agriculture stories in marathi grapes advice by Dr. Somkuwar, | Agrowon

पावसाळी वातावरण, ओलाव्याचे बागेतील परिणाम

डॉ. आर. जी. सोमकुंवर, विलास घुले
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

पाऊस झालेला नसला तरी जमिनीमध्ये ओलावा जास्त असल्याने द्राक्षबागेमध्ये अजूनही घड जिरण्याची, कुजेची व मुळे कार्य करत नसल्याची समस्या दिसून येते. यावर करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ.
 

गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाळी वातावरण फक्त होते. पाऊस झालेला नसला तरी जमिनीमध्ये ओलावा जास्त असल्याने द्राक्षबागेमध्ये अजूनही घड जिरण्याची, कुजेची व मुळे कार्य करत नसल्याची समस्या दिसून येते. यावर करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ.

घड जिरणे अथवा गोळी घड तयार होणे ः
डोळे फुटल्यानंतर पान बाहेर येत असलेल्या परिस्थितीमध्ये बाहेर पडलेला घड साधारणतः एक सेंमी च्या पुढे वाढत नाही. अशा वेळी वाढ होण्याकरिता आवश्यक ते अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नसल्याने त्या घडाचा आकार कमी राहतो. तो लांब न होता गोलाकार, बाजरीच्या दाण्याच्या आकाराचा होऊन विरघळल्यासारखा होतो. याला महत्त्वाचे कारण म्हणजे जोरात झालेला पाऊस व मुळांच्या कक्षेमध्ये वापसा परिस्थितीपेक्षा (फिल्ड कॅपॅसिटी) जास्त पाणी हे असू शकते. द्राक्ष बागेत डोळे फुटण्याच्या कालावधीत ४० मि.लि. व त्यापेक्षा जास्त पाऊस झालेला असल्यास मुळांच्या कक्षेत हवा खेळती राहत नाही. त्याच प्रमाणे वातावरणही पोषक नसते. परिणामी मुळांद्वारे अॅबसिसिक अॅसिडची उत्पत्ती जास्त प्रमाणात होते. आणि सायटोकायनीनची मात्रा कमी होते. यामुळे नुकत्याच निघालेल्या घडाच्या वाढीकरिता आवश्यक अन्नद्रव्यांचा समतोल होत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते. घडाच्या वाढीकरिता आवश्यक असलेले कर्बोदक हे यावेळी काडीमध्ये आवश्यकतेइतके तयार होत नसल्यानेही अडचण दिसून येते. गोळी घड किंवा घड जिरण्याची समस्या डोळे फुटल्यानंतर चार ते पाच पानांच्या स्थितीमध्ये आढळून येईल. ही पाने व निघालेला घड आवश्यक असलेले अन्नद्रव्य स्वतः तयार करू नाही. त्यामुळे काडीमध्ये उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांवर ती अवलंबून असतात. पाने व नुकत्याच निघालेल्या घडाच्या वाढीकरिता आवश्यक असलेले अन्नद्रव्य हे छाटणी केलेल्या काडीवर अवलंबून असतात. ही पाने किंवा घड ऑक्झिन्स किंवा जिबरेलिन्स तयार करू शकत नाही. परिणामी उपलब्धता व पुरवठा यांचा समतोल बिघडतो. जरी काडीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्ये भरपूर असली तरी पावसाळी वातावरणामुळे त्या काडीत विकरांचे कार्य कमी होते. त्यामुळे काडीमध्ये स्टार्चचे रूपांतर शर्करेमध्ये करणे आवश्यकतेइतके होत नाही. अनेक बागांमध्ये खरड छाटणीनंतर काडीच्या परिपक्वतेला लागणारा कालावधी (१५० दिवस) पूर्ण मिळाला नसल्यानेही काडीमध्ये आवश्यक ते अन्नद्रव्य साठवण होऊ शकलेले नाही. ही परिस्थितीही घड जिरण्यासाठी जबाबदार असेल.
लांब मण्याच्या द्राक्षमण्यामध्ये वाढीचा जोम जास्त असल्यानेही घड जिरण्याचे प्रमाण जास्त दिसून येईल.

उपाययोजना ः
१) काडीवर निघालेल्या पानांमध्ये अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्याकरिता होत असलेली स्पर्धा टाळणे महत्त्वाचे असेल. यासाठी द्राक्षघड दिसताच फेलफूट त्वरित काढावी.
२) ज्या बागेत वाढीचा जोम जास्त असल्याने ही परिस्थिती तयार झाली, अशा बागेत त्वरित फेलफूट न काढता सर्व फुटी काही काळ तशाच ठेवाव्यात. म्हणजे शेंड्यांचे प्रभुत्व कमी करता येईल. एकंदरीत वाढ नियंत्रणात राहील.
३) दुसऱ्या परिस्थितीत बागेत सायटोकायनीनयुक्त संजीवके उदा. ६ बीए १० पीपीएम या प्रमाणात फवारणी त्वरित करून घ्यावी.
४) सागरी तणांचा अर्क (सीवीड एक्स्ट्रॅक्ट) ची फवारणी घड जिरण्यापासून वाचवण्यासाठी काही प्रमाणात मदत करू शकेल.
५) पालाश व स्फुरदयुक्त खते दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी (उदा. ०-४०-३७ दीड ग्रॅम, अथवा ०-५२-३४ दोन ग्रॅम ) या प्रमाणात दोन फवारण्या गरजेच्या असतील.

बागेतील कुजेची समस्या ः
जमिनीमध्ये जर ओलावा जास्त असेल, वातावरणात आर्द्रता वाढलेली असल्यास (७० टक्क्यांपेक्षा अधिक) व फेलफुटी काढण्यास उशीर झाला अशी परिस्थिती असल्यास नुकतीच तयार झालेल्या कॅनोपीची दाटी तयार होईल. यामुळे बागेत वेलीचा दम घुटल्याप्रमाणे परिस्थिती तयार होईल. पाऊस जरी थोड्या फार प्रमाणात झाला असला तरी बागेत पाणी साचल्यास अडचणी वाढतील. विशेषतः प्री ब्लूम अवस्थेत असलेल्या घडावर थोड्या कालावधीकरिता पाणी साचले असले तरी पानांची लवचिकता वाढते आणि घडाचा दांडा व देठ दोन्ही कुजेला बळी पडतात.
उपलब्ध आर्द्रता, डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगाचे बिजाणू यावेळी फार लवकर वाढतात. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी वेळात जास्त होतो. एकदा घड तयार झाला की पुन्हा त्या ठिकाणी घड निघत नाही. या घडाचे नुकसान जर झाले असले तर वर्षभर घेतलेली मेहनत वाया जाते.

उपाययोजना ः
१) छाटणी होताच काड्या तारेवर बांधून सुटसुटीत राहतील, अशी परिस्थिती निर्माण करावी.
२) काडीवर निघालेल्या गरजेपेक्षा जास्त फुटी त्वरित काढाव्यात. तयार झालेल्या कॅनोपीत हवा खेळती राहील, याकडे लक्ष द्यावे.
३) तीन पाने अवस्थेत आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करून घ्यावी.
४) पानांची लवचिकता जास्त वाढत आहे, असे दिसल्यास पालाश व स्फुरदयुक्त खतांची फवारणी करावी. (उदा. ०-४०-३७ दीड ते दोन ग्रॅम, अथवा ०-५२-३४ दोन ते अडीच ग्रॅम )

मुळे कार्यरत नसल्याची स्थिती ः
ज्या बागेमध्ये जमिनीमध्ये पाणी जास्त जमा झालेले आहे किंवा काळी जमीन असल्याने ओलावा जास्त काळ टिकून राहिला, अशा स्थितीत बोदातील मुळांची कार्य करण्याची क्षमता कमी झालेली असते. यामुळे मुळे तपकिरी ते काळ्या रंगाची होतात. अशी मुळे जमिनीतून अन्नद्रव्ये व पाणी उचलण्यास असमर्थ असतात. बागेत उपलब्ध पोषक वातावरणामुळे फुटींची वाढ जास्त होते. अशा वेळी वाढत असलेल्या पानांची अन्नद्रव्यांची गरजही तेवढीच वाढते. मुळे जमिनीत कार्य करत नसल्याच्या स्थितीमध्ये जमिनीतून खतांची उपलब्धता करणे चुकीचे राहील. यावेळी मॅग्नेशिअम सल्फेट दोन ग्रॅम, फेरस सल्फेट २ ग्रॅम, झिंक सल्फेट अर्धा ग्रॅम, ०-४०-३७ दीड ते दोन ग्रॅम सर्वांचे प्रमाण प्रति लिटर पाणी प्रमाणे ही खते एक ते दोन फवारण्याद्वारे उपलब्धता करावीत. त्यानंतर वापसा परिस्थिती निर्माण होताच जमिनीतून ठिबकद्वारे विद्राव्य खते देण्यास सुरवात करावी. भारी जमिनीमध्ये ओलावा असल्यास बोद खोदण्याची घाई करू नये. अन्यथा जमिनीमध्ये भेगा तयार होऊन तयार नवी मुळे सुकतील.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)


इतर फळबाग
शेतकरी नियोजन- पीक - डाळिंबशेतकरी- ः ज्ञानेश्‍वर वाघमोडे गाव ः चळे, ता....
शेतकरी नियोजन पीक ः केळीशेतकरी - प्रेमानंद हरी महाजन, तांदलवाडी, ता....
मणी तडकण्याच्या समस्येसाठी राहा सतर्कनुकत्याच झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागेमध्ये...
केळी सल्लामृग बागेतील केळी गर्भावस्थेत आहेत. कांदेबाग लागवड...
मणी तडकण्यासह भुरी रोगाचा प्रादुर्भाव...सध्याच्या वातावरण परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी ढगाळ...
द्राक्ष बागेत घडांना पेपर लावताना...अलीकडे वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष बागेमध्ये सन...
डाळिंब पिकातील रोगांचे व्यवस्थापनतेलकट डाग रोग तेलकट डागासाठी फळ पिकाच्या...
डाळिंब पिकातील बहारनिहाय अन्नद्रव्ये,...मृग बहार (मे-जून पीक नियमन) बागेची अवस्था ः फळ...
वाढत्या थंडीमध्ये फळबागांचे व्यवस्थापनसध्या वाढलेल्या थंडीचा परिणाम  कृषी...
भुरी, डाऊनी मिल्‍ड्यू रोगाच्या...बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बागायतदारांसमोर नवे...
फळबागकेंद्रित शेतीतून अर्थकारण केले...केळवद (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील गणेश...
द्राक्ष बागांमध्ये भुरी,डाऊनी वाढण्याची...सध्याच्या काळात हवामानामध्ये बदल होत आहेत. या...
पेरू फळबागेतील अन्नद्रव्य व्यवस्थापनपेरू हे बहुवार्षिक फळपीक असून, त्याला वर्षभर फुले...
केळी पिकातील करपा, कंद कुजव्या रोगाचे...उशिरापर्यंत लांबलेला पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे...
मणीगळ, मणी विरळणी यांकडे लक्ष द्यावेसध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेतील वातावरणाचा...
कृषी सल्ला ( कोकण विभाग)नारळ   फळधारणा वाढत्या तापमानासोबतच...
आंब्यावरील कीड, रोग नियंत्रण व्यवस्थापनकोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही...
तापमानात घट होण्याच्या स्थितीत...सध्याच्या परिस्थितीत निवार चक्रीवादळ तमिळनाडू व...
ढगाळ, पावसाळी वातावरणात करावयाच्या...सध्याच्या परिस्थितीत ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असून...
हिवरेबाजार शिवारात सीताफळांचा गोडवाआदर्श गाव हिवरेबाजार (ता.जि. नगर) गावासह...