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
सीताफळात योग्य परागसिंचन होणे आवश्यकसीताफळाची फळधारणा तापमानावर जास्त अवलंबून...
नारळाला द्या शिफारशीत खतमात्रानारळ झाडाच्या सभोवताली पहिले वर्ष १ फूट, दुसरे...
असे करा लिंबूवर्गीय फळपिकांचे व्यवस्थापनसध्या काही संत्रा बागांना पूर्ण ताण बसून आंबिया...
दीड वर्षात पपईसह पाच पिकांचा 'तनपुरे...पपईच्या दीर्घ कालावधीच्या पिकात कांदा, पपई...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...
द्राक्ष रिकट पूर्व तयारीसह व्यवस्थापनसध्याच्या वातावरणाचा विचार करता किमान...
केळी सल्लासूत्रकृमीग्रस्त जमिनीस खोल नांगरट देऊन उन्हात २...
केळीवरील सोंडकिडीचे कामगंध...जागतिक पातळीवर केळीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या...
दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...
द्राक्ष सल्ला : तापमानातील चढ-उताराचे...सध्याच्या तापमानाचा विचार करता द्राक्षबागेत...
पिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून...पावसाळा सरल्यानंतर थंडी पडली की बऱ्याच बागांमध्ये...
लिंबूवर्गीय फळपीक सल्ला सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी ...
असे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...
अशी करा पपईची लागवडपपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-...
नवीन द्राक्ष बागेमध्ये रिकट घेण्याचा काळसध्या वातावरण कमी होत असून, काही ठिकाणी ढगाळ...
असे करा संत्रा बागेत आंबिया बहरासाठी खत...संत्रा-मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन...
फळबागेत आच्छादन कराफळपिकांमध्ये साधारणपणे १० अंश सेल्सिअसपेक्षा...